Sunday, August 26, 2012

इन्कार्नेशन - द मिस्ट्री ऑफ लाईफ - ch 3. अजून एक बळी


इन्कार्नेशन - द मिस्ट्री ऑफ लाईफ

भाग ३ अजून एक बळी  



१ जानेवारी १९८७, धारावी पोलिस स्टेशन, दुपारी ४ वाजून २५ मिनिटे.   


हेड-कॉन्स्टेबल पवार आपल्या टेबलासमोरील खुर्चीत बसून चहा पित होते. चहा पिता-पिता त्यांचे लक्ष्य टेबलावर ठेवलेल्या फाईलींच्या गठ्ठयावर जात होते. त्या गठ्ठयात आज नवीन केसची भर पडल्याने ते फारच अस्वस्थ होते. ती केस होती त्या मुलीची – त्या अर्धवट जळालेल्या मुलीची. अनामिक नावे ती केस खुली होती. मुलीची असमत लुटल्याचे स्पष्ट दिसून येत असूनही त्या फाईल मध्ये अजूनही तसे काहीच लिहिले नव्हते. पोस्ट मार्टमचा रिपोर्ट अजून आला नसल्याने तसे काही नमूद करणेही शक्य नव्हते. वेळीच पोहचलेल्या फोटोग्राफरने निरनिराळ्या कोनातून काढलेले फोटो त्या फाईलमध्ये अनुक्रमे १,, ३ अशी नावे देऊन संग्रहीत केलेले होते.

“कायकु सोचता है, उसके बारेंमे. छोड ना.” सब-इंस्पेक्टर मोईन खान पवारला विचारात गढलेले पाहून चेष्टेने म्हणाला.

“साहेब, त्या जागी अगर तुमची मुलगी असती तर?” पवार यांनी चेष्टेचे उत्तर प्रश्नाने दिले.
“सारा. नही नही. ए पवार, तू साला जास्तच विचार करतोयस. आता बस झालं हं.” मोईन खान पाय आपटत बाहेर निघून गेला.

पवार यांना माहीत होतं, मोईन खान त्याच्या मुलीवर – सारावर जिवापाड प्रेम करत असे. म्हणूनच त्यांनी मोईनच्या चेष्टेवर प्रश्नाचा असा अचूक बाण सोडला होता, जो वर्मी लागला होता.

पवार चहाचा कप टेबलावर ठेवत असतानाच एक इसम पोलिस चौकीच्या आवारात शिरताना त्यांनी पहिला. त्याने बोकडासारखी दाढी राखलेली होती. वय साधारणतः ३०-४० असावे. डोक्यावरील केस तुरळकच होते, जे होते तेही अस्त-व्यस्त होते. त्याने अंगात मळलेला पांढरा कमिज अन पायात तोकडा असा पायजमा घातलेला होता. तो पायजमा इतका तोकडा होता की त्याच्या पायात घातलेल्या पॅरागाँन भुईसपाट होत आलेल्या चपलांपासून तो दीड- वित उंचावर होता अन त्या काडी पैलवानाच्या काडीसमान पायांचे प्रदर्शन घडवित होता.

तो काडी पैलवान आता सरळ-सरळ पवारच्या टेबलाजवळ येऊन उभा राहीला. खरे तर उभा म्हणणे चुकीचे होईल की काय अशाच अवस्थेत तो होता. तो दारू मध्ये झिंगलेला दिसत होता.

“काय रे सकाळची उतरली नाय वाटतं? का आत्ताच घेऊन आलायस?” बाजूलाच उभा असलेल्या कॉन्स्टेबल शिंदेने त्याला फटकारत विचारले.

“साब मेरेको......” त्याने अडखळत बोलण्यास सुरुवात केली. पवार यांना दारूची फवारणी तोंडासमोर फवारल्यागत जाणवली.

“पुढं बोल की लेकाच्या.” तोंडावर रुमाल ठेवत पवार म्हणाले.                                           

“साब, साब मेरे को रपट लिखाना है” त्याने रडत सांगायला सुरुवात केली. “साब मेरा नाम हसन शेख, मै उधर धारावी के झोपडी मे रहता है. मेरेको दो बेटी और एक बेटा है साब. बडी का नाम अदा है वो कल रात को घर से गायब है साब.”

“रात को सोते वक्त तो हमारे साथ ही सोई थी. मै जब सुबह को उठा तो देखा की घर का दरवाजा खुला है. मै गुस्सेमे बेटी को चिल्लाया पर वो घर मे नही थी. मुझे लगा की गयी होगी दो नंबर को तो मै दरवाजा लगा के फिर सो गया”

तो श्वास घ्यायला थांबला. त्याच्या गालावरून अश्रु ओघळत होते. पवार यांना केसबद्दल हलकी जाणीव झाली. परंतु त्याच्या पुढील बोलण्याची वाट पाहत पवार म्हणाले, “और आगे?”

“निंद खुली तब सदाह और अल्ताफ दोनो रो-रोकर मुझे जगा रहे थे. वो कहने लगे, अब्बू आपा घर मे नही है. हमने आस पास बहुत ढुंढा पर वो कही नही मिल रही. इसके बाद मै भी उसे आसपास, पडोस मे ढुंढने लगा. पहचान वालोंसे उसके बारे मे पुछा पर कुछ पता नही चला तो यहा रपट लिखाने चला आया साब.”

“इन तस्विरोंको देख. कही ये तो नही?” समोरील फाईलमधील फोटो त्याच्यासमोर करत पवार म्हणाले.

“ये तो ..........” हसन किंचाळत उठला “ नफिसा बानो...” त्याच्या हातातून ते फोटो खाली गळून पडले . तो एखाद्या वेड्यासारखे आपले केस उपटू लागला. जोरात ओरडत तो पोलिस चौकीतून बाहेर पडला. पवार ही त्याच्यामागे धावत गेले. शिंदे ही मागोमाग होताच. हसन वेड्यासारखा इकडे तिकडे पळत सुटला होता. वेड्याच्या भरात तो मेन रस्ता ओलांडू लागला अन जोरात धप्प असा आवाज आला.


समोरून वेगात येणार्‍या डंपरने हसनला उडवले होते. तो ८-१० फुट दूर उडून रस्त्याच्या पलीकडील बाजूस पडला. त्याच्या डोक्याला जबरदस्त मार लागला होता. रक्त बरेच वाहू लागले होते. पवार धावत तेथे पोहचले. त्यांनी त्याची नाडी तपासली. त्याचे प्राण पखेरू केव्हाच उडून गेले होते.

Sunday, August 19, 2012

इन्कार्नेशन - द मिस्ट्री ऑफ लाईफ - ch १. अदा, धारावी अन क्राइम


इन्कार्नेशन - द मिस्ट्री ऑफ लाईफ

ch १. अदा, धारावी अन क्राइम


३१ डिसेंबर १९८६, धारावी, मुंबई, भारत.

१६ वर्षाची अदा स्टोव्हवर चपात्या भाजत होती. आपल्या दारू पिणार्‍या अब्बूसाठी, लहान भावंडांसाठी ती जेवण बनवत होती. ती दहा वर्षाची असतानाच तिची अम्मी अपघातात गेली होती. अब्बू तिच्या जाण्याच्या गममध्ये दारू पिऊ लागला होता. आता घराची सर्व जबाबदारी छोट्याश्या अदावर येऊन पडली होती. अन ती अदाने पुर्णपणे पार पाडत आणली होती.

घडाळ्याने रात्रीचे १० वाजवले. रात्रीचे जेवण आटोपून सर्व जण झोपण्याची तयारी करत होते. हसन – अदाचा अब्बू – जेवण न करताच आडवा झाला होता. दारू मध्ये तो झिंगला होता. त्याला अजिबात शुद्ध नव्हती. अल्ताफ व सदाह दोघे ही आता पेंगु लागले होते. सदाह १२ वर्षाची तर अल्ताफ १० वर्षाचा. त्यांना झोपवून ती ही आता झोपू लागली होती तोच दरवाजावर थाप पडली.
तिने दरवाजा हलकेच खोलला. दारात फारूख उभा होता.
“मामूजान” अदा आपल्या मामाला दारात पाहून आनंदली होती.  

अदाने नुकतेच तारुण्यात पदार्पण केले होते. २६ डिसेंबरला तिला सोळावे वर्ष लागले होते. आर्थिक परिस्थिति हालाकीची असून ही अल्लाहने तिला हुस्न भरभरून दिले होते॰ अन ते तिच्या फाटक्या-ठिगळे लावलेल्या कपड्यातून ओझरते दर्शन देत समोरील पुरुषाला कामुक बनवत असे. असेच रस्त्यावरून येतं जाता कित्येक पुरुष तिच्याकडे कामांधतेने बघत असत तर काहींनी तर तिच्यावर पाळतच ठेवली होती की कधी एकदाचा मौका मिळतोय अन तिचे हुस्न चाखायला मिळतय. अश्यातच एक जण होता असलम, जवळ जवळ तिच्याच वयाचा... नेहमी येता-जाता तो तिला रस्त्यात छेडत असे. एकदा तर त्याने हद्द्च केली. दुकानातून साखर घेऊन चाललेल्या अदाचा त्याने सरळ-सरळ भर रस्त्यात हात पकडला. अदा तर फार घाबरून गेली हातातली साखरेची थैली सुटून रस्त्यावर सांडली. अदाने हिम्मत करून असलमच्या थोबाडात लावून दिली. आपला हात कसं बसा सोडवून ती धावत घरी निघून गेली.

पण असलम इकडे धुसमुसळत होता. त्याच्या अंगाची लाहीलाही होत होती. त्याला भर रस्त्यात झालेल्या आपल्या अपमानाचा बदला घ्यायचा होता. अन त्यासाठी तो योग्य संधीची वाट पाहत होता. तो दिवस आज आला होता ३१ डिसेंबर.


१ जानेवरी १९८७, धारावी, मुंबई, भारत.

पहाटेचे ४ वाजले होते. धारावी पोलिस इंस्पेक्टर जाधव, सब-इंस्पेक्टर मोईन खान, हेड कॉन्स्टेबल पवार अन ड्रायवर वागळे पोलिस जीप मध्ये पेट्रोल्लिंग करत सायन रेल्वे स्टेशन पासून चालले होते. इतक्यात वायरलेस वाजू लागला.
हेड- कॉन्स्टेबल पवार यांनी वायरलेस वरील खबर नीट लिहून घेतली.
“साहेब, आपल्याला लगेच निघावे लागेल”. पवार
“च्या मायला, झालं वाटत काही तरी. च्या आईला...” एक शिवी हासडत इंस्पेक्टर जाधव म्हणालेवागळे, वळव रे”

पाच मिनिटात ते जीप घेऊन त्या जागी पोहचले. नाल्याच्या किनार्‍यावर एका तरुण मुलीचे शव पडले होते. ती अर्धवट जळाली होती. अंगावरील कपडे ठीक-ठिकाणी फाटलेले होते. वक्षस्थळे उघडी पडलेली होती. सलवार ही गुडघ्या पर्यन्त फाटलेली होती. जबरण कपडे फाडलेल्याच्याही खुणा तिच्या शरीरावर होत्या. तिचा चेहरा एका बाजूने पूर्ण जळला होता. तिची ओळखही पटत नव्हती.                    
हेड कॉन्स्टेबल पवार यांनी आपला हात रुमाल तिच्या उघड्या वक्षस्तळावर पसरला ज्याने की तिची आब्रू झाकली जावी.     

“काय रं, तुझी कोण लागते का ?” इंस्पेक्टर जाधव दात विचकत म्हणाले. “चल बाजूला हो”
“लिव्हायला सुरुवात करह्ं, शव मुलीचे आहे. वय साधारणतः १६-१७ वर्षे. अंगावरील कपडे फाटलेल्या अवस्थेत. ७०-८० टक्के जळालेली. अंगावर ठीक-ठिकाणी ओरबाडण्याच्या खुणा. गळ्यात तावीज. तावीजवर उर्दू अक्षरात काहीतरी कोरलेले आहे. कदाचित अल्लाह लिव्हलेले असावे. मुलगी मुस्लिम दिसते आहे. ओळख पटवण्याकरिता या खेरीज काही नाही.”
पवार यांनी ते डायरीत नीट लिहून ठेवले.

Wednesday, April 25, 2012

द एलिअन टेक्नोलॉजी - ch १३. क्षिनावरील हल्ला

द एलिअन टेक्नोलॉजी  - ch १३. क्षिनावरील हल्ला

क्षिनाला आता पर्यन्त कळून चुकले होते की ती आता काळ नावाच्या डायमेंशन मध्ये येऊन पोहचली होती. इथे काळाचे मापदंड वेगळेच होते. प्रत्येक क्षणाला काळ आपले रूप बदलत होता. आता तिला त्या डायमेंशन मध्ये थांबणे धोक्याचे होते, काही क्षणातच तिच्यावर तिथल्या काळाचा परिणाम होणार होता. त्या आधीच तिला तिथून निघणे फार गरजेचे होते.

क्षिनाने स्पेस शटल मागे वळवले. पुन्हा तिने जेलटेक इंजिन चालू केले. आता ती आपल्या डायमेंशन कडे परतीचा प्रवास करू लागली. आलेल्या काळ्या गोलामधून तिचे स्पेस शटल जाऊ लागले. काही अंतर कापल्यावर क्षिना पुन्हा जल डायमेंशन मध्ये येवून पोहचली.

क्षिना आपला मार्ग चुकली होती. तिला डायमेंशनच्या प्रवासाबद्दल तशी फार माहिती होती, परंतु या आधी तिने स्वतः कधीच  ब्लॅकहोलचा प्रवास केला नव्हता. तिच्याकडे जी काही माहिती होती, ती सर्वच तिला डॉ. स्पेन्स कडूनच मिळाली होती. खर तर डॉ. स्पेन्स यांनी ब्लॅकहोलचा व त्याच्या प्रवासाचा सिद्धांत मांडला होता. त्यांनी यासाठीच  ब्लॅकहोलचे प्रायोगिक प्रवास केले होते आणि पहिले ३७ डायमेंशनस शोधून काढले.  त्यांच्या सिद्धांतानुसार ब्लॅकहोल हा एका दुंनियेतून दुसर्‍या दुनियेत जाण्याचा मार्ग आहे. परंतु त्यासाठी त्या ब्लॅकहोलची  पूर्व माहिती असणे गरजेचे आहे अन्यथा अघटित असा प्रसंग ओढवू शकतो.

अन नेमकी हीच चूक क्षिना करून बसली होती. तिच्याकडे या शिवाय दूसरा जलद असा मार्गच नव्हता.

क्षिना आपल्या जवळ असलेल्या गॅलेक्टीक स्पेस मॅपवर दिशा निर्देशाचे संकेत पाहू लागली. स्पेस मॅप शून्य दिशा निर्देश करत इथून तिकडे सुई फिरवत होता. जल डायमेन्शनमध्ये ते स्पेस शटल पुढे जाऊ लागले.

अचानक क्षिनाच्या स्पेस शटलला डावीकडून जोरात हिसका बसला. त्या धक्क्यामुळे शटल उजव्या बाजूस कलंडले. कसेबसे क्षिनाने ते स्पेस शटल सावरले होते. जमिनीतून वर आलेल्या खडकाला  शटल धडकल्याने तो जोरदार हिसका बसला असावा असे समजून क्षिनाने ते शटल पुन्हा समोर हाकले. परंतु क्षिना एक महत्त्वाची गोष्ट विसरून गेली होती, जल डायमेंशनमध्ये जमिनीचा लवलेश हि नव्हता, जलाखालीही.

शटल काही अंतर गेले असेल तोच स्पेस शटलला पुन्हा डावीकडून जोरात हिसका बसला. लगोलग उजवीकडून हि तसाच हिसका बसला. आता मात्र क्षिनाला धोक्याची जाणीव झाली. तिच्या स्पेस शटलवर हल्ला करण्यात आला होता.  

आता एकाच वेळी उजवी अन डावी बाजू दोन्हीकडून शटलवर हल्ले होवू लागले. शटलवर हल्ले करणारे ते भीमकाय असे प्राणी पृथ्वीवरील ब्लू व्हेल पेक्ष्या आकाराने तिप्पट होते. ते सारेच झुंडीत राहून शिकार करीत असावेत. यावेळीही सहा- सात च्या जोडीने ते प्राणी क्षिनाच्या शटलवर हल्ले चढवीत होते. 

अश्या भीमकाय प्राण्यांच्या हल्ल्यातून क्षिनाचे जिवंत वाचणे अशक्यच दिसत होते. 

क्रमशः   

Previous / Next