disclaimer - ही कथा व कथेतील सर्व पात्रे संपूर्णतः काल्पनिक आहेत. मनोरंजन हा शुद्ध हेतू मनाशी बाळगून मी ही कथा लिहित आहे. कथेतील पात्रांचा जीवित अथवा मृत व्यक्तींशी काहीही सबंध नाही. आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा. कथेत घडणारे काही प्रसंग माझ्या स्वतःच्या जीवनातून घेत आहे अन्यथा ही एक काल्पनिक कथा आहे हे लक्षात घ्यावे.
characters - अविनाश मांजरेकर, मंदा मांजरेकर, निर्मलाबाई - अविनाशची आई, शंकरराव - अविनाशचे वडील (शहीद) सैनिक, अजित व सुजित - अविनाश व मंदा ची मुलं, अरुण उर्फ बदक्या - अविनाशचा मित्र, सविता - अविनाशची बहिण .
३०२ ची बेल जोरात कोणीतरी वाजवत होते. दरवाजावरील नेम - प्लेट वर Mr & Mrs Manjrekar असे सुवर्ण अक्षरात लिहिले होते.
"आले आले, जरा दम धीर आहे की नाही?" आतून आवाज आला.
मंदांनी हळूच दरवाजा उघडला. दारात ३८ -४० वर्षांचे गृहस्थ थकलेल्या अवस्थेत दाराची बेल वाजवत होते. दरवाजा उघडताच ते दाराला बळेच मागे लोटून देत नजीकच्या सोफ्यावर बसले. हातातील कामाची BAG समोरील टेबलावर त्यांनी सरकावून दिली आणि पायातील बूट मोजे काढीत बसले. BAG च्या ओळखपत्रावर ठळक अक्षरात लिहिले होते, "अविनाश मांजरेकर". ती एका बँकेची BAG होती.
"हे घ्या, पाणी!" मंदा पाण्याने भरलेला ग्लास अविनाशच्या समोर धरत म्हणाल्या.
अविनाशांनी मंदाच्या हातातून पाण्याचा ग्लास घेवून गटागटा करीत एका दमात पिऊन संपवला.
"अहो सावकाश जरा, ठसका लागला असतातर ?" मंदा काळजीच्या स्वरात उतरल्या.
"हं!!" अविनाश मंदाचे बोलणे ऐकून न ऐकल्या सारखे करत रेमोट् ने TV चालू करण्याच्या प्रयत्नात होते.
"काही फायदा नाही, सकाळीच केबलवाल्याला सांगून TV ची केबल काढून टाकली आहे." मंदा म्हणत होत्या, "अजित - सुजित अभ्यासच करत नाहीत, दिवसभर TV लावून काय ते कार्टून channel वर कार्टून बघत असतात. दोन आठवड्यांवर परीक्षा आली आहे, अभ्यास नको का करायला?"
" जीव तोडून सांगितले कि अभ्यास करा - अभ्यास करा, पण कोणी ऐकेल तर शपथ." मंदा जरा श्वास घेत म्हणाल्या," त्यांच्यासाठी मी सुट्टी घेवून घरी बसले आहे, तर हि बघा आता कुठे तरी पार्कमध्ये फुटबाल घेवून खेळायला गेलीत."
"अग्ग जावू दे गं, मुलांनी नाही खेळायचे तर काय आपण म्हाताऱ्यानी खेळायचे का फुटबाल? अन काय गं काय अभ्यास - अभ्यास करतेस, माझी दोन्ही मुलं खूप हुशार आहेत. नेहमीच First क्लासने पास होतात, अजून काय हवंय?"
क्रमशः
No comments:
Post a Comment