द एलिअन टेक्नोलॉजी - ch १०. डॉ आल्फ्रेड स्पेंस
स्फिनिक्स ग्रहाच्या स्पेसस्टेशनच्या एका स्पेसशिपमधून निघालेले ते स्पेसशटल मिल्की वे गॅलेक्सीकडे वेगाने चालले होते. आता ते स्पेसशटल मॅजलॅनिक गॅलेक्सीमधील एका ब्लॅकहोल जवळ आले.
ब्लॅकहोल हा एका डायमेंशनमधून दुसऱ्या डायमेंशनमध्ये जाण्याचा एक मार्ग आहे हे स्फिनिक्शिअन्सनी आधीच जाणून घेतले होते. प्रत्येक गॅलेक्सीत असे एक ब्लॅकहोल तरी असतेच, जसे ब्लॅकहोल दुसऱ्या डायमेंशन मध्ये जाण्याचा एक मार्ग आहे तसाच तो त्या दुसऱ्या डायमेंशनमधून ह्या डायमेंशनमध्ये येण्याचा ही मार्ग आहे. अश्या ६४ डायमेंशनचा स्फिनिक्शिअन्सनी शोध लावला होता. या डायमेंशन बद्दल माहिती मिळवून, डॉ आल्फ्रेड स्पेंस निरनिराळे शोध करीत होते. त्याचा एक महत्वाचा शोध पूर्ण विश्व बदलू शकणार होता, त्यात ते जवळजवळ यशस्वी ही झाले होते.
डॉ स्पेंस आपल्या प्रयोग शाळेत काम करीत होते. त्यांच्या टेबलावर एक इलेक्ट्रोनिक नोटपॅड होते, त्यांच्या हातात पेनासारखी एक वस्तू होती. टेबलावर समोरच काही प्रयोगांचे सामान होते. इलेक्ट्रोनिक मशीन्स, चौकोनी काचेची भांडी, लेसर मशीन्स असे वेगवेगळे प्रयोगात लागणारे सामान तेथे होते.
डॉ स्पेंसनी टेबलावरील इलेक्ट्रोनिक नोटपॅड उचलले अन त्यावर हातातील पेनासारख्या वस्तूने लिहू लागले. ती वस्तू म्हणजे एक लेझर पेन होता. त्यांनी नोटपॅडवर एक फॉर्मुला लिहिला अन पुन्हा नोटपॅड खाली ठेवले. आता ते मागे वळून पाहू लागले. त्यांच्या मागे एक मोठीशी इलेक्ट्रोनिक मशीन होती. त्या मशिनच्या समोरील बाजूस काच लावलेली होती. ती इलेक्ट्रोनिक मशीन एखाद्या मोठ्या मायक्रोवेव मशीन सारखी भासत होती. मशिनच्या आत अति सूक्ष्म असे प्रोटोन्स अन मायक्रोंस ठेवण्यात आले होते.
डॉ स्पेंसने मशीनचे एक बटन दाबले. मशीनमध्ये असलेली लेझर बीमची उपकरणे आता त्या प्रोटोन्स व मायक्रोन्सवर निशाणा साधून उभी होती. डॉ स्पेंसने अजून एक बटन दाबले. त्या लेझर बीम्स मधून गॅमा, झॉल्टा, क्सेमा अशा प्रकारची निरनिराळी किरणे निघू लागली. काही वेळातच तिथे आग लागून धुराचे लोट निघावेत तसा धूर निघू लागला. काही वेळातच त्या धुरापासून ढग तयार झाला. आता त्या ढगावर प्रक्रिया चालू होती.
२ तास उलटून गेले होते. ढगाचे रुपांतर आता एक गोल काळ्या द्रव पदार्थात झाले होते. गुरुत्वाकर्षणाच्या नियमानुसार त्या द्रव पदार्थाला मशिनच्या आतील पृष्ठ भागावर पसरले पाहिजे होते, या उलट ते हवेत इकडून तिकडे उडत होते. तो पदार्थ इकडून तिकडे उडत असताना तो स्वतःभोवती ही फिरत होता, जणू एक छोटी पृथ्वीच परिवलन आणि परिभ्रमण या दोन्ही क्रिया करीत असावी. हळूहळू तो द्रव पदार्थ एका विशिष्ट लयबद्ध पद्धतीने फिरू लागला.
डॉ स्पेंस त्या पदार्थाच्या क्रियेकडे लक्ष्य देऊन निरीक्षण करत होते. ते अगदी मशिनच्या काचे जवळ जाऊन पाहू लागले. त्यांच्या नजरेत काही तरी आले होते. तो एक अतिसूक्ष्म असा पाऱ्यासारखा दव बिंदू होता. काळा द्रव पदार्थ खरेतर याच पदार्थाभोवती प्रदक्षिणा घालत होता. तो कदाचित त्यापृथ्वीचा सूर्य असावा. डॉ स्पेंसने गती वाढवण्यासाठी असलेले बटन दाबले, तशी त्या द्रव पृथ्वीने सूर्याभोवती प्रदक्षिणा घालण्याची आपली गती वाढवली. गती वाढवल्यामुळे त्या द्रव पृथ्वीच्या कक्षेत फरक पडला ती आता त्या सूर्याच्या अगदी जवळून फिरू लागली. डॉ स्पेंसने पुन्हा गती वाढवली आता पृथ्वीच्या लयबद्धतेत फरक पडला ती कधी सूर्याच्या एकदम जवळून जाई तर कधी दुरून. असे करता करता पृथ्वी त्या सूर्याला जावून थडकली. पाण्यात जसा टोरपॅडो मिसाईल आपल्या निशाण्यावर जावून स्फोट करतो तसा स्फोट झाला. पृथ्वीचे द्रवावरण छिन्नविछिन्न झाले, पृथ्वी छोट्या छोट्या भागात विभागली गेली. त्या ही परिस्थितीत त्या भागांचे सूर्याभोवती फिरणे चालूच राहिले. हळूहळू त्या भागांनी सूर्याभोवती आवरण निर्माण केले. ते पदार्थ पुन्हा एकरूप झाले यात सूर्य त्यांचा केंद्र बिंदू बनला.
