Wednesday, July 27, 2011

शोध पानांचा - भाग ४

भाग ४

वाड्यासमोर काळी महिंद्रा स्कॉर्पिओ येऊन उभी राहिली. त्यामधून निखिल खाली उतरला, गाडीला लॉक करून तो वाड्याच्या मुख्य दरवाज्याकडे चालू लागला. दरवाज्याजवळ पोहचताच निखिलची आणि दरवाज्यातून बाहेर पडणार्‍या इंस्पेक्टर बाजीराव शिंदेची नजरानजर झाली. बाजीराव शिंदेची पोलिसी करडी नजर निखिलची नखशिखांत तपासणी करत होती. निखिल इंस्पेक्टर शिंदेची पर्वा न करता त्याला डावलून दरवाज्यातून आत शिरला.

वाड्याच्या ओसरीत बांधलेल्या झोपळ्यावर बंडोपंत बसले होते. त्यांचा चेहरा चिंताग्रस्त दिसत होता, कसला तरी विचार करत होते ते. जवळच ओट्यावर जॉनी हिरमुसून बसला होता. त्याच्या बसण्याच्या कृतीवरून तरी तो कोणावर तरी नाराज असल्याचे जाणवत होते.

"काका आला, काका आला." ओसरी लगतच्या खोलीतून बाहेर पडणार्‍या हर्षने निखिलला पहिले अन आनंदाने ओरडू लागला." काका, माझ्यासाठी तू खाऊ काय आणलास?"

निखिल काही बोलणार इतक्यात बंडोपंत झोपाळ्यावरून उठत म्हणाले.
"निखिल बेटा, तू आलास? बर झालं तू लवकर आलास"

 "हो डॅड, तुम्ही फोन केलात ना तेव्हाच निघालो होतो."
आता पर्यन्त हर्षचा गोंधळ ऐकून गायत्री वाहिनी, जेष्ठा - राहुल-निखिलची छोटी बहीण - सगळेच बाहेर आले होते. जॉनी तर ताजा तवाना होऊन निखीलकडे झेपावला होता. निखिलने त्याला गोंजारले तसं जॉनी आपलं शेपूट हलवून त्याच्या मागे पुढे करू लागला.

"काका सांग ना रे माझ्यासाठी काय खाऊ आणलायस्स ते?" हर्ष निखिलला लाडीगोडी लावू पाहत होता.

निखिलने खिश्यातून दोन डेअरी - मिल्कची चॉक्लेटस काढून हर्षच्या हातावर ठेवली. हर्षरावांची स्वारी पार खुश होवून गेली. ती चॉक्लेटस घेऊन हर्ष निसटणार इतक्यात निखिलने त्याच हात पकडला. हर्ष कावराबावरा होऊन निखिल कडे पाहत राहिला.

"आधी आम्हाला पा नंतर चॉक्लेटस." म्हणत निखिलने आपला गाल पुढे केला.

हर्ष निखिलच्या गालावर हलकेच पापी देऊन चॉक्लेटस घेऊन तिथून पसार झाला.

"निखिल तू, जरा फ्रेश होऊन ये. तो पर्यन्त मी खायला बनवते." गायत्री.
"हो पण आई कुठे आहे?" निखिल.
"बेटा निखिल, तू फ्रेश हो मग आपण बोलू या." बंडोपंत.
"ओके डॅड, आय विल बी बॅक इन जस्ट १५ मिनिट्स"

गायत्री अन जेष्ठा डायनिंग टेबलवर जेवणाची ताटे मांडत होत्या. बाहेर ओसरीत निखिल अन बंडोपंत घडलेल्या गोष्टीवर विचार-विनिमय करत होते. अचानक निखिलला काहीतरी आठवले, तो म्हणाला.

"डॅड ,मगाशी मी जेव्हा वाड्यात शिरत होतो तेव्हा मी एका पोलिस इंस्पेक्टरला वाड्याबाहेर जाताना पहिले. कोण होता तो, अन इथं काय करत होता ?" निखिल.

"अरे तो ना बाजीराव होता, इंस्पेक्टर बाजीराव शिंदे. झालेल्या घटनांची पुरेपूर माहीती घ्यायला तो आला होता. ही केस त्याच्याच अन्डर आहे."

"अच्छा तर ती पेटी, तो नकाशा अन ती चावी सर्व कुठे आहे?" निखिल

"ते सगळे पोलिसांच्या ताब्यात आहेत आणि ते मानवी हाड सुद्धा. कदाचित आपल्या वाड्यावर खून झाला असावा...."बंडोपंत अडखळत बोलत होते.

"माझाही तोच संशय आहे." इंस्पेक्टर बाजीराव शिंदे पुन्हा वाड्यात शिरला होता.  
   
क्रमशः

भाग ३                                                                                                                  भाग ५  

13 comments:

Manish said...

खूप छान चालू आहे कथा.

Captain Crunk [AKA Swapnil R. Pawar] said...

मनीष आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद. आपणास कथा आवडली हेच एका पारितोषिकासारखे आहे. धन्यवाद.

Prasanna Kulkarni said...

chan ahe , pudhacha bhag lawkar taka

Pratyussh said...

Capton hi tumhi lihili ahet ka? konihi lihileli aso khup chan lihili ahe. mast utkantha ahe pudhe kay hoil tyachi.

pudhil bhag kadhi pradarshit honar.

Pudhe kay??

Captain Crunk [AKA Swapnil R. Pawar] said...

धन्यवाद प्रसन्न.

Captain Crunk [AKA Swapnil R. Pawar] said...

प्रत्युष, धन्यवाद, तुम्हाला कथा आवडली हेच पारितोषिकासारखे आहे. अन हो कथा माझी स्वतःचीच आहे, मीच लिहिली आहे. शंका असल्यास शंकेचे निरसन ही करून घेऊ शकता.

Pratyussh said...

Nahi Nahi Capton. Gairsamaj karun gheu nako. mala kahihi shanshay nahiye. me just vicharale.

Khup chan ahe pudhacha part lavakar taka.

Captain Crunk [AKA Swapnil R. Pawar] said...

प्रत्युष मित्रा,मी समजतो तुझ्या भावनांना, पण कधी कधी प्रतिउत्तर करणे फार गरजेचे असते. असो... आपकी आज्ञा सर-आखों पर... रविवार पर्यन्त नवीन भाग प्रदर्शित करीन.प्रतिसादा बद्दल धन्यवाद. अशीच प्रतिक्रिया मांडत राहशील अशी आशा करतो.

Vinu said...

पुढचा भाग कधी प्रदर्शित करणार?
I am very excited!

sneha kashikar said...

i love it next chapter kevha post karnar aahet. m waiting..

shilpadhure said...

pudhache kadhi???? barech divas zalet tumachi pudhachi post nahi aali ........ we r waiting ......

sachin said...

hi sir next part lavakar taka aani katha purn kara i am waiting thanks.........sachin mamlekar

Captain Crunk [AKA Swapnil R. Pawar] said...

Sorry Guys, I was fighting with the life threatening disease. Now I have almost win the battle. Sorry for the inconvenience. I will try to post the next chapter soon. Also I am trying to publish the Story as Novel, so it can reach to you in paperback format. I really apologize for the delay. Thanks for your love & support.