Monday, June 30, 2014

शोध पानांचा - भाग ६

भाग ६

रात्रीचे दहा वाजले होते. वाड्यात सर्वत्र भयाण शांतता पसरली होती. सगळे जण आपआपल्या खोलीत झोपायला गेले होते. जॉनी ओसरीतील पाळण्याजवळच पाय पसरून झोपला होता. इकडे निखिल त्याच्या रूम मध्ये लॅपटॉप उघडून प्रेझेंटेशन बनवण्यात गढून गेला होता.

आजच त्याची शाह बरोबर मीटिंग झाली होती. शाहला प्रोजेक्ट पसंद तर पडला होता पण त्याचा असिस्टेंट तोराणी उगाचच खुसपट काढत होता. वरकरणी शाह सुद्धा तोराणीच्या म्हणण्याला दुजोरा देत होता. शेवटी काही नवीन आयडियाज अॅड करून व काही अॅडिश्नल फीचेर्स काढून शाह पुन्हा एकदा प्रेझेंटेशन साठी तयार होता. पुढील मीटिंग येत्या शुक्रवारी हॉटेल डिप्लोमाट मध्ये होती. मीटिंगला शाह सोबत तोराणी असणारच होता पण ह्या वेळीस शाह अँड सन्स चे अधिकृत बिजनेस पार्टनर ए. के सुद्धा मीटिंगला हजर राहणार होते. ए.के. - शाह अँड सन्स मध्ये या व्यक्तिला ए.के. म्हणूनच ओळखले जाते त्यांचे पूर्ण नाव कोणीच घेत नसे त्यामुळे निखिलला त्यांचे पूर्ण नाव माहीत नव्हते - शाह अँड सन्स चे ५२ टक्के भागीदार होते आणि त्यांच्या होकराशिवाय हा प्रोजेक्ट होणे शक्यच नव्हते. प्रोजेक्ट ची इन्वेस्टमेंट जवळपास कोटींमध्ये होती अन त्याचा फायदाही तेवढाच होणार होता.

ए.के. चे नाव लौकिक निखिल ऐकून होता. ह्या व्यक्तीचा मोठा दबदबा होता ऑफिस मध्ये. खूप शिस्तप्रिय अन कमालीची वक्तशीर आहे ही व्यक्ति असे निखिलच्या कानी पडले होते, ए. के.ला कसलीही धिरंगाई आवडत नसे. म्हणूनच निखिल फावल्या वेळेत प्रेझेंटेशनचे काम करीत होता. त्याला कसली ही उणीव ठेवायची नव्हती ह्या मीटिंगला. कसेही करून प्रोजेक्ट मिळवायचा होता. तो मन लावून काम करत होता.

इतक्यात त्याचा मोबाइल फोनची रिंगटोन वाजू लागली. "एवरीडे आय वांट टु फ्लाय स्टे बाय माय साइड..." निखिल ने मोबाइल फोन उचलला. स्क्रीन वर राजश्री चे नाव फ्लॅश होत होते. त्याने स्क्रीनवर बोटाने टच करून बोट उजव्या बाजूस सरकवले अन फोन कानाला लावला.

"हा बोल राज"

"निखिल, सॉरी. आय क्नो आयम डिस्टर्बिंग यू बट धिस मॅटर इज अर्जंट." पलीकडून राजश्री बोलत होती.

"आता काय झाले? अबाऊट व्हॉट यू आर टौकींग?" 

"अरे निखिल, तोराणीचा मघाशी मला कॉल आला होता. तो ए.के. बद्दल बोलत होता. परवा ए.के. लंडनहून फ्लाइट ने येत आहे. तुला भेटायचे आहे ह्या व्यक्तीला. तिची म्हणे ती अट आहे, विदाउट पर्सनल मीटिंग विथ निखिल, द प्रोजेक्ट मीटिंग विल नॉट गोइंग टु हप्पेन. दॅट पर्सन बीलिव्स इन पर्सनल इंटरअॅक्शन.सो यू हॅव टू रीसीव ए.के. ऑन मंडे. फ्लाइट विल आराईव अॅट ३:१० पीएम. अँड हा, बी ऑन टाइम, दॅट पर्सन डज नॉट लाइक लेट कमर्स."

"ओके. आय विल बी राइट देअर ऑन राइट टाइम" 

" तू नेहमी असे बोलतोस अन उशिरा येतोस. पण ह्या वेळेस असे करू नकोस नाही तर आपला प्रोजेक्ट गेलाच म्हणून समझ." 

"हो ग बाई माझी. मी नक्की टाईमवर पोहचेन एयरपोर्ट ला तू काळजी करू नकोस. मी उद्या सकाळीच इथून निघतो आहे. बाकी ऑफिसला आल्यावर बोलतो." 

"ठीक आहे. ठेवू फोन ?"

"ओके. बाय गुड नाइट. टेक केयर."

"बाय." 


