इन्कार्नेशन - द मिस्ट्री ऑफ लाईफ
ch १. अदा, धारावी अन क्राइम
३१ डिसेंबर १९८६, धारावी, मुंबई, भारत.
१६ वर्षाची अदा स्टोव्हवर चपात्या भाजत होती. आपल्या दारू पिणार्या अब्बूसाठी, लहान भावंडांसाठी ती जेवण बनवत होती. ती दहा वर्षाची असतानाच तिची अम्मी अपघातात गेली होती. अब्बू तिच्या जाण्याच्या गममध्ये दारू पिऊ लागला होता. आता घराची सर्व जबाबदारी छोट्याश्या अदावर येऊन पडली होती. अन ती अदाने पुर्णपणे पार पाडत आणली होती.
घडाळ्याने रात्रीचे १० वाजवले. रात्रीचे जेवण आटोपून सर्व जण झोपण्याची तयारी करत होते. हसन – अदाचा अब्बू – जेवण न करताच आडवा झाला होता. दारू मध्ये तो झिंगला होता. त्याला अजिबात शुद्ध नव्हती. अल्ताफ व सदाह दोघे ही आता पेंगु लागले होते. सदाह १२ वर्षाची तर अल्ताफ १० वर्षाचा. त्यांना झोपवून ती ही आता झोपू लागली होती तोच दरवाजावर थाप पडली.
तिने दरवाजा हलकेच खोलला. दारात फारूख उभा होता.
“मामूजान” अदा आपल्या मामाला दारात पाहून आनंदली
होती.
अदाने नुकतेच तारुण्यात पदार्पण केले होते. २६
डिसेंबरला तिला सोळावे वर्ष लागले होते. आर्थिक परिस्थिति हालाकीची असून ही अल्लाहने
तिला हुस्न भरभरून दिले होते॰ अन ते तिच्या फाटक्या-ठिगळे लावलेल्या कपड्यातून
ओझरते दर्शन देत समोरील पुरुषाला कामुक बनवत असे. असेच रस्त्यावरून येतं जाता
कित्येक पुरुष तिच्याकडे कामांधतेने बघत असत तर काहींनी तर तिच्यावर पाळतच ठेवली
होती की कधी एकदाचा मौका मिळतोय अन तिचे हुस्न चाखायला मिळतय. अश्यातच एक जण होता
असलम, जवळ जवळ तिच्याच वयाचा... नेहमी येता-जाता तो तिला रस्त्यात छेडत असे.
एकदा तर त्याने हद्द्च केली. दुकानातून साखर घेऊन चाललेल्या अदाचा त्याने सरळ-सरळ
भर रस्त्यात हात पकडला. अदा तर फार घाबरून गेली हातातली साखरेची थैली सुटून
रस्त्यावर सांडली. अदाने हिम्मत करून असलमच्या थोबाडात लावून दिली. आपला हात कसं
बसा सोडवून ती धावत घरी निघून गेली.
पण असलम इकडे धुसमुसळत होता. त्याच्या अंगाची लाहीलाही होत होती. त्याला भर रस्त्यात झालेल्या आपल्या अपमानाचा बदला घ्यायचा होता. अन त्यासाठी तो योग्य संधीची वाट पाहत होता. तो दिवस आज आला होता ३१ डिसेंबर.
१ जानेवरी १९८७, धारावी, मुंबई, भारत.
पहाटेचे ४ वाजले होते. धारावी पोलिस इंस्पेक्टर जाधव, सब-इंस्पेक्टर मोईन खान, हेड कॉन्स्टेबल पवार अन ड्रायवर वागळे पोलिस जीप मध्ये पेट्रोल्लिंग करत सायन रेल्वे स्टेशन पासून चालले होते. इतक्यात वायरलेस वाजू लागला.
हेड- कॉन्स्टेबल पवार यांनी वायरलेस वरील खबर नीट
लिहून घेतली.
“साहेब, आपल्याला लगेच
निघावे लागेल”. पवार
“च्या मायला, झालं वाटत काही
तरी. च्या आईला...” एक शिवी हासडत इंस्पेक्टर जाधव म्हणाले
“वागळे, वळव रे”
पाच मिनिटात ते जीप घेऊन त्या जागी पोहचले. नाल्याच्या किनार्यावर एका तरुण मुलीचे शव पडले होते. ती अर्धवट जळाली होती. अंगावरील कपडे ठीक-ठिकाणी फाटलेले होते. वक्षस्थळे उघडी पडलेली होती. सलवार ही गुडघ्या पर्यन्त फाटलेली होती. जबरण कपडे फाडलेल्याच्याही खुणा तिच्या शरीरावर होत्या. तिचा चेहरा एका बाजूने पूर्ण जळला होता. तिची ओळखही पटत नव्हती.
हेड कॉन्स्टेबल पवार यांनी आपला हात रुमाल तिच्या
उघड्या वक्षस्तळावर पसरला ज्याने की तिची आब्रू झाकली जावी.
“काय रं, तुझी कोण लागते का ?” इंस्पेक्टर जाधव दात विचकत म्हणाले. “चल बाजूला हो”
“लिव्हायला सुरुवात कर. ह्ं, शव मुलीचे आहे. वय साधारणतः १६-१७ वर्षे. अंगावरील
कपडे फाटलेल्या अवस्थेत. ७०-८० टक्के जळालेली. अंगावर ठीक-ठिकाणी ओरबाडण्याच्या खुणा. गळ्यात तावीज. तावीजवर उर्दू अक्षरात काहीतरी कोरलेले आहे. कदाचित अल्लाह लिव्हलेले
असावे. मुलगी मुस्लिम दिसते आहे. ओळख पटवण्याकरिता या खेरीज काही नाही.”
पवार यांनी ते डायरीत नीट लिहून ठेवले.
2 comments:
is this the end of story????
No Rakesh, this not the end of this story. there is more to come. In fact,it will be in printed form I mean we are soon going to publish this novel & it will be available in market. the story is almost complete & I hope the readers may like it.
Post a Comment