डॉ स्पेंसने गती वाढवली. नवीन निर्माण झालेल्या द्रव पदार्थाने स्वतःभोवती फिरणे चालू ठेवले होते. फिरता फिरता या पदार्थामध्ये गुरुत्वाकर्षण शक्ती निर्माण होवू लागली. डॉ स्पेंस ने यावेळेस पाच पटीने गती वाढवली. त्या पदार्थाची गुरुत्वाकर्षण शक्ती एवढी वाढली कि प्रक्रियेत निर्माण झालेले अन्य पदार्थ जे इतरत्र पडले होते त्यांना तो स्वतःकडे खेचून आपल्यात सामावून घेत होता.
डॉ स्पेंसच्या चेहऱ्यावर आनंद दिसू लागला. त्यांनी एक छोटा कृत्रिम ब्लॅकहोल तयार केला होता. त्यांनी टेबलावरील नॊटपॅड पुन्हा उचलले अन त्यावर पूर्ण प्रक्रियेची नोंद केली. आता त्यांनी मशीनचे अजून एक बटन दाबले. ती मशीन आता त्या ब्लॅकहोलवर पुन्हा प्रक्रिया करू लागली होती.
इतक्यात डॉ स्पेंसची असिस्टन्ट धावत प्रयोग शाळेत शिरली. ती तरुण मुलगी फारच घाबरलेली दिसत होती.
"क्षिना, तू फारच घाबरलेली दिसतेस. काय झाले मला सांग." डॉ स्पेंसने क्षिनाला विचारले.
"डॉक्टर, आपल्याला इथून लवकरच निघावे लागेल. तुमचा जीव धोक्यात आहे". क्षिना
"काहीही वेड्या सारखे बडबडू नकोस." डॉ स्पेंस
"डॉ स्पेस सेंटर मधील प्रयोग शाळेतून प्रयोगाचे पदार्थ आणताना तिथल्याच जवळच्या मीटिंग रूम मध्ये चाललेल्या मिलिटरी मीटिंग मी चोरून ऐकली आहे."
"काय अन तू हे सगळे केलंस,पण कश्यासाठी?"
"डॉक्टर तिथे कमांडर ग्रेगर म्हणत होता कि वरून ऑर्डर आली आहे. डॉ स्पेंसचे प्रयोग संपल्यावर, आपल्याला त्यांनाही संपवायचे आहे, तेही अगदी चुपचाप कोणालाही खबर न होता."
"डॉक्टर तो पुढे म्हणाला कि त्याच्या प्रयोगापासून जे तंत्रज्ञान मिळेल त्याला पुढे विकसित करून आपण एक विध्वंसक यंत्र बनवणार आहोत. यात डॉक्टर स्पेंस अडथळा निर्माण करेल, त्याआधीच त्याला संपवायचे आहे."
"डॉ तुम्हाला लवकरात लवकर हा ग्रह सोडून निघावे लागणार आहे. माझ्या माहिती नुसार मिल्की वे गॅलेक्सीत पृथ्वी नावाच्या ग्रहावर जीवन आहे. त्या ग्रहावर आपल्या ग्रहासारखे वातावरण असण्याची शक्यता आहे. मी सुद्धा हा ग्रह सोडण्याची तयारी करत आहे. तुम्ही पुढे निघा."
मशीनने ब्लॅकहोलवर प्रक्रिया करून एक घनत्व असलेला पदार्थ तयार केला होता. डॉ स्पेंसने मशीन बंद केली व तिचा दरवाजा उघडला. आतील पदार्थ त्यांनी एका मोठ्या चिमठ्याने उचलून काचेच्या बंद डब्यात ठेवला. तो डब्बा त्यांनी आपल्या कवचाच्या कप्प्यात ठेवला. डॉक्टर स्पेंसने हातातील नॊटपॅड कवचाच्या दुसऱ्या कप्प्यात ठेवले.आता एका क्षणाचाही विलंब न करता ते व क्षिना दोघे ही धावत प्रयोगशाळेबाहेर पडले.
स्पेसशटलला लागणाऱ्या दचाक्यामुळे क्षिना भूतकाळातून वर्तमान काळात आली. तिला पाच वर्षापूर्वी घडलेल्या गोष्टींचे स्मरण होत होते.स्पेसशटलला बसणारे धक्के वाढले होते. त्याधक्क्यांचे कारण होते समोरचे ते ब्लॅकहोल.
ब्लॅकहोल स्पेसशटलला आपल्याकडे ओढून घेत होते. काही वेळातच त्या स्पेसशटलला ब्लॅकहोलने आपल्यात सामावून घेतले.
क्रमशः
No comments:
Post a Comment