Sunday, July 24, 2011

शोध पानांचा - भाग ३

भाग ३

मुंबई- पुणे एक्सप्रेस हायवेवर काळ्या रंगाची एक महिंद्रा स्कोर्पिओ पुण्याच्या दिशेने धावत होती. नुकताच पावसाळा सुरु झाला असल्याने अधून मधून पावसाच्या सरी कारच्या विंडस्क्रीनला भिजवून जात होत्या. गाडी चालवणारा बराच सुशिक्षित अन मॉडर्न वाटत होता. गडद निळ्या रंगाची ली ची जीन्स, त्यावर एलेन सोलीचे निळ्या -पांढऱ्या स्ट्रिप्स असणारे शर्ट, हातात बुलगरीचे स्पोर्ट घड्याळ, डोळ्यावर तांबूस रंगाचा कोयोटेचा सन-ग्लास असा त्या ड्रायवरचा पेहराव होता.

"एवरीडे आय वांट टु फ्लाय स्टे बाय माय साइड..." गाडीच्या डेस्कबोर्ड मध्ये ठेवलेला मोबाइल फोन वोडाफोनची ट्यून ऐकवू लागला होता. त्या रिंगटोन ने ड्रायवरचे लक्ष्य वेधून घेतले. त्याने आपल्या डाव्या हातानेच डेस्कबोर्ड वरील फोन उचलला अन आपल्या कानाला लावला.

"हॅलो." 
"निखिल, कावेरी हियर. तू कुठे आहेस? ऑफिसमध्ये फोन केला तर कळाले की तू घाईघाईत बाहेर निघाला आहेस. दोन दिवसांची सुट्टी ही घेतली आहेस. बाय द वे, तू आज मला सीसीडी मध्ये ५:३० ला भेटणार होतास ना?" समोरून मुलीचा आवाज आला. 

"सॉरी यार कावेरी, आय कुड्ण्ट मेक इट. मी घरी चाललोय, डॅड चा फोन आला होता. फारच विचित्र घटना घडली आहे तिथे. इट साऊंडस स्कॅरी." निखिलने कावेरीला सर्व घटना समजावून सांगितली.

"सो व्हेन यु विल बी बॅक इन टाऊन ?" कावेरी

"आय एम नॉट शुअर, बट बाय धिस फ्रायडे, आय विल बी बॅक."

"ओके. सो आय एम गोन्ना मिस यू फॉर कपल ऑफ डेज?" 

"अरे यार, समझा कर. इट इज डिफिकल्ट सिचुएशन फॉर माय डॅड. अन मला तिथे असणं गरजेचं आहे."  निखिल कावेरीला समजावत म्हणाला, "हे बघ मी आता ड्राइव करत आहे आणि बाहेर पाऊस ही जोरात पडत आहे. मी तुला नंतर फोन करतो."

"ओके डियर, घरी पोहचल्यावर मला फोन कर. नक्की करशील ना ?"
"हो नक्की करिन, आता ठेवू फोन?"
"ठीक आहे. काळजी घे.सी या.बाय"  

"बाय" म्हणत निखिलने फोन ठेवून दिला.

निखिल गाडी चालवत विचारचक्रात हरवून गेला. त्याला दुपारचा प्रसंग आठवू लागला. घड्याळाने १ चा टोला वाजवला होता, निखिल व राजश्री क्लाईंट मीटिंग वरुन परत आले होते. निखिल आपल्या केबिन मध्ये शिरला त्याच्या पाठोपाठ राजश्री ही त्याच्याच केबिन मध्ये शिरली. निखिल टेबलपलीकडील खुर्चीवर बसला तर राजश्री त्याच्या समोरील खुर्चीवर बसली. दोघे ही फारच थकले होते. 

"बॉस, त्या शाहने आपले प्रपोसल अॅक्सेप्ट केले तरच आपला हा प्रोजेक्ट सक्सेसफुल होऊ शकतो." राजश्री म्हणाली.
"नाहीतरी तो शाहचा चमचा तोराणी तर ह्या प्रोजेक्ट मध्ये खुसपटच काढत होता. हे नको ते पाहिजे, ते नको हे पाहिजे..."निखिल वैतागून म्हणाला.

इतक्यात गणेश पाण्याचे भरलेले ग्लास घेवून तिथे आला. त्याने टेबलावर दोघांसाठी भरलेले ग्लास काढून ठेवले अन तिथून तो निघून गेला.

"निखिल यार, चल जेवायला समोरच्या हॉटेल मध्ये जाऊ या. तसेही १:३० वाजला आहे." राजश्री म्हणाली.
"गुड आयडिया, त्यामुळे थोडा स्ट्रैस पण कमी होईल. चल निघू या." निखिल उठून उभा राहिला अन दरवाजाकडे चालू लागला.

निखिल केबीनचा दरवाजा उघडायला अन त्याचा फोन वाजायला एकच क्षण. त्याने वैतागून फोनची स्क्रीन  बघितली. त्यावर डॅड असे फ्लॅश होत होते. निखिलने फोन उचलला. 

"हॅलो डॅड." निखिल. 
"निखिल बेटा.."निखीलला पलीकडून बंडोपंताचा कापरा आवाज ऐकू आला.

"काय झाले डॅड, तुम्ही घाबरलेले दिसत आहात." निखिल काळजीच्या सूरात म्हणाला.         

बंडोपंतानी सर्व हकीगत निखिलला सांगितली. ते पुढे म्हणाले.
"बेटा, तुझा दादा राहुलही ह्या क्षणी इथे नाही, तो कलकत्त्याला कामाच्या निमित्ताने गेला आहे. तुझी आई ह्या प्रकाराने भांबवून गेली आहे. फारच घाबरली आहे ती."

"वाहिनी आहेत ना तिथे?"
"हो आहे ती इथे, तीच सरस्वतीची काळजी घेत आहे. पण तू लवकर इथे ये."
"हो मी आता निघतोच." निखिलने फोन ठेवून दिला.

निखिलचे बोलणे ऐकून राजश्रीला आता पर्यन्त कळून चुकले होते की काही तरी घडले होते अन ते निखिल साठी इमर्जन्सी होते.

"निखिल माझ्या मते आता तुला निघायला हवं." निखिल काही बोलायच्या आत तिने त्याचे विचार ओळखले होते.

"थॅंक्स राज." निखिल धावतच दरवाजाबाहेर पडला. 
   
क्रमशः 

3 comments:

omkar said...

bhai aur kitna time loge es ko bata ne ke liye?

omkar said...

aankhi kiti vel ghennar ahes he rahasya sangayala ?

Captain Crunk [AKA Swapnil R. Pawar] said...

ओंकार मित्रा जरा धीराने घे, अजून पुढच्या भागावर काम चालू आहे. फक्त भाग टाकायचा आहे म्हणून नाही परंतु मनाला पटेल असे काही सुचले नाही म्हणून काही अर्धवट राहिले आहे. एक दोन दिवसात नक्की पुढील भाग टाकेन.