भाग ८
वेदिक व्हिलेज स्पा रिसॉर्ट हे कोलकातामधील आंतरराष्ट्रीय विमानतळापासून केवळ २० मिनिटांच्या अंतराने लपलेले रत्न. बंगालमधील गावांच्या खऱ्या वास्तुशिल्पानुसार आडवे बांधलेले, जागतिक दर्जाचे लक्झरी एकमेव असे लँडस्केप रिसॉर्ट. अतुलनीय इनडोर लक्झरीसह अद्वितीय नैसर्गिक सौंदर्य आणि बाह्य मनोरंजन यांचा मेळ पाहायला देशविदेशातून लोकं इथे येतात. १५० एकर सुपीक शेतातील हिरवीगार झाडे, पाणीदार निळंशार तलाव, नारळाची उंच उंच झाडे आणि इतर वनसंपत्ती, मन शांत करण्यासाठी आल्हाददायक असे वातावरण. हे म्हणजे प्रवासी पक्षी, फुलपाखरे, गिलहरी आणि विदेशी वनस्पतींच्या प्रजातींसाठी आश्रयस्थानच .
आठवड्याचे शेवटचे दिवस, कुटुंब सुट्ट्या, कॉर्पोरेट रिट्रीट आणि डेस्टिनेशन वेडडींग साठी एक परिपूर्ण असे हे ठिकाण. पारंपारिक, कला आणि स्वभावाचे एक अद्वितीय वातावरण असलेल्या अश्या शांत ठिकाणी मोठमोठाल्या शोरगुल मध्ये आताच एक कॉर्पोरेट पार्टी संपन्न झाली होती. ५.८ इंच उंचीचा सावळासा पण आकर्षक असा इसम आपला ब्लु रंगाचा ब्लेझर एका हातात अन दुसऱ्या हातात रेड वाईन चा ग्लास सांभाळत आपल्या कॉटेज कडे निघाला होता. २७-२८ वर्षाची सुंदर तरुणी त्या इसमाचा पाठलाग करत होती. तिने चकचकीत असा रेड कलर चा वन पीस सूट घातला होता. डावीबाजूस मांडीपासून ते पायातील हिल पर्यंत वन साईट कट होता अश्यातच तिचे गोरेपान पाय त्या कट मधून बाहेर येई अन तिच्या सौंदर्याचे ओझरते दर्शन करवीत.
"राहुल, एक मिनिट थांब." राहुलच्या मागून येणाऱ्या त्या तरुणीने आदेश दिला.
"येस, बॉस" राहुल मागे न वळताच जागीच थांबत म्हणाला.
"डोन्ट यु हॅव गट्स तो से इट." ती तरुणी राहुलच्या जवळ जात म्हणाली.
"सी रीमा, आय एम ऑलरेडी मार्रीईड. आणि हि बघ त्याची निशाणी. " राहुल आपल्या बोटातील रिंग दाखवत म्हणाला.
"बट, आय क्नो यु लव्ह मी."
"दॅट वॉज हिस्टरी, वी वेअर इम-मॅच्युअरड. वी हार्डली क्नो अबाऊट राईट अँड रॉंग. "
"बट आय कॅन सी दि सेम लव्ह इन युअर आईज."
"यु आर ड्रंक. नशा चढली आहे तुला. "
"हो चढली आहे नशा, नशा तुझ्या प्रेमाची, तुझ्या मिठीत येण्याची. पूर्वीसारखीच" रीमा. "किती रोमँटिक वातावरण आहे. जरा बघ माझ्याकडे यौवन कसे ओसंडून वाहत आहे. या डोलदार शरीराचे प्रत्येक अंग बघ कसे ज्वानीच्या रसाने भरलेले आहेत. बघ नीट जरा माझ्याकडे मी हि अशी कमलनयना, मादक मोहिनी, मंद धुंदीत तुझ्या प्रेमासाठी आसुसलेली. तुला प्रेमाची हाक मारत आहे. तुला काहीच कसे नाही वाटत. माझं शरीर तुझ्या स्पर्शासाठी बघ किती आसुसलेलं आहे. " मादक हालचाली करत रीमाने राहुलचा हात आपल्या वक्षस्तळावर धरला.
"स्टॉप इट. " राहुलने तिचा हात झिडकारून आपला हात मागे घेतला ."आय विल ड्रॉप यु टू युअर रूम. अँड आय डोन्ट वॉन्ट टू हिअर धिस नॉन-सेन्स फ्रॉम यु. सो प्लिज शट अप. " राहुल रीमाच्या दंडाला धरत म्हणाला.
"राहुल, इट्स हर्टींग मी."
"इट्स गुड फॉर यु. बी इन युअर लिमिट्स. "
"ओके. आय कॅन गो टू माय रूम, अलोन. नो नीड फॉर युअर काईन्डनेस. थॅन्क्यु व्हेरी मच." हात झिडकारून रीमा आपल्या रूम कडे निघून गेली . राहुल तिच्या पाठमोऱ्या आकृती कडे पाहतच राहिला.
"व्हाई डिड यु ब्रेक माय हार्ट, व्हाई डिड वी फॉल इन लव्ह... " खिश्यात असलेला आई फोन आपली संगीतमय रिंगटोन ऐकवू लागला.
"येस डॅड, व्हॉट इस इट ?" राहुल त्रासिक चेहरा करत फोन उचलला. पलीकडून बंडोपंत बोलत होते.
"ओके, आय विल लिव्ह बाय टुमारो मॉर्निंग. विल टेक फर्स्ट फ्लाईट."
"ओके, बाय बेटा. पण लवकर निघ."
"बाय डॅड" राहुल आपल्या रूमचे लॉक कीकार्ड ने खोलत म्हणाला. पण त्याला माहित नव्हते कि त्याच्या रूम मध्ये त्याच्यासाठी कोणीतरी आधीच वाट बघत बसले होते, ते हि अंधारात.
----------
रीमा राहुलचा हात झिडकारून आपल्या रूमच्या दिशेने चालू लागली. काही अंतर गेल्यावर तिला जाणवू लागले कि कोणीतरी तिचा पाठलाग करत आहे. कोणी तरी आहे जो तिच्या सर्व हालचालींवर नजर ठेवून आहे. रीमाने कानाच्या कोपऱ्यातून मागे पहिले, कोणी दिसते आहे का ते. तिला फक्त एक सावली दिसली. रीमा गर्र्कन मागे वळली. मागे कोणीच नव्हते. तिने इकडे तिकडे पाहिले, कोणीच नव्हते. आपला एक भास असावा असे स्वतःला समजावत ती तिच्या रूम कडे वळली. डावीकडे थोड्या अंतरावर तिची रूम होती. हातातल्या मखमली पर्समधून रूम चे कीकार्ड काढून ती रूम उघडणार तोच तिला पुन्हा कोणाची तरी चाहूल भासली. ती पुन्हा मागे वळली. पण कोणीच नव्हते.
रीमाने रूमचे लॉक उघडले, आत शिरून दरवाजा पुन्हा लावणार तोच मागून कोणीतरी तिला घट्ट पकडले. त्याचा एक हात तिच्या डाव्या वक्षस्तळावर होता, दुसऱ्या हाताने त्याने तिच्या तोंडावर क्लोरोफॉर्म चा रुमाल दाबून धरला. रीमाने आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला. त्याच्या हातातून सुटण्याचा आटोकाट प्रयत्न केला पण त्याचे हात राकट अन पिळदार होते. त्याची मिठी जणू मगरमिठीच होती.
२-३ मिनिटात रीमा बेशुद्धावस्थेत होती. त्या व्यक्तीने रूमचा दरवाजा लावून घेतला. रीमाला उचलून आतल्या रूममधील बेड वर झोपवले.
जे आता रीमा सोबत घडणार होते त्याचा कदाचित रीमाने स्वप्नातही विचार केला नव्हता. ती व्यक्ती आपले काम करण्यासाठी सज्ज होती, त्याच्या हातात भला मोठा सुरा होता. त्यानेच त्याचे काम पूर्ण होणार होते.
----------------
"बाय डॅड" राहुल आपल्या रूमचे लॉक कीकार्ड ने खोलत म्हणाला. राहुल दार सरकवून आत शिरला अन त्याने न पाहताच दार पुन्हा लोटून दिले. अंधारात चाचपडत त्याने की कार्ड होल्डर शोधले. कीकार्ड त्यात ठेवत असतानाच त्याच्या मानेवर जोरात आघात झाला. राहुल बेशुद्ध स्थितीत फ्लोअर वर निपचित पडला होता.
क्रमशः
क्रमशः