दुपारचे दोन वाजले होते. अजित - सुजित दोघंही टीव्हीवर कार्टून बघत बसले होते. कार्टून नेटवर्कवर दुपारचा टोम अंड जेरी चा एक तासाचा शो लागला होता. दोघंही आपली तहान भूक विसरून तो कार्यक्रम अतिउत्साहाने बघत होते, त्याचा हा लाडका कार्यक्रम जो होता. एकच्या सुमारास त्यांची शाळा सुटायची, जवळपास दीड वाजता ती दोघ घरी परतायची. कपडे बदलून ती हातपाय -तोंड धुऊन जेवायला बसायची. जेवण उरकल्या - उरकल्या टीव्ही सुरु व्हायचा तो संध्याकाळी साडे-पाच वाजेपर्यंत चालायचा. त्यांचा हा नित्य कार्यक्रम ठरलेला असे. सहा वाजता मित्रांबरोबर दोघंही खेळायला निघून जात.
पण आजची गोष्ट वेगळी होती. आज पासून त्यांना सुट्टी लागलेली होती.दोनच आठवड्यांवर वार्षिक परीक्षा येवून ठेपली होती. आणि हि सुट्टी परीक्षेपूर्वी अभ्यासासाठी मिळणारी सुट्टी होती. अजित - सुजित अभ्यास तर सोडाच, पण सकाळ पासूनच मस्ती करत, टीव्ही बघत दिवस घालवत होते. दुपारचे दोन वाजले होते अन CN वर Tom & Jerry चा वन हवर स्पेशल शो लागला होता. दोन्ही मुलं तो कार्यक्रम बघण्यात गुंग होऊन गेली होती.
"अजित - सुजित, जेवायला वाढले आहे, चला जेवून घ्या." मंदाने आतून आवाज दिला.
"हं ! तू वाढ आम्ही येतोच." अजित टीव्ही बघतच म्हणाला.
"कधी पासून वाढून ठेवलाय, आता येता की मी येऊन टीव्ही बंद करू." मंदा बाहेर येत म्हणाली.
"येतो ना आई, जरा हा कार्यक्रम संपू दे ना." सुजित इवलसे तोंड करीत म्हणाला.
"ते काही नाही पहिले जेवण." मंदा टीव्हीचा रिमोट उचलीत म्हणाली.
"आम्ही जेवणार नाही, आम्हाला नाही भूक" अजित - सुजित एका सुरात म्हणाले.
मंदा टीव्ही बंद करणार इतक्यातच टीव्हीवरील चित्र नाहीसे झाले, आता पर्यंत टोम जेरीला पकडण्या करता त्याच्या मागे धावत एका पाण्याच्या जहाजात शिरला होता. टीव्हीवरील चित्राच्या जागी आता काळ्या अन सफेद मुंग्या दिसू लागल्या होत्या. खर्र - खर्र असा आवाजही टीव्हीतून येत होता.
दोन्ही मुलांचा चेहरा पडलेला दिसत होता, तर मंदाच्या चेहऱ्यावर विजयी हास्य होते. सकाळीच केबलवाला महिन्याचे पैसे मागण्यासाठी आला होता, तेव्हा तिनेच त्याला केबल काढायला सांगितली होती. तिला माहिती होत, की टीव्ही चालू असे पर्यंत अजित-सुजित काही अभ्यास करणार नाहीत.
जेवणानंतर मंदाने दोन्ही मुलांना जबरदस्तीने अभ्यास करायला बसवले. अजित - सुजित दोघंही मन मारून अभ्यासाला बसले. खरं-तर मंदाने ह्यासाठीच कामातून सुट्टी घेतली होती. ती एका अंगणवाडी शाळेची शिक्षिका होती, तिला लहानपणापासूनच लहान मुलांना शिकवण्याची आवड होती व तिने ती आवड सत्कामी लावली होती.
क्रमशः
5 comments:
Bandhan che rahilele bhag kute milnar vachayala. Bandhan Last ch 8 27 May la post kela aahe tyanantar kahich nahi.
डियर एक्स, काही कारणांमुळे बंधनचे पुढील भाग लिहू शकलो नाही. खरेतर बंधन लिहिता लिहिता द एलियन टेक्नॉलजी चा साक्षात्कार झाला अन द एलियन टेक. लिहिताना बंधनची लिंक तुटली. बंधन वर लिहिणे चालू केले आहे काही दिवसात पुढील भाग प्रदर्शित करेन. आपल्या प्रतिसदाबद्दल धन्यवाद. जर आपण आपले नाव लिहिले असते तर आपले नाव मी जरूर ध्यानात ठेवले असते,कारण बंधन ही मला सगळ्यात जवळची कथा आहे. धन्यवाद.
धन्यवाद, मी मनिष. बंधन ची आतुर तेने वाट पाहत आहे.
धन्यवाद मनीष. लवकरच बंधनचा पुढील भाग प्रदर्शित होईल.
मनीष आपल्यासाठी पुढचा भाग लिहिला आहे.आपण वाचून प्रतिक्रिया द्यालअशी आशा आहे.
Post a Comment