द एलिअन टेक्नोलॉजी - ch १२. ब्लॅकहोलचा प्रवास - काळ
क्षिनाचे स्पेसशटल आता पुर्णपणे ब्लॅकहोलमध्ये शिरले होते. पुढचा प्रवास फारच कठीण होता. त्या ब्लॅकहोलमध्ये पुढे काय अडचणी सामोर्या येतील याचा तिला पूर्ण अंदाज नव्हता. तिचा तो पहिलाच ब्लॅकहोलचा प्रवास होता, परंतु तरीही तिने तो प्रवास स्वीकारला होता अन त्याशिवाय तिच्याकडे दूसरा जलद असा मार्गच नव्हता.
क्षिनाचे स्पेसशटल ब्लॅकहोलमध्ये भरकटले जाऊ लागले. त्याच्या रडारवर दिशेसबंधी माहिती दिसणे बंद झाले होते. असे असतानाच स्पेसशटल हेलकावे खाऊ लागले, त्यावर ब्लॅकहोलमध्ये खेचल्या जाणार्या इतर वस्तूंचा मारा होऊ लागला होता. स्पेसशटल शून्यात जावे तसे एका पूर्ण काळोख्या गोल आकृतीकडे भरकटत जाऊ लागले.
स्पेसशटलचे हेलकावे थांबले होते, ते पुर्णपणे आता दुसर्या डायमेंशन आले होते. रडारवर आता दिशा निर्देश होवू लागला होता. पण समोर जे दृश्य दिसत होते ते पाहून क्षिना आश्चर्यचकित झाली. तिला सर्वत्र फक्त पाणीच पाणी दिसत होते. ते जल डायमेंशन होते. इथं धरतीचा लवलेश नाममात्रही नव्हता, अन् आकाशाचे तर नावच नव्हते, सगळी कडे फक्त पाणीच पाणी.
स्पेसशटल पाण्यात बुडून चालले होते. क्षिनाने डॅशबोर्डवरील एक लिवर मागच्या बाजूस खेचले तस ते शटल पाण्यात पाणबुडीप्रमाणे तरंगू लागले. क्षिनाने स्पेसशटल उत्तर-पूर्व असे वळवून घेतले अन् आता प्रवास पुन्हा चालू झाला होता. काही अंतर कापल्यावर क्षिनाला काही मोठे काळे गोल पाण्यात इतरत्र तरंगताना दिसले, ते गोल म्हणजे दुसरे तिसरे काही नसून दुसर्या डायमेंशनमध्ये जाण्याचे मार्ग होते. तिने त्यातील चवथा गोल निवडला अन ती त्या गोलाकडे जावू लागली. जसजस ते स्पेसशटल त्या गोलाकडे जात होत तसतस पाणी त्या स्पेसशटलला मागे ढकलत होते. काही केल्या स्पेसशटल गोलापर्यंत पोहचतच नव्हते. शेवटी वैतागून क्षिनाने जेलटेक नावाचे इंजिन सुरू केले. इंजिन सुरू करताच स्पेसशटलने वेग धरला तीन सेकंदातच ते शटल त्या डायमेन्शन मधून बाहेर पडले.
स्पेसशटल कोणत्यातरी एका गॅलेक्सीत आले होते. क्षिना स्वतःजवळील इलेक्ट्रो-मॅग्नेटिक इन्टर गॅलेक्टीक स्पेस मॅप वापरू पाहत होती. परंतु मॅप मध्ये काहीच दिसत नव्हते. म्हणजे ती तिच्या डायमेंशन मध्ये परतली नव्हती, कुठल्या तरी दुसर्याच डायमेंशन मध्ये आली होती.
