Monday, May 30, 2011

द एलिअन टेक्नोलॉजी - ch ३. शोधाशोध

ch ३. शोधाशोध 

एखादा ज्वालामुखी प्रज्वलित होऊन फुटून पडावा असा आवाज झाला. उल्कापिंड टेकडीच्या पलीकडील बाजूस जाऊन पडला होता. 

एलेक्स त्या आवाजाने खडबडून जागा झाला. रात्री बिअर पिता -पिता तो अंगणातील आराम खुर्चीवर कधी झोपी गेला हे त्याचे त्यालाही कळले नव्हते.तो खुर्चीवरून विजेच्या चपळाईने उठला अन धावत घरात गेला. त्याला एका कोपऱ्यातील सोफ्यावर स्टेफनी झोपलेली दिसली. तिचा उजवा हात जमिनीकडे खाली झुकलेला होता. जवळच बिअरची रिकामी बाटली आडवी पडलेली होती. तिचा डावा पाय सोफ्याच्या Back वर होता. ती अजून झोपेत होती म्हणजे तिची नशा अजून उतरली नव्हती नाही तर तो आवाज ऐकून एखादा बहिरासुद्धा जागा झाला असता. 

तिला बिअर घेण्यासाठी फोर्स करून आपण चुकी केली असे एलेक्सला वाटले.पण तिला सुरक्षित पाहून त्याला हायसे वाटले.त्याच्या चेहऱ्यावर समाधान पसरले होते. एलेक्स पुन्हा वळला अन धावतच बाहेर आला. बाहेर त्याच्याप्रमाणेच भांबावलेले चेहरे घेऊन जॉन आणि बेला इकडे-तिकडे काहीतरी शोधण्याचा प्रयत्न करीत होते.
 
जॉनच्या हातात जंगल कार्बाईन नावाची राइफल होती व ती समोर रोखून धरत इकडे तिकडे शोधत होता, जणू काही तो जंगलात शिकारच करत आहे. जॉनने खुणेने बेलाला तबेल्याकडे जाण्यास सांगितले व तो स्वतः तळ्याच्या दिशेने जाऊ लागला.

एलेक्स आता जॉन अन बेलाची प्रतिकृती करत समोरील मक्याच्या शेतात शिरला. त्याच्या हातात कंदील होता त्याच्या प्रकाशात तो धावत धावत मार्ग काढीत होता. काही अंतरावर त्याला ती पिके एकाबाजूस कोलमडलेली दिसली. तो अजून पुढे जाऊ लागला. अचानक त्याच्या लक्षात आले कि समोरची काही पिके गायब आहेत. तो थेट त्या ठिकाणी जाऊन पोहचला. तिथली पिके काढून कोणीतरी बाजूला व्यवस्थित रचून ठेवली होती. त्याने कंदील जरा खाली नेला. खाली जमिनीवर घोंगडी अंथरलेली होती. जवळच चार पाच बिअरच्या बाटल्या पडलेल्या होत्या. त्याच्या बाजूला ड्यूरेक्सचे फोडलेले पाकीट पडलेले होते. ते फोडताना पाकीट फोडनाऱ्याला बहुदा फारच घाई झाली असावी, असे त्या पाकिटाच्या अवस्थेवरून दिसत होते. जवळच कोण्या एका स्त्रीची आंतरवस्त्रे पडली होती. 

एलेक्स आता गालातल्या गालात हसू लागला होता. त्याला तिथे घडलेला प्रकार लक्षात येत होता. ती अस्थाव्यस्त पडलेली आंतरवस्त्रे दुसऱ्या-तिसऱ्या कोणाची नसून बेलाची होती अन पाकीट फोडणारा जॉन होता.  अचानक त्याला कोणाची तरी किंकाळी ऐकू आली. आवाज घराच्या दिशेने आला होता. एलेक्सच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. तो घराच्या दिशेने धावू लागला.

एलेक्स आता घराच्या आवारात आला, समोर जॉन व बेला स्टेफनीचे सांत्वन करताना दिसत होते.
"म्हणजे ती स्टेफनी होतीतर " एलेक्स स्वतःशीच पुटपुटला.
"हो, ती आत घरात झोपली असताना तिच्या अंगावर काहीतरी जोरात पडले." बेला म्हणाली.
"अन मी उठून बघितले तर भला मोठा लिझार्ड माझ्या पायाशेजारी सोफ्यावर होता." बेलाचे वाक्य पूर्ण करत स्टेफनी म्हणाली."मी फारच घाबरले होते."
"ठीक आहे, ही थोडी बिअर पी म्हणजे तुला बरे वाटेल" जॉन तिला समजावण्याचा आविर्भावात म्हणाला.
"नको काही, तिने रात्री खूपच घेतली होती. तिचे डोके जड झाले असेल." एलेक्स जॉनकडे रागाने बघत म्हणाला. "आधी तिला आत नेऊ या."
"जशी तुझी मर्जी" जॉन खांदे उडवत म्हणाला.
चौघेही आता घराच्या दिशेने फिरले अन जागच्या जागीच थबकले. समोरचे दृश्य पाहून सगळेच चाट पडले होते.

क्रमशः 
  

1 comment:

Suraj said...

Are bhai fast track hai....jara dheere......!