Monday, May 30, 2011

द एलिअन टेक्नोलॉजी - ch ४. पूर्वभाग - पहिली भेट

ch ४. पूर्वभाग - पहिली भेट

(न्युयॉर्क मध्ये...)
सकाळचे सहा पस्तीस झाले होते. एलेक्स अजूनही बेडवर पालथा झोपला होता. कॉलेजला उन्हाळ्याची सुट्टी (Summer Vacation) लागली असल्याने लवकर उठण्याची चिंता नव्हती. सुट्टीमध्ये (vacation) त्याचे मित्र इतरत्र फिरायला गेले होते, राहिले होते तर फक्त जॉन, बेला, स्टेफनी, स्टीव्ह आणि तो स्वतः. बेला, स्टेफनी व स्टीव्ह यांनी vacation program course साठी प्रवेश घेतल्यामुळे ते कुठेही सुट्टी घालवला गेले नव्हते. जॉन आपला घोड्यांचा तबेला सोडून कुठे जावू शकत नव्हता, त्याचे खरे कारण वेगळेच होते पण इतर मित्रांना त्याने हेच कारण सांगितले होते. खरं तर जॉन - बेलावर खूप प्रेम करी, अन त्याला तिच्याशिवाय एकटे कुठे जाणे जमत नव्हते. बेलाला जॉनविषयी काय वाटत असे याबद्दल तिने कधीच चर्चा केली नाही किंवा तिला तो एक मित्रच म्हणून वाटत असावा.

एलेक्सही आपल्या मित्रांशिवाय कुठेच जावू इच्छित नव्हता त्यामुळेच त्याने पूर्ण सुट्टी घरीच घालवण्याचा निर्णय घेतला होता. तो अन स्टेफनी दोघांची गट्टी कॉलेजच्या पहिल्या वर्षीच जमली होती. कॉलेज सुरु होवून जेमतेम ३ महिने झाले असतील, तोच स्टुडन्टसना सांगण्यात आले कि कॉलेजच्या education program नुसार २ स्टुडन्टसना नवीन प्रवेश देण्यात आला आहे. प्रथमतः एलेक्स व जॉन ला या २ स्टुडन्टसविषयी फार चीड होती, त्यांना वाटे की मोठ्या घरच्या मुलांनाच असे प्रवेश मिळतात. परंतु हि चीड त्यांच्या मनात फार काळ टिकली नाही.
  
पहिले लेक्चर बंक करून एलेक्स आणि ग्रुप - अर्थातच जॉन व बेला सुद्धा या ग्रुपचे सदस्य होते - कॉलेजच्या आवारात टंगळ - मंगळ करीत होते. त्या सर्वांचेच लक्ष्य कॉलेजच्या गेटवर होते, जणू ते कोणाची फार आतुरतेने वाट पाहत होते.

"एलेक्स, मोटूच्या हवाल्याने एक खबर आहे. १० मिनिटातच ती अन तिची कार कॉलेज मध्ये एन्टर करेल." फ्रेडी म्हणाला.
"अस्स आहे तर. तू  जा अन आपली स्पेशल गुलाबांची फुले घेवून ये." एलेक्स.  
"तिचे स्पेशल स्वागत करायचे आहे या कॉलेज मध्ये."
कॉलेजच्या आवारात एक जर्मन मेड रेड ओपेल सुसाट धावत शिरली अन पार्किंग लॉटकडे वळली. पार्किंग लॉटच्या P-२ या जागेत ती कार येवून थांबली. एलेक्सही आतापर्यंत पार्किंग लॉट मध्ये येवून पोहचला होता अन त्या कार कडेच त्याचा मोर्चा वळला होता. कारचा दरवाजा उघडला गेला, त्यातून सुंदर व मोहक असे मुलीचे पाय बाहेर आले, दुसऱ्याच क्षणी दरवाजा लावला गेला अन त्या सुंदर व मोहक पायाच्या मालकिणीचा सुंदर असा मुखडा दिसू लागला. एखाद्या अप्सरेलाही लाजवेल असे तिचे लावण्य होते, जणू एखादी hollywood ची सिलेब्रीटीच होती ती. गाडीला म्याचिंग असा रेड टोप अन ब्लैक स्कर्ट, हातात रेड-सिल्वर चे कॉम्बीनेशन असलेला मोबाईल अन त्यालाच साजेशी हंड्बग. एलेक्स तिचे सौंदर्य पाहून जागच्या जागीच स्तब्ध झाला, बहुतेक तिच्या मोहक रूपाने त्याचावर जादू केली असावी. एलेक्सच्या हातात फ्रेडी कडून मागवलेली गुलाबांची फुले होती.

"ओह, गुलाबांची फुले! तीही माझ्यासाठी,सो स्वीट ऑफ यु." ती एलेक्सच्या हातातून फुले घेत म्हणाली.
पुढच्याच क्षणी तिने ती पार्किंग लॉट मध्ये असलेल्या मोठ्याशा डस्ट बिन मध्ये टाकली अन एलेक्स कडे कटाक्ष टाकत म्हणाली.
"डोन्ट यु डेअर टू डू दिस वन्स अगैन, समजले!"
एलेक्स तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहतच राहिला. खरे तर तो तिची रागिंग करण्यासाठी तिथे आला होता. गुलाबांच्या फुलांमध्ये त्याने ब्लैक पेपरची पावडर टाकली होती जेणेकरून ती दिवसभर शिंकत राहावी अन त्रासून परत आपल्या पूर्व ठिकाणी निघून जावी. पण झाले उलटेच, तिने तर गुलाबाची फुले घेतली अन कचऱ्याच्या कुंडीत टाकून दिली. एलेक्स पहिल्यांदा कोणाकडून मात खात होता. ती - एलेक्स अन स्टेफनीची पहिली भेट होती. 

क्रमशः
Previous / Next   

No comments: