"दादा वहिनी कुठे आहे?"
"अग ती शेजारच्या कुलकर्ण्यांकडे गेली आहे,येईल इतक्यात."
"कोण येणार आहे?" मंदा दारातील चप्पालेच्या मांडणी जवळ जोडे काढत म्हणाली.
"हि बघ आलीच." अविनाश म्हणाला.
"अय्या सविता तू , तू केव्हा आलीस ?" एव्हाना मंदा घरात आली होती.
"आताच! वहिनी तू कशी आहेस?" म्हणत सविताने सोफ्यावरून उठून मंदाला करकचून मिठी मारली.
"बरी आहे मी, बर झाले तू आलीस ते खूप दिवस तुला पाहिले नव्हते. ह्यांना कितींदा सांगितले की एक दिवस सविताला भेटून येवू या, पण हे ऐकतील तर शपथ!" मंदा लटक्या रागानेच बोलली.
"मंदाताई, आमचे चंगू-मंगू कुठे आहेत ?" अरुणने घरातून नजर फिरवत विचारले.
"फुटबाल खेळायला गेली आहेत, येतील थोड्याच वेळात. तोपर्यंत मस्त गरम गरम चहा बनवते."मंदा स्वयंपाक घरात जात म्हणाली. "अहो ऐकले का, जरा इकडे या."
अविनाश उठून आत गेले. मंदाने त्यांना दुध नसल्याचे सांगितले, मघाशी त्यांना कोरा चहाच पियावा लागला होता.
"समोरच्या वाण्याच्या दुकानातून एक दुधाची पिशवी घेवून या लवकर.त्याला सांगा चार तारखेला उधारी चुकती करेन म्हणून".मंदा लगबगीने वळली अन चहासाठी भांड्यात पाणी घेवू लागली.
"अरुण सविता येतो मी पाच मिनिटात खाली जावून, तुम्ही बसा गप्पा मारत. आलोच मी." असे म्हणत अविनाश पायात चपला घालून दुध आणायला निघून गेले.
No comments:
Post a Comment