अचानक स्पेसशटल समोर एका प्रकाशाचा उगम झाला, थोड्याच वेळात त्या प्रकाशाने पूर्ण गॅलेक्सी व्यापून घेतली. तिने स्पेसशटलच्या कॅमेर्याने घेतलेली विडियो फुटेज रिवाइंड केली अन ती रडारच्या बाजूलाच असलेल्या स्क्रीनवर पाहू लागली. दोन मोठे गोल एकमेकांवर आदळले होते. त्यांच्या आदळण्याने झालेल्या स्फोटातून तो प्रकाश निघाला होता. आता कॅमेर्यावर रेकॉर्ड झालेली दुसरी फुटेज ती पाहत होती. त्या स्फोटापासून निर्माण झालेले धूलिकण, उल्का, वेगवेगळे वायु अन प्रकाश यांनी गॅलेक्सीत मुक्त संचार सुरू केला होता. काही क्षणातच गॅस अन धूलिकण यांचे मिश्रणापासून एक घन पदार्थ निर्माण होऊ लागला. त्या घनाचा आकार विकार विचित्र होता. पुढच्या काही क्षणातच तो घन स्वतः भेवती फिरू लागला. फिरताफिरता त्याने गोल आकार घेण्यास सुरुवात केली. इतरत्र फेकले गेलेले उल्कापिंड, धूलिकण हे सगळे त्या घनाकडे खेचले जावू लागले . काही अंतरावर जावून ते स्थिर झाले. त्यांनी विशिष्ट अशी स्वतःची रचना केली होती, त्यांनी एका पट्ट्याप्रमाणे त्या गोलाला रिंगण घातले. या सगळया कृतीवरून क्षिनाला कळून चुकले होते की तिच्या समोरच एका ग्रहाने जन्म घेतला होता.
हे सर्व काही वेळातच घडले होते जे केवळ अशक्य होते. दोन ग्रहाची टक्कर होवून त्या पासून पुन्हा सृष्ठी निर्माण व्हायला युगे लागतात, इथे तर ते काही मिनिटातच झाले होते. अर्थातच इथे कालाचे मापदंड काही वेगळेच होते.
क्षिनाला काही तरी आठवले, तिने आपल्या कवचाचे बटन दाबले तसा कवचाचा एक कप्पा बाहेर आला. त्यातून तिने एक यंत्र बाहेर काढले. यंत्रावर बरीचशी बटने दिली होती तिने त्यातील एक बटन दाबले तसं यंत्राच्या स्क्रीनवर एक लिस्ट दिसू लागली. ती लिस्ट क्षिना वाचु लागली. २४ या आकड्यावर येताच क्षिना थांबली. त्याच्या समोर लिहिले होते – काळ.
ती सूची म्हणजे डायमेन्शनची लिस्ट होती. २४ आकड्यासमोर काळ लिहिले होते. क्षिना काळ नावाच्या डायमेंशनमध्ये शिरली होती.
7 comments:
mast jamli ahe katha....lawkarch pudhcha bhag taka...waiting for next happenings:-)
Mast jamli ahe katha....lawkarch pudhacha bhag taka...waiting for next happenings:-)
भाग्यश्री तुमच्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद. लवकरच पुढील भाग प्रदर्शित होईल. तुम्ही इतर कथा ही तुम्ही वाचू शकता - बंधन, शोध पानांचा. इंकारनेशन - द मिस्त्री ऑफ लाइफ ही कथा सुद्धा लवकरच प्रदर्शित होईल. वाचत रहा.
ekdam zakkas pudhcha bhag lavkar post kara am waiting
Hey Captain Crunk..... wer is d nxt part?? are khup exiting aahe yar..... waiting 4 nxt post..........
Hey Captain Crunk..... wer is d nxt part?? are khup exiting aahe yar..... waiting 4 nxt post..........
Sorry guys, due to some personal reasons I was going through stress from last 3-4 months which cause a delay to write, complete those stories. I hope you can understand me... I will try to put some new chapters on the blog within a week, thanks for reading my stories & showing your keen interest. THANK YOU FOR SUPPORTING ME. NEED YOUR LOVE & BLESSINGS.
Post a Comment