आता अजून एक गोष्ट त्याच्या पथ्यावर पडली होती. त्याच गोष्टीचा विचार करत निखिल जागेवरून पाणी पिण्यासाठी उठला. टेबलावर ठेवलेला जग उचलून पहिलं तर त्यातले पाणी संपले होते. वैतागून तो स्वयंपाक घराकडे पाणी घेण्यासाठी जायला निघाला. स्वयंपाक घरातील फ्रीज मधून त्याने पाणी पिले अन तो पुन्हा आपल्या रूम कडे जाऊ लागला. त्याला जॉनीची आठवण आली म्हणून तो ओसरीत येऊन जॉनीला पाहू लागला. 

अचानक त्याला वरच्या मजल्यावर प्रकाशाचा झोत दिसला. त्याप्रकाशा बरोबरच त्याला एक काळी कुट्ट आकृती पुढे सरकताना दिसली.      

निखिल सावधपणे वरच्या मजल्याकडे निघाला. तो पहिल्या मजल्यावर पोचतो न पोचतो तोच त्याच्या डोक्यात मागून कोणीतरी प्रहार केला. डोक्याला जबरदस्त मार लागल्याने निखिल मोठयाने ओरडला न जागीच बेशुद्ध झाला. त्याच्या ओरडण्याने घरातले सर्व जागे झाले.

दादासाहेब धावत त्यांच्या रूम मधून बाहेर आले. त्यांना जमिनीवर पडलेला निखिल दिसला, त्याच्या डोक्यातून रक्त वाहत होते. ते धावत त्याच्या जवळ पोचले. अचानक त्यांची नजर वाड्याच्या दरवाजाकडे गेली दोन आकृत्या त्या दरवाज्यातून बाहेर पडत होत्या. 

क्रमशः

भाग ५                                                                                                      भाग ७ 

Sunday, November 10, 2013

प्रेम हे असेच असते.....

एक होता चिमणा व एक होती चिमणी..दोघात खूप प्रेम होते.. 
एके दिवशी चिमणी चिमण्याला म्हणाली.. तू मला सोडून, उडून तर जाणार नाही ना? ....
तेंव्हा चिमणा म्हणाला मी जर उडून गेलो तर
तू मला पकडून घेशील... 

चिमणी म्हणाली मी तुला त्यावेळी पकडू तर
शकेल पण तुला मिळवू नाही शकणार.. 
हे ऐकुन चिमण्याचे डोळे भरून आले.. त्याने आपले पंख छाटून टाकले..आणि चिमणीला म्हणाला 
आता तर ठीक आहेना...आता आपण नेहमी सोबत राहू... ... ... 

एके दिवशी जोराचे वादळ सुटले..चिमण्याला पंख नसल्याने तो उडू शकत
नव्हता.. चिमणी मात्र..

तो चिमणीला म्हणाला तू उडून जा..
चिमणीने त्याला स्वताची काळजी घे असे सांगून उडून गेली.. 

थोड्या वेळाने वादळ शमले... चिमणी परत आली.. 
पाहते तर चिमणा मरून पडला होता.. बाजूच्या फांदीवर लिहिले होते.. 

"प्रिये,
फक्त एकदा..एकदाच जर तू मला म्हटले असते
कि मी तुला सोडून नाही जाऊ शकत.. तर
कदाचित हे वादळ हि माझे काही बिघडवू
शकले नसते..."


प्रेम हे असेच असते.....

Wednesday, May 1, 2013

केव्हा परत येशील?


तुला जर माझे दुःख कळत असेल तर तू परत येशील,
माझे प्रेम तुला उमगत असेल तर तू परत येशील,
प्रेमाचे ते क्षण जर खरच मौल्यवान असतील तुझ्यासाठी तर तू परत येशील,
माझ्या भावना समजत असशील तर तू परत येशील,
तुझ्यासाठी तोडलेली नाती त्याची किम्मत असेल तुझ्यासाठी तर तू परत येशील,
शरीर वेगळे, हृदय वेगळे, प्राण वेगळा तर कशी माझ्याविणा राहशील,
माझी आठवण येईल जेव्हा, रडू येईल तुला, का तेव्हा परत येशील ?    

वाट बघतोय ग तुझी... डोळे पण थकलेत आता केव्हा परत येशील?    

Sunday, April 21, 2013


(FB पोस्ट वरून )

(FB पोस्ट वरून )

अपने करम की कर अदाये ये येये....
यारा यारा यारा यारा

मुझको इरादे दे, कस्में दे, वादे दे
मेरी दुवाओंके इशारोंको सहारे दे
दिल को ठिकाने दे, नये बहाने दे
ख्वाबों की बारीशोंको मौसम के पैमाने दे।         

अपने करम की कर अदाये
कर दे इधर भी तू निगाहें  

सून रहा है ना तू, रो रहा हूँ मै
सून रहा है ना तू, क्युं रो रहा हूँ मै  

सून रहा है ना तू, रो रहा हूँ मै
सून रहा है ना तू, क्युं रो रहा हूँ मै  

मंजिले रुसवा है, खोया है रास्ता  
आये ले जाये, इतनी सी इल्तजा
ये मेरी झमानत है, तू मेरी अमानत है
हां...

अपने करम की कर अदाये
कर दे इधर भी तू निगाहें  

सून रहा है ना तू, रो रहा हूँ मै
सून रहा है ना तू, क्युं रो रहा हूँ मै  
   
वक्त भी ठेहरा है, कैसे क्युं यह हूआ
काश तू ऐसे आये, जैसे कोई दुवा
आ तू रूह की राहत है,
तू मेरी ईबादत है

अपने करम की कर अदाये
कर दे इधर भी तू निगाहें  

सून रहा है ना तू, रो रहा हूँ मै
सून रहा है ना तू, क्युं रो रहा हूँ मै  
       
सून रहा है ना तू, रो रहा हूँ मै
सून रहा है ना तू, क्युं रो रहा हूँ मै  
यारा....

(From: Aashiqui 2 )

Tuesday, April 16, 2013

पुनर्जन्म असतो का???

१५ एप्रिल २०१३

ऑफिस मधून घरी आल्यावर मी आंघोळ करून पुजेसाठी बसलो होतो. तसे मी काही रोज पुजा पाठ करत नाही. पण काही दिवसांपासून देवाकडे काही मागतो आहे, माझे प्रेम, माझे जीवन जे माझ्यापासून दूर चालले आहे, ते मागतो आहे. त्यासाठी कित्येक वेळा त्या भगवंताच्या विनवण्या- आळवण्या करीत आहे. बाकी सर्व त्याच्या हातात आहे.

हा तर मी कुठे होतो ? हा पुजेसाठी बसलो होतो. पुजा करताना ध्यान मग्न होऊन देवाला आळवित होतो. माझ्या प्रेमाचा उद्धार करावा म्हणून त्यास विनवीत होतो. मी तिचाच विचार करत होतो. तिचा चेहरा डोळ्यासमोर येत होता अन डोळ्यातून अश्रूंची धार लागली... त्यातच कधी मी ध्यानस्थ झालो माझे मलाच माहीत नाही... पण जे काही मला अनुभवास आले किंवा दिसले ते सांगण्याकरिताच मी लिहीत आहे.

३० वर्षापूर्वी.... पालीनगर नावाचे एक छोटेसे गाव मध्यप्रदेशमध्ये होते. या गावात एक कुंभार राहत होता. कुंभार मेहनतीने मडके बनवायचा अन दुसर्‍या गावी जाऊन ते विकून आपले पोट भरायचा. या कुंभाराला एक सुंदरशी मुलगी होती, नाव होते हंसामती. ती त्याला मडके बनवण्यात मदत करत असे. कुंभाराची बायको आजाराने मुलगी लहान असतानाच वारली होती. बापाने तिचे संगोपन करून वाढवली, १५-१६ वर्षाची झाली होती ती, वयात आली होती. बापाला तिच्या लग्नाची चिंता लागली होती.

त्याच गावात ईश्वर नावाचा एक चरवाह (मेंढपाळ) राहत होता. १७ वर्षाचा तो मुलगा आपल्या आई सोबत राहत असे. रोज तो मेंढरे चारायला गावाबाहेर नेत असे. गावाबाहेर जाणारी वाट त्या कुंभाराच्या घरासमोरून जाई. सकाळच्या सुमारास हंसा मडकी घेऊन अंगणात वळवण्यासाठी रचून ठेवीत असे. असेच एकदा दोघांची नजारा नजर झाली. मेंढपाळाचे मुलीवर बघताच क्षणी प्रेम बसले. त्याने पाण्याच्या निमित्ताने तिच्याशी बोलण्याचे ठरवले.

त्याने दार ठोठावले अन विचारले "कोणी आहे का घरात ?"
आतून आवाज आला. "बाबा नाही आहेत घरात तुम्ही नंतर या"
"पानी हवे होते प्यायला"

तिने पेल्यात पाणी आणून दिले त्याला. त्याने तिच्याकडे बघतच पाणी पिले. आता रोज तो पाणी पिण्याच्या बहाण्याने तिला बघत असे. ती ही त्याच्याकडे आकर्षित झाली होती. रोजच्या भेटी गाठीने दोघांचे प्रेम वाढू लागले. दोघे दुपारी गावाच्या वेशीबाहेर वडाच्या झाडामागे भेटत असत. असेच प्रेमाचे दिवस चालले होते.

एक दिवशी कुंभार आनंदाने घरी आला. त्याने त्याच्या मुलीसाठी चांगले स्थळ शोधले होते. पाच कोसावर असलेल्या गावात तो आपली मुलगी देणार होता. मुलीला त्याने सर्व संगितले. मुलीचे मन हिरमुसले, पण बापाच्या आनंदासमोर तिने आपले प्रेम बळी दिले. दुपारी ती त्याला भेटली.

"आता आपले नाते संपले आहे. आपल्या हातातून निसटले आहे सगळे. मी काही करू शकत नाही. माझे लग्न ठरले आहे. तू मला विसरून जा, आपले जीवन आनंदाने जग."
"कसे जगू? तुझ्याविणा हे सर्व जग, धन दौलत, प्रेम, नाते संबंध सगळं सगळं व्यर्थ आहे. मी नाही जगू शकत तुझ्याविणा."
"तुला मला विसरावेच लागेल." ती रडत निघून गेली.
मुलगा तिला पाठमोरी जाताना बघत राहिला. त्याला काय करावे ते सुचेना...

लग्नाचा दिवस उजाडला होता. कुंभाराच्या घरी लग्नाची तयारी चालू होती... दोन दिवसापूर्वी ते जोडपं पुन्हा एकदा भेटले होते. शेवटचे एकमेकांना बघायला, दोघं एकमेकांशी बोललेच नाहीत, बोलत होते ते फक्त त्यांचे डोळे. प्रेमाने उर दाटून आला होता. दोघांच्या डोळ्यातून अश्रु वाहू लागले होते. पण तरीही ते दोघ बोलले नाहीत, बोलूच शकत नव्हते.

लग्नाचा मुहूर्त जवळ आला होता. मुलीला लग्नमंडपात बोलावले. मुलगी अतिशय सुंदर दिसत होती. पण तिचे डोळे रडून रडून सुजले होते. इकडे लग्नाची सुरवात झाली. तिकडे मुलाने घरात गळफास लावून घेतला. त्याने आत्महत्या केली. त्याच्याकडे दुसरा पर्यायच नव्हता, तो तिला दुसर्‍याच्या घरी जाताना पाहू शकणार नव्हता..

एक जीव गेला. आता दुसर्‍याची बारी होती. लग्नाचे चार फेरे पूर्ण झाले होते. पाचवा फेरा होणारच होता त्यातच मुलगी चक्कर येऊन खाली पडली. तिच्या तोडून सफेद फेस येऊ लागला होता. तोंड घामाने डबडबलेले होते. अर्ध्या तासापूर्वी तिने विष पिले होते. पाच मिनिटातच तिचे ही प्राण पाखेरू उडून गेले. दूसरा जीव ही आपले प्रेम निभावून गेला...

मी दचकून भानावर आलो. मी घामाने ओला चिंब झालो होतो. घाबरलेलो होतो. तिला मरताना मी पाहू शकलो नाही. माझे अश्रु पुन्हा ओघळू लागले. जे काही मी पाहिले किंवा अनुभवले, ते सत्य होते का? कारण ज्या गोष्टी त्यांच्या बरोबर घडल्या होत्या तश्याच माझ्या जीवनात ही घडल्या आहेत. तिचे लग्न ठरले आहे. १ महिन्याने तिचे लग्न आहे. कदाचित ती घटना माझ्या मागच्या जन्माची तर नाही ना ? पुन्हा माझ्यासोबत तेच घडत आहे असे तर नाही ना ? मला तर ते गावं सत्य परिस्थितीत आहे की नाही ते ही माहीत नाही. मला हे ही माहीत नाही जे पाहिले ते स्वप्न होते की माझा भास..  कुणीतरी सांगेल का? मला माझे प्रेम भेटेल का??? खरच पुनर्जन्म असतो का???                

(कृपया माझ्या प्रेमासाठी प्रार्थना करा. I need your blessings,badly.)
                     
                                          

तु तिथं मी ( एक प्रेमकथा ).....

शारदा किती उशीर किती वेळ तुझी वाट पाहायची,
रात्रीचे साडे अकरा वाजुन गेले की गं,
अरे हो रे, आज थोडा उशीरच झाला,
पण तुझ्यासाठी काही आणलंय मी ?
काय ?
उकडीचे मोदक तुला खुप आवडतात ना ??
हो खुपच आवडतात, रवी डब्यातला एक मोदक
खातो.....

आणि तिच्याकडे बघुन विचारात पडतो तिला विचारतो,
"शारदा तुला भिती नाही का गं वाटत ?
गेली सहा महीने रोज रात्री आपण या झाडाखाली भेटतो,
तु माझ्यासाठी कायम काही ना काही घेऊ,
न येतेस कशाची भीती ?
भुताखेतांची ?
बावळटच आहेस भुत वगैरे काही नसतं रे,
आणि एकदिवस खरंच भुताने वाटेत तुला आडवलं तर ?
तर ते भुत तुच असशील,
चेष्टा पुरे हं आता.....

Ok Sorry, Sorry तु असलास की,
मला कसलीही भीती वाटत नाही रवी,
असं,मग मी तुझ्यासाठी किती महत्त्वाचा आहे सांग
ना मला ?
पुन्हा कधीतरी सांगेन,
आत्ता उशीर होतोय मला जायला हवं,
अगं पण जाताना ते एकदा म्हणुन जा ना,
जे ऐकायसाठी मी इथे आलोय,
तुच म्हण ना मग.....
i Love u Sharada...
Mi too.....

12 तासानंतर .....

शारदाला वाचनाची खुपच आवड आहे,
पण कामाच्या ओघामुळे तिला गेले कित्येक दिवस वेळच
मिळाला नाही वाचनासाठी,
पण आज तिला वेळ मिळालाय,
म्हणुन ती स्वातंत्रपुर्व काळापासुन
असलेल्या एका ग्रंथालयात गेलीय,
तिथल्या धुळखात पडलेल्या बर्याच पुस्तकांच्या कपाटामध्ये ती सत्यकथांवर
आधारीत असलेली पुस्तके शोधतीये...
त्यामध्ये तिला एक पुस्तक मिळतं जे पंचवीस
वर्षापुर्वी घडलेल्या एका सत्यघटनेवर आधारीत पुस्तक
आहे,
जेव्हा ती ते पुस्तक उघडते,
तेव्हा तीच्या पायाखालची जमिनच सरकते,
तिच्या तोंडचं पाणी पळतं, अंगाचा थरकाप होतो,
ती त्या पुस्तकातली काहीच पाने उलगडतीये,
त्यानंतर ते पुस्तक घेउन
या पुस्तकाच्या लेखकाला भेटण्याची इच्छा ती तिथल्या ग्रंथालया
व्यक्त करते.....

त्यांच्याकडे ऊपलब्ध माहीतीद्वारे ते शारदाला त्या लेखकाचा योग्य पत्ता देतात,
तो लेखक इथुन फक्त दोन तासाच्या अंतरावर असतो,
शारदा लवकरच त्यांच्या घरी पोहोचते,
एक पंच्याहत्तर वर्षाचे वृद्ध दरवाजा उघडतात...
दारात उभ्या असलेल्या शारदाला पाहुन ते खुपच घाबरतात,
त्यांना जब्बर मानसिक धक्का बसतो,
त्यांची ही अवस्था पाहुन शारदाला वाटतं,
की ते आपल्याला आधीपासुनच ओळखतात,
आणि तिला खुपच घाबरताहेत,
हे पाहुन शारदा त्यांना आपली व्यवस्थित ओळख करुन
देते,
तेव्हा कुठे जाऊन त्यांची परिस्थिती स्थिर होते,
तेच त्या पुस्तकाचे लेखक होते,
त्यांनी लिहीलेल्या पुस्तकातील या सत्यघटनेविषयी शारदा त्यांना विचारते.....

ते सांगु लागतात ; पंचवीस वर्षापुर्वीची गोष्ट
आहे,
जेव्हा मी पार्किन्सन कंपनीतल्या रिसर्च कमिटीत
काम करायचो,
एका खेडेगावात आमचा प्लांट लागणार
होता म्हणुन आमची कमिटी तिथलं निरीक्षण
करायला गेली होती,
पण त्या दिवशी तिथले गावकरी एका युवकाला जबर मारहाण करत आणत होते...
एक मुलगी जीवाच्या आकांताने रडत होती,
त्याला मारु नका, त्याला मारु नका, असं म्हणत होती...
पण कोणीही ऐकलं नाही आणि सर्वाँसमोर त्याला एका झाडावर लटकवण्यात
आलं आणि त्यातच त्याचा मृत्यु झाला.....

पण हे कसं शक्य आहे या पुस्तकात जो फोटो दिलाय
तो तर माझ्या प्रियकराचा आहे,
त्याला तर मी रोज भेटते आणि आम्ही दोघं एकमेकांवर खुप प्रेम करतो,
मी तर या पुस्तकातला याचा फोटो बघुनच तुमच्याकडे आलेय...
पोरी ही निसर्गाची किमया म्हण किँवा आणखी काही पण
हा तोच मुलगा आहे,
ज्याच्यावर तु प्रेम करतेस,
पण तुम्ही हे खात्रीने कसं सांगु शकता ???
त्यांनी एका जुन्या कपाटातुन फोटो काढला,
आणि तिला दाखवला तो फोटो तिचाच होता,
ही आहे ती मुलगी जी त्या मुलावर प्रेम
करायची आणि जिने त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला.....

तो फोटो शारदाचाच होता,
म्हणुनच तर
मी तुला पहील्यांदा दाराशी पाहीलं तेव्हा घाबरलो होतो,
मन सुन्न झालेल्या अवस्थेत शारदा तिथुन निघाली,
मनात असंख्य प्रश्न निर्माण झाले होते,
रवी मेलेला आहे ही गोष्ट गृहीत धरुन चालल्यास घडलेल्या बाकी सर्व
गोष्टीँचा योग्य तो मेळ बसत होता,
शारदाला ही गोष्ट पुर्णपणे पटली की,रवी जिवंत नाहीये.....

रात्र झाली शारदा पुन्हा रवीला भेटण्यासाठी त्याच
झाडाजवळ आली होती,
आज पुन्हा उशीर, अगं कितीवेळा तु उशीर करतेस ?
आणि हे डाव्या हाताला कापड कसलं बांधलयस ?
रवी मला तुला काही विचारायचंय ? मला खरं खरं सांगशील ?
हो, विचार नक्की खरंखरं सांगेन तुझा जन्म केव्हाचा आहे ?

रवीः शेवटी तुला सगळं कळलंय तर,
अगं मग मला असं तिरक्याने का विचारतेयस,
सरळ विचार ना...
होय मी एक आत्मा आहे,
मी तुला सगळं खरं खरं सांगतो,
त्याची गरज नाहीये, मला सगळं ठाऊक आहे,
मला फक्त
एवढंच सांग तु मला तुझ्याबरोबर नेणार आहेस की नाही ?
मी फक्त तु जिथे जाशील तिथेच जायचंय ? सांग मला सोबत नेशील ना ?
शारदा काय बोलतेयस तु ?मी तुझा जीव नाही घेउ शकत,
तुला कळत कसं नाही.असं काय करतेस तु ?
जे काय करायचं ते तासाभरापुर्वी केलंय मी.....

काय ? काय केलंयस तु ?
शारदाने आपल्या डाव्या हाताला बांधलेलं कापड काढलं,
आणि त्याला दाखवलं, तिच्या हाताची नस कापलेली होती...
अगं हे काय केलंस ? याने तुझा जीव जाईल चल...
थांब रवी माझा जीव मी आधीच दिलाय तासाभरापुर्वीच,
मी ही आत्ता जीवंत नाही, माझं शरीर मी मागे ठेवुन
आलेय,
आत्ता तरी मी तुझी होईल ना, आता तरी मला तुझ्यासोबत नेशील ना ?
रवीने शारदाला एक घट्ट मिठी मारली त्या मिठीतला ओलावा दोघेही अनुभवत होते,
दोघांच्याही डोळ्यात अश्रु भरुन वाहत होते,
पण ते जमिनीवरही पडत नव्हते, हवेतच विरुन जायचे,
जसं काही त्यांचं अस्तित्वच संपलंय
शारदा आणि रवीसारखं.........


(From FB POST)

Sunday, August 26, 2012

इन्कार्नेशन - द मिस्ट्री ऑफ लाईफ - ch 3. अजून एक बळी


इन्कार्नेशन - द मिस्ट्री ऑफ लाईफ

भाग ३ अजून एक बळी  



१ जानेवारी १९८७, धारावी पोलिस स्टेशन, दुपारी ४ वाजून २५ मिनिटे.   


हेड-कॉन्स्टेबल पवार आपल्या टेबलासमोरील खुर्चीत बसून चहा पित होते. चहा पिता-पिता त्यांचे लक्ष्य टेबलावर ठेवलेल्या फाईलींच्या गठ्ठयावर जात होते. त्या गठ्ठयात आज नवीन केसची भर पडल्याने ते फारच अस्वस्थ होते. ती केस होती त्या मुलीची – त्या अर्धवट जळालेल्या मुलीची. अनामिक नावे ती केस खुली होती. मुलीची असमत लुटल्याचे स्पष्ट दिसून येत असूनही त्या फाईल मध्ये अजूनही तसे काहीच लिहिले नव्हते. पोस्ट मार्टमचा रिपोर्ट अजून आला नसल्याने तसे काही नमूद करणेही शक्य नव्हते. वेळीच पोहचलेल्या फोटोग्राफरने निरनिराळ्या कोनातून काढलेले फोटो त्या फाईलमध्ये अनुक्रमे १, २, ३ अशी नावे देऊन संग्रहीत केलेले होते.

“कायकु सोचता है, उसके बारेंमे. छोड ना.” सब-इंस्पेक्टर मोईन खान पवारला विचारात गढलेले पाहून चेष्टेने म्हणाला.

“साहेब, त्या जागी अगर तुमची मुलगी असती तर?” पवार यांनी चेष्टेचे उत्तर प्रश्नाने दिले.
“सारा. नही नही. ए पवार, तू साला जास्तच विचार करतोयस. आता बस झालं हं.” मोईन खान पाय आपटत बाहेर निघून गेला.

पवार यांना माहीत होतं, मोईन खान त्याच्या मुलीवर – सारावर जिवापाड प्रेम करत असे. म्हणूनच त्यांनी मोईनच्या चेष्टेवर प्रश्नाचा असा अचूक बाण सोडला होता, जो वर्मी लागला होता.

पवार चहाचा कप टेबलावर ठेवत असतानाच एक इसम पोलिस चौकीच्या आवारात शिरताना त्यांनी पहिला. त्याने बोकडासारखी दाढी राखलेली होती. वय साधारणतः ३०-४० असावे. डोक्यावरील केस तुरळकच होते, जे होते तेही अस्त-व्यस्त होते. त्याने अंगात मळलेला पांढरा कमिज अन पायात तोकडा असा पायजमा घातलेला होता. तो पायजमा इतका तोकडा होता की त्याच्या पायात घातलेल्या पॅरागाँन भुईसपाट होत आलेल्या चपलांपासून तो दीड- वित उंचावर होता अन त्या काडी पैलवानाच्या काडीसमान पायांचे प्रदर्शन घडवित होता.

तो काडी पैलवान आता सरळ-सरळ पवारच्या टेबलाजवळ येऊन उभा राहीला. खरे तर उभा म्हणणे चुकीचे होईल की काय अशाच अवस्थेत तो होता. तो दारू मध्ये झिंगलेला दिसत होता.

“काय रे सकाळची उतरली नाय वाटतं? का आत्ताच घेऊन आलायस?” बाजूलाच उभा असलेल्या कॉन्स्टेबल शिंदेने त्याला फटकारत विचारले.

“साब मेरेको......” त्याने अडखळत बोलण्यास सुरुवात केली. पवार यांना दारूची फवारणी तोंडासमोर फवारल्यागत जाणवली.

“पुढं बोल की लेकाच्या.” तोंडावर रुमाल ठेवत पवार म्हणाले.                                           

“साब, साब मेरे को रपट लिखाना है” त्याने रडत सांगायला सुरुवात केली. “साब मेरा नाम हसन शेख, मै उधर धारावी के झोपडी मे रहता है. मेरेको दो बेटी और एक बेटा है साब. बडी का नाम अदा है वो कल रात को घर से गायब है साब.”

“रात को सोते वक्त तो हमारे साथ ही सोई थी. मै जब सुबह को उठा तो देखा की घर का दरवाजा खुला है. मै गुस्सेमे बेटी को चिल्लाया पर वो घर मे नही थी. मुझे लगा की गयी होगी दो नंबर को तो मै दरवाजा लगा के फिर सो गया”

तो श्वास घ्यायला थांबला. त्याच्या गालावरून अश्रु ओघळत होते. पवार यांना केसबद्दल हलकी जाणीव झाली. परंतु त्याच्या पुढील बोलण्याची वाट पाहत पवार म्हणाले, “और आगे?”

“निंद खुली तब सदाह और अल्ताफ दोनो रो-रोकर मुझे जगा रहे थे. वो कहने लगे, अब्बू आपा घर मे नही है. हमने आस पास बहुत ढुंढा पर वो कही नही मिल रही. इसके बाद मै भी उसे आसपास, पडोस मे ढुंढने लगा. पहचान वालोंसे उसके बारे मे पुछा पर कुछ पता नही चला तो यहा रपट लिखाने चला आया साब.”

“इन तस्विरोंको देख. कही ये तो नही?” समोरील फाईलमधील फोटो त्याच्यासमोर करत पवार म्हणाले.

“ये तो ..........” हसन किंचाळत उठला “ नफिसा बानो...” त्याच्या हातातून ते फोटो खाली गळून पडले . तो एखाद्या वेड्यासारखे आपले केस उपटू लागला. जोरात ओरडत तो पोलिस चौकीतून बाहेर पडला. पवार ही त्याच्यामागे धावत गेले. शिंदे ही मागोमाग होताच. हसन वेड्यासारखा इकडे तिकडे पळत सुटला होता. वेड्याच्या भरात तो मेन रस्ता ओलांडू लागला अन जोरात धप्प असा आवाज आला.


समोरून वेगात येणार्‍या डंपरने हसनला उडवले होते. तो ८-१० फुट दूर उडून रस्त्याच्या पलीकडील बाजूस पडला. त्याच्या डोक्याला जबरदस्त मार लागला होता. रक्त बरेच वाहू लागले होते. पवार धावत तेथे पोहचले. त्यांनी त्याची नाडी तपासली. त्याचे प्राण पखेरू केव्हाच उडून गेले होते.

Sunday, August 19, 2012

इन्कार्नेशन - द मिस्ट्री ऑफ लाईफ - ch १. अदा, धारावी अन क्राइम


इन्कार्नेशन - द मिस्ट्री ऑफ लाईफ

ch १. अदा, धारावी अन क्राइम


३१ डिसेंबर १९८६, धारावी, मुंबई, भारत.

१६ वर्षाची अदा स्टोव्हवर चपात्या भाजत होती. आपल्या दारू पिणार्‍या अब्बूसाठी, लहान भावंडांसाठी ती जेवण बनवत होती. ती दहा वर्षाची असतानाच तिची अम्मी अपघातात गेली होती. अब्बू तिच्या जाण्याच्या गममध्ये दारू पिऊ लागला होता. आता घराची सर्व जबाबदारी छोट्याश्या अदावर येऊन पडली होती. अन ती अदाने पुर्णपणे पार पाडत आणली होती.

घडाळ्याने रात्रीचे १० वाजवले. रात्रीचे जेवण आटोपून सर्व जण झोपण्याची तयारी करत होते. हसन – अदाचा अब्बू – जेवण न करताच आडवा झाला होता. दारू मध्ये तो झिंगला होता. त्याला अजिबात शुद्ध नव्हती. अल्ताफ व सदाह दोघे ही आता पेंगु लागले होते. सदाह १२ वर्षाची तर अल्ताफ १० वर्षाचा. त्यांना झोपवून ती ही आता झोपू लागली होती तोच दरवाजावर थाप पडली.
तिने दरवाजा हलकेच खोलला. दारात फारूख उभा होता.
“मामूजान” अदा आपल्या मामाला दारात पाहून आनंदली होती.  

अदाने नुकतेच तारुण्यात पदार्पण केले होते. २६ डिसेंबरला तिला सोळावे वर्ष लागले होते. आर्थिक परिस्थिति हालाकीची असून ही अल्लाहने तिला हुस्न भरभरून दिले होते॰ अन ते तिच्या फाटक्या-ठिगळे लावलेल्या कपड्यातून ओझरते दर्शन देत समोरील पुरुषाला कामुक बनवत असे. असेच रस्त्यावरून येतं जाता कित्येक पुरुष तिच्याकडे कामांधतेने बघत असत तर काहींनी तर तिच्यावर पाळतच ठेवली होती की कधी एकदाचा मौका मिळतोय अन तिचे हुस्न चाखायला मिळतय. अश्यातच एक जण होता असलम, जवळ जवळ तिच्याच वयाचा... नेहमी येता-जाता तो तिला रस्त्यात छेडत असे. एकदा तर त्याने हद्द्च केली. दुकानातून साखर घेऊन चाललेल्या अदाचा त्याने सरळ-सरळ भर रस्त्यात हात पकडला. अदा तर फार घाबरून गेली हातातली साखरेची थैली सुटून रस्त्यावर सांडली. अदाने हिम्मत करून असलमच्या थोबाडात लावून दिली. आपला हात कसं बसा सोडवून ती धावत घरी निघून गेली.

पण असलम इकडे धुसमुसळत होता. त्याच्या अंगाची लाहीलाही होत होती. त्याला भर रस्त्यात झालेल्या आपल्या अपमानाचा बदला घ्यायचा होता. अन त्यासाठी तो योग्य संधीची वाट पाहत होता. तो दिवस आज आला होता ३१ डिसेंबर.


१ जानेवरी १९८७, धारावी, मुंबई, भारत.

पहाटेचे ४ वाजले होते. धारावी पोलिस इंस्पेक्टर जाधव, सब-इंस्पेक्टर मोईन खान, हेड कॉन्स्टेबल पवार अन ड्रायवर वागळे पोलिस जीप मध्ये पेट्रोल्लिंग करत सायन रेल्वे स्टेशन पासून चालले होते. इतक्यात वायरलेस वाजू लागला.
हेड- कॉन्स्टेबल पवार यांनी वायरलेस वरील खबर नीट लिहून घेतली.
“साहेब, आपल्याला लगेच निघावे लागेल”. पवार
“च्या मायला, झालं वाटत काही तरी. च्या आईला...” एक शिवी हासडत इंस्पेक्टर जाधव म्हणाले “वागळे, वळव रे”

पाच मिनिटात ते जीप घेऊन त्या जागी पोहचले. नाल्याच्या किनार्‍यावर एका तरुण मुलीचे शव पडले होते. ती अर्धवट जळाली होती. अंगावरील कपडे ठीक-ठिकाणी फाटलेले होते. वक्षस्थळे उघडी पडलेली होती. सलवार ही गुडघ्या पर्यन्त फाटलेली होती. जबरण कपडे फाडलेल्याच्याही खुणा तिच्या शरीरावर होत्या. तिचा चेहरा एका बाजूने पूर्ण जळला होता. तिची ओळखही पटत नव्हती.                    
हेड कॉन्स्टेबल पवार यांनी आपला हात रुमाल तिच्या उघड्या वक्षस्तळावर पसरला ज्याने की तिची आब्रू झाकली जावी.     

“काय रं, तुझी कोण लागते का ?” इंस्पेक्टर जाधव दात विचकत म्हणाले. “चल बाजूला हो”
“लिव्हायला सुरुवात कर. ह्ं, शव मुलीचे आहे. वय साधारणतः १६-१७ वर्षे. अंगावरील कपडे फाटलेल्या अवस्थेत. ७०-८० टक्के जळालेली. अंगावर ठीक-ठिकाणी ओरबाडण्याच्या खुणा. गळ्यात तावीज. तावीजवर उर्दू अक्षरात काहीतरी कोरलेले आहे. कदाचित अल्लाह लिव्हलेले असावे. मुलगी मुस्लिम दिसते आहे. ओळख पटवण्याकरिता या खेरीज काही नाही.”
पवार यांनी ते डायरीत नीट लिहून ठेवले.