Wednesday, July 27, 2011

शोध पानांचा - भाग ४

भाग ४

वाड्यासमोर काळी महिंद्रा स्कॉर्पिओ येऊन उभी राहिली. त्यामधून निखिल खाली उतरला, गाडीला लॉक करून तो वाड्याच्या मुख्य दरवाज्याकडे चालू लागला. दरवाज्याजवळ पोहचताच निखिलची आणि दरवाज्यातून बाहेर पडणार्‍या इंस्पेक्टर बाजीराव शिंदेची नजरानजर झाली. बाजीराव शिंदेची पोलिसी करडी नजर निखिलची नखशिखांत तपासणी करत होती. निखिल इंस्पेक्टर शिंदेची पर्वा न करता त्याला डावलून दरवाज्यातून आत शिरला.

वाड्याच्या ओसरीत बांधलेल्या झोपळ्यावर बंडोपंत बसले होते. त्यांचा चेहरा चिंताग्रस्त दिसत होता, कसला तरी विचार करत होते ते. जवळच ओट्यावर जॉनी हिरमुसून बसला होता. त्याच्या बसण्याच्या कृतीवरून तरी तो कोणावर तरी नाराज असल्याचे जाणवत होते.

"काका आला, काका आला." ओसरी लगतच्या खोलीतून बाहेर पडणार्‍या हर्षने निखिलला पहिले अन आनंदाने ओरडू लागला." काका, माझ्यासाठी तू खाऊ काय आणलास?"

निखिल काही बोलणार इतक्यात बंडोपंत झोपाळ्यावरून उठत म्हणाले.
"निखिल बेटा, तू आलास? बर झालं तू लवकर आलास"

 "हो डॅड, तुम्ही फोन केलात ना तेव्हाच निघालो होतो."
आता पर्यन्त हर्षचा गोंधळ ऐकून गायत्री वाहिनी, जेष्ठा - राहुल-निखिलची छोटी बहