Thursday, May 26, 2011

बंधन - Ch 6


"आई तुला आठवते का, मी एकदा बदक्याला बदडून घरी आलो होतो ते?"
"कोण बद्क्या? तू कधी कोणाला मारले होतेस?"
"अग बदक्या, आपला अरुण ग!" 
"अरुण होय, हो आठवले आता, अन मी तुला खूप मारले होते.आठवलं मला."
"हो, पण तू माझे ऐकूनच घेतलं नाहीस की मी त्याला का मारलं होत. अग आई आम्ही शाळेच्या मैदानात क्रिकेट खेळत होतो, खेळता खेळता अरुण अन नरेश मध्ये बाचाबाची झाली, मी भांडण सोडवायला गेलो तर दोघे माझ्यावरच उलटले,माझ्याशीच भांडू लागले. पण मी शांत होतो. एवढ्यात अरुणने बाबांसाठी अपशब्द काढले. मला ते पटले नाही अन माझा हात त्याच्या डाव्या डोळ्यावर बसला. दुसरा फटका त्याच्या नाकावर मारला तसे बाकी साऱ्यांनी मला पकडले. अरुणच्या नाकातून रक्त वाहत होते. ते पाहून सर्व जन माझ्यावर धावून आले. अन पुढे तुला माहित आहे, काय झाले ते."

"पुढे तुला आईने बेदम मारले होते."सविता उघड्या दारातून आत शिरत म्हणाली.
"अन माझ्या आईने मला." सविताच्या मागोमाग आत शिरत अरुण म्हणाला.

"तुम्ही दोघ, अन ह्यावेळी इथे?" अविनाश थोड्याश्या आश्चर्यानेच म्हणाला.अरुण - सविता आईच्या पाया पडत होते.
"आयुष्यमान भाव, सुखी राहा पोरानो." आई थरथरते हात दोघांच्या मस्तकावर ठेवीत म्हणाल्या. 
"का नाही मी माझ्या सासुरवाडीस येवू शकत नाही का? का अजून लहानपणीचा राग गेला नाही वाटत? अरुण आईच्या बाजूस बसत जरा नाटकीपणानेच म्हणाला.
"अरे खरेच तसे काही नाहीतुम्ही गेली चार वर्षे नागपुरात होतात ना म्हणून विचारले" अविनाश स्पष्टीकरण देत म्हणाला. 
"अरे दादा, कालच ह्यांची बदली इथे झाली. सामानाची लावालाव करता करता वेळ नाही मिळाला नाहीतर सकाळीच येणार होतो." सविताने अरुणला बोलू न देता संभाषणावर ताबा मिळवला. 

No comments: