द एलिअन टेक्नोलॉजी - ch ६. पूर्वभाग - डॉ जोन्सचा सिक्रेट मेसेज
एक ब्लॅक कलरची ओल्ड GMC SAFARI पूर्व कॅनडाच्या दिशेने धावत होती. रस्ता सुनसान होता, रस्त्याच्या दुतर्फा जंगलही होते. पावसाची रिमझिम धारा आकाशातून कोसळत होत्या. अशातच एलेक्स ड्राइव करत होता. अधून - मधून डेस्क बोर्ड वरील बटन दाबून एलेक्स विंडस्क्रीन वाईपरने साफ करीत होता.
"एलेक्स, आपण कुठे चाललो आहोत?", एलेक्सच्या बाजूच्या सीटवर बसलेली स्टेफनीने विचारले.
"हम्म." एलेक्स आपल्याच धुंदीत गाडी चालवत होता.
" ए एलेक्स सांग ना रे." स्टेफनी लाडवत म्हणाली.
"काय सांगू ?" एलेक्स.
"हेच कि आपण कुठे चाललो आहोत ते."स्टेफनी.
"अरे सांगून टाक ना एकदाचं, तिची कटकट तरी मिटेल." मागच्या सीटवर बसलेला जॉन वैतागून म्हणाला.
"मी सांगितले होते ना तुला आधीच" एलेक्स गाडीवरून लक्ष्य न हटवता म्हणाला.
"काय सांगितले होतेस?" आता बेलाने न राहवून प्रश्न केला.
"अरे आपण माझ्या ग्रॅन्डफादरच्या घरी चाललो आहोत."
"पण कुठे?" स्टेफनीचा उतावीळपणा तिच्या प्रश्न वरून दिसून येत होता.
"पूर्व कॅनडातील एक छोट्या गावात, इस्ट-आल्डफिल्ड मध्ये."
"बरे झाले मी हे बिअरचे बॉक्स घेवून आलो ते, नाहीतर त्यागावात कुठे मिळणार आहे बिअर वगैरे?" जॉन फुशारक्या मारीत म्हणाला.
इस्ट-आल्डफिल्ड मधील पोलीस स्टेशन मध्ये...
एका लाकडी खुर्चीवर डिटेक्टीव एन्ड्रू ब्लान्क बसला होता. समोरील टेबलावर काही फाईल्स विखुरलेल्या अवस्थेत पडलेल्या होत्या. त्या टेबलासमोर अजून दोन रिकाम्या खुर्च्या ठेवल्या होत्या. डिटेक्टीव ब्लान्क एक फाईल घेवून मोठ्या बारीकीने कसले तरी अध्ययन करत होता.इतक्यात...
इतक्यात एक ब्लॅक कलरची ओल्ड GMC सफारी पोलीस स्टेशनच्या आवारात येवून थांबली. करकचून दबलेल्या ब्रेक मुळे झालेल्या आवाजाने ब्लान्क चे लक्ष्य ओढून घेतले. गाडीतून दोन सुंदर तरुणी अन दोन तरुण उतरून त्याच्याच दिशेने चालत येत होते. चौघे जवळपास २३-२५ वयोगटातील असावेत असा ब्लान्क ने अंदाज बांधला. दोघी तरुणी फारच सुंदर होत्या, एकीचे केस कुरळे होते डोळ्यावर बारीक काडीचा चष्मा, व्हाईट शर्ट व त्यावर ब्राऊन कलरचे जॅकेट अन ब्लॅक कलरची स्कीन फिटिंग जीन्स असा तिचा पेहराव होता, तर दुसरीने रेड कलरचा हलका पारदर्शी स्ट्रॅपलेस मिनी ड्रेस घातला होता. त्या ड्रेस मधून तिच्या भरीव अंगाचे प्रदर्शन होत होते. तिचे गुलाबी रसाळ ओठ अन तिचे काळे केस तिचे सौंदर्य वाढवत होते. तिने ब्लॅक कलरचा गॉगल घातला होता.
"मी एलेक्स ब्लडगुड, डॉ जोन्स माझे ग्रॅन्ड्फादर आहेत." व्हाईट शर्ट अन ब्लू जीन्स घातलेला तरुण ब्लान्क कडे शेकहॅन्डसाठी हात पुढे करीत म्हणाला.
"अच्छा, मी डिटेक्टीव ब्लान्क" ब्लान्क एलेक्सशी शेकहॅन्ड करीत म्हणाला."अन हे?"
"मी जॉन, एलेक्सचा मित्र." ग्रीन टी-शर्ट अन ब्लू जीन्स घातलेला युवक उतरला.
"हि स्टेफनी" एलेक्स रेड कलरचा हलका पारदर्शी स्ट्रॅपलेस मिनी ड्रेस घातलेल्या युवतीकडे बोट दाखवीत म्हणाला.
"अन मी बेला." बेला आपली ओळख दाखवत म्हणाली.
"एलेक्स, बॉडी पोस्ट-मार्टम साठी पाठवली आहे. उद्या सकाळी तुम्ही ती पाहू शकता." ब्लान्क सरळ मुद्द्याकडे वळत म्हणाला.
"ठीक आहे, मग आम्ही उद्याच येवू." एलेक्स
"ह्या आहेत जोन्सच्या घराच्या किल्ल्या. अन ही डायरी, आम्हाला जोन्संच्या घराची झडती घेताना सापडली. त्यात त्यांनी काही प्रयोगांचे नोटस लिहून ठेवले आहेत." ब्लान्क.
डॉ. जोन्सच्या घरी...
एलेक्स लाकडी आराम खुर्चीवर झोके घेत बसला होता. समोरच सोफ्यावर स्टेफनी व बेला बोलत बसल्या होत्या. जॉन कोपऱ्यातील खिडकीच्या ओट्यावर हातात बिअरचा कॅन घेऊन बसला होता. तो अधून मधून बिअरचे छोटे-छोटे सिप घेत होता.
"काय एलेक्स यार कुठे आणले आहेस आम्हाला?" जॉन तोंड वेडे-वाकडे करत म्हणाला.
"एकाच दिवसाचा प्रश्न आहे. तू जरा धीराने घे ना." बेला.
एलेक्स जागेवरून उठला, त्याच्या चेहऱ्यावर विचारांचे सावट पसरले होते. तो सरळ चालत गेला अन एका टेबलाजवळ जाऊन उभा राहिला. त्या टेबलावर डॉ जोन्सची डायरी ठेवली होती, एलेक्सने ती उचलली अन पुन्हा त्या आराम खुर्चीवर जावून बसला. आता तो त्या डायरीची पाने चाळत बसला, प्रत्येक पानावर डॉ. जोन्सने काही प्रयोगांचे नोटस लिहिले होते. शेवटच्या पानावरही काही नोटस लिहिले होते, तारीख होती ९ दिवसांपूर्वीची, त्या दिवसापासूनच डॉ. जोन्स गायब झाले होते. एलेक्स ते पान बारीकीने पाहत होता.
"ओह, माय गॉड." एलेक्स आश्चर्याने ओरडला. "स्टेफ यु हॅव टु सी धिस."
जॉन, स्टेफनी, आणि बेला धावतच एलेक्सपर्यंत पोहचले होते. एलेक्सने पाय ठेवायचा स्टूल जवळ ओढून घेतला.आता त्याने हातातील डायरी त्या स्टुलावर ठेवली. अन जॉन कडे पाहत म्हणाला.
"जॉन तुझी पेन्सिल दे."
जॉन एक आर्टिस्ट होता, तो नेहमी ड्रॉइन्ग काढण्यासाठी जवळ एक पेन्सिल अन ड्रॉइन्ग बुक बाळगत असे. जॉनने आपली पेन्सिल बागेतून काढून एलेक्सला दिली.एलेक्स पेन्सिल घेऊन डायरीच्या पानावर वाकड्या तिकड्या रेषा काढत बसला होता.
"हे बघा, या इथे माझे नाव लिहिले आहे." एलेक्स पानावर काढलेल्या रेषेकडे बोट दाखवत म्हणाला.
त्याने पहिल्या पॅराग्राफच्या प्रत्येक ओळीचे पहिले अक्षर त्याने एका रेषेने जोडले होते. त्यापासून एक वाक्य तयार होत होते. "एलेक्स, यु मस्ट टू रीड धिस."
जॉनच्या तोंडातून अस्पष्ट शीळ निघाली, तो म्हणाला." एलेक्स, हि लेफ्ट अ सिक्रेट मेसेज फॉर यु."
"यु आर अॅब्सोलुटली राईट", एलेक्स म्हणाला, "आता हे बघ."
एलेक्स पुन्हा त्या पानावर रेषा ओढू लागला. आता ह्या वेळेस त्याने प्रत्येक ओळीच्या शेवटचे अक्षर जोडून एक मेसेज तयार केला.
"Find your Father. His life is in danger. Alie..."
इतकाच मेसेज डॉ. जोन्स लिहू शकले होते. पुढील पॅराग्राफ अर्धवट लिहिला गेला होता. एलेक्स विचारात बुडून गेला.
डॉ. जोन्सचे काय झाले असावे? माझ्या वडिलांचा याच्याशी काय संबंध? ते आता सध्या कुठे असतील? त्यांचा जीव कशा मुळे धोक्यात आहे? आणि हे Alie काय आहे???.
क्रमशः
No comments:
Post a Comment