द एलिअन टेक्नोलॉजी - ch २. शूटिंग स्टार
आकाशात अचानक प्रकाश दिसू लागला, काही तरी पृथ्वीच्या दिशेने वेगात येत होत. आता ते वेगात पृथ्वीच्या कक्षेत शिरलं, तसं त्या वस्तूचा पृष्ठ भाग घर्षण बळ व गुरुत्वाकर्षण बळामुळे ज्वाला उत्पन्न करीत वेग धरू लागला. जसं जसं ती वस्तू जमिनीच्या दिशेने अंतर कापीत होती, तितकाच तिचा वेग अजून वाढत होता.
जर कोणी शास्त्रज्ञ इथं असता तर त्याने ह्या प्रसंगाची तुलना उल्का पाताबारोबरच केली असती. एखादा तरुण प्रियकर त्याला शूटिंग स्टारच म्हणाला असता अन डोळे मिटून त्याने त्या शूटिंग स्टारकडे आपल्या प्रेयसिचीच मागणी केली असती. पण खरोखरीच ती वस्तू म्हणजे एक उल्काच असली तर.
दहा मिनिटापूर्वी पृथ्वीच्या कक्षेत शिरलेल्या त्या वस्तूने बरेचसे अंतर कापले होते. पाच मिनिटानंतर ती पृथ्वीपासून १०००० किलोमीटर अंतरावर होती. दोन मिनिटानंतर ती ६००० किलोमिटरवर होती. अंतर आता अजून कमी होत चाललं होते.
५०००,३००० .... १००० अन ५००. आता ती वस्तू स्पष्ट दिसू लागली होती. तो आगीचा गोळा होता ह्याचाच अर्थ असा कि तो एक आकाशातून धरतीच्या कक्षेत शिरलेला एक उल्कापिंडच होता. आता तो उल्कापिंड त्या घराच्या वरून वेगात जाऊ लागला होता.
धडाम धुडूम ! एखादा ज्वालामुखी प्रज्वलित होऊन फुटून पडावा असा आवाज झाला. उल्कापिंड टेकडीच्या पलीकडील बाजूस जाऊन पडला होता. जिथे उल्कापिंड पडला तिथे जमिनीवर खोल खड्डा झाला.
क्रमशः
No comments:
Post a Comment