शारदा किती उशीर किती वेळ तुझी वाट पाहायची,
रात्रीचे साडे अकरा वाजुन गेले की गं,
अरे हो रे, आज थोडा उशीरच झाला,
पण तुझ्यासाठी काही आणलंय मी ?
काय ?
उकडीचे मोदक तुला खुप आवडतात ना ??
हो खुपच आवडतात, रवी डब्यातला एक मोदक
खातो.....
आणि तिच्याकडे बघुन विचारात पडतो तिला विचारतो,
"शारदा तुला भिती नाही का गं वाटत ?
गेली सहा महीने रोज रात्री आपण या झाडाखाली भेटतो,
तु माझ्यासाठी कायम काही ना काही घेऊ,
न येतेस कशाची भीती ?
भुताखेतांची ?
बावळटच आहेस भुत वगैरे काही नसतं रे,
आणि एकदिवस खरंच भुताने वाटेत तुला आडवलं तर ?
तर ते भुत तुच असशील,
चेष्टा पुरे हं आता.....
Ok Sorry, Sorry तु असलास की,
मला कसलीही भीती वाटत नाही रवी,
असं,मग मी तुझ्यासाठी किती महत्त्वाचा आहे सांग
ना मला ?
पुन्हा कधीतरी सांगेन,
आत्ता उशीर होतोय मला जायला हवं,
अगं पण जाताना ते एकदा म्हणुन जा ना,
जे ऐकायसाठी मी इथे आलोय,
तुच म्हण ना मग.....
i Love u Sharada...
Mi too.....
12 तासानंतर .....
शारदाला वाचनाची खुपच आवड आहे,
पण कामाच्या ओघामुळे तिला गेले कित्येक दिवस वेळच
मिळाला नाही वाचनासाठी,
पण आज तिला वेळ मिळालाय,
म्हणुन ती स्वातंत्रपुर्व काळापासुन
असलेल्या एका ग्रंथालयात गेलीय,
तिथल्या धुळखात पडलेल्या बर्याच पुस्तकांच्या कपाटामध्ये ती सत्यकथांवर
आधारीत असलेली पुस्तके शोधतीये...
त्यामध्ये तिला एक पुस्तक मिळतं जे पंचवीस
वर्षापुर्वी घडलेल्या एका सत्यघटनेवर आधारीत पुस्तक
आहे,
जेव्हा ती ते पुस्तक उघडते,
तेव्हा तीच्या पायाखालची जमिनच सरकते,
तिच्या तोंडचं पाणी पळतं, अंगाचा थरकाप होतो,
ती त्या पुस्तकातली काहीच पाने उलगडतीये,
त्यानंतर ते पुस्तक घेउन
या पुस्तकाच्या लेखकाला भेटण्याची इच्छा ती तिथल्या ग्रंथालया
व्यक्त करते.....
त्यांच्याकडे ऊपलब्ध माहीतीद्वारे ते शारदाला त्या लेखकाचा योग्य पत्ता देतात,
तो लेखक इथुन फक्त दोन तासाच्या अंतरावर असतो,
शारदा लवकरच त्यांच्या घरी पोहोचते,
एक पंच्याहत्तर वर्षाचे वृद्ध दरवाजा उघडतात...
दारात उभ्या असलेल्या शारदाला पाहुन ते खुपच घाबरतात,
त्यांना जब्बर मानसिक धक्का बसतो,
त्यांची ही अवस्था पाहुन शारदाला वाटतं,
की ते आपल्याला आधीपासुनच ओळखतात,
आणि तिला खुपच घाबरताहेत,
हे पाहुन शारदा त्यांना आपली व्यवस्थित ओळख करुन
देते,
तेव्हा कुठे जाऊन त्यांची परिस्थिती स्थिर होते,
तेच त्या पुस्तकाचे लेखक होते,
त्यांनी लिहीलेल्या पुस्तकातील या सत्यघटनेविषयी शारदा त्यांना विचारते.....
ते सांगु लागतात ; पंचवीस वर्षापुर्वीची गोष्ट
आहे,
जेव्हा मी पार्किन्सन कंपनीतल्या रिसर्च कमिटीत
काम करायचो,
एका खेडेगावात आमचा प्लांट लागणार
होता म्हणुन आमची कमिटी तिथलं निरीक्षण
करायला गेली होती,
पण त्या दिवशी तिथले गावकरी एका युवकाला जबर मारहाण करत आणत होते...
एक मुलगी जीवाच्या आकांताने रडत होती,
त्याला मारु नका, त्याला मारु नका, असं म्हणत होती...
पण कोणीही ऐकलं नाही आणि सर्वाँसमोर त्याला एका झाडावर लटकवण्यात
आलं आणि त्यातच त्याचा मृत्यु झाला.....
पण हे कसं शक्य आहे या पुस्तकात जो फोटो दिलाय
तो तर माझ्या प्रियकराचा आहे,
त्याला तर मी रोज भेटते आणि आम्ही दोघं एकमेकांवर खुप प्रेम करतो,
मी तर या पुस्तकातला याचा फोटो बघुनच तुमच्याकडे आलेय...
पोरी ही निसर्गाची किमया म्हण किँवा आणखी काही पण
हा तोच मुलगा आहे,
ज्याच्यावर तु प्रेम करतेस,
पण तुम्ही हे खात्रीने कसं सांगु शकता ???
त्यांनी एका जुन्या कपाटातुन फोटो काढला,
आणि तिला दाखवला तो फोटो तिचाच होता,
ही आहे ती मुलगी जी त्या मुलावर प्रेम
करायची आणि जिने त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला.....
तो फोटो शारदाचाच होता,
म्हणुनच तर
मी तुला पहील्यांदा दाराशी पाहीलं तेव्हा घाबरलो होतो,
मन सुन्न झालेल्या अवस्थेत शारदा तिथुन निघाली,
मनात असंख्य प्रश्न निर्माण झाले होते,
रवी मेलेला आहे ही गोष्ट गृहीत धरुन चालल्यास घडलेल्या बाकी सर्व
गोष्टीँचा योग्य तो मेळ बसत होता,
शारदाला ही गोष्ट पुर्णपणे पटली की,रवी जिवंत नाहीये.....
रात्र झाली शारदा पुन्हा रवीला भेटण्यासाठी त्याच
झाडाजवळ आली होती,
आज पुन्हा उशीर, अगं कितीवेळा तु उशीर करतेस ?
आणि हे डाव्या हाताला कापड कसलं बांधलयस ?
रवी मला तुला काही विचारायचंय ? मला खरं खरं सांगशील ?
हो, विचार नक्की खरंखरं सांगेन तुझा जन्म केव्हाचा आहे ?
रवीः शेवटी तुला सगळं कळलंय तर,
अगं मग मला असं तिरक्याने का विचारतेयस,
सरळ विचार ना...
होय मी एक आत्मा आहे,
मी तुला सगळं खरं खरं सांगतो,
त्याची गरज नाहीये, मला सगळं ठाऊक आहे,
मला फक्त
एवढंच सांग तु मला तुझ्याबरोबर नेणार आहेस की नाही ?
मी फक्त तु जिथे जाशील तिथेच जायचंय ? सांग मला सोबत नेशील ना ?
शारदा काय बोलतेयस तु ?मी तुझा जीव नाही घेउ शकत,
तुला कळत कसं नाही.असं काय करतेस तु ?
जे काय करायचं ते तासाभरापुर्वी केलंय मी.....
काय ? काय केलंयस तु ?
शारदाने आपल्या डाव्या हाताला बांधलेलं कापड काढलं,
आणि त्याला दाखवलं, तिच्या हाताची नस कापलेली होती...
अगं हे काय केलंस ? याने तुझा जीव जाईल चल...
थांब रवी माझा जीव मी आधीच दिलाय तासाभरापुर्वीच,
मी ही आत्ता जीवंत नाही, माझं शरीर मी मागे ठेवुन
आलेय,
आत्ता तरी मी तुझी होईल ना, आता तरी मला तुझ्यासोबत नेशील ना ?
रवीने शारदाला एक घट्ट मिठी मारली त्या मिठीतला ओलावा दोघेही अनुभवत होते,
दोघांच्याही डोळ्यात अश्रु भरुन वाहत होते,
पण ते जमिनीवरही पडत नव्हते, हवेतच विरुन जायचे,
जसं काही त्यांचं अस्तित्वच संपलंय
शारदा आणि रवीसारखं.........
(From FB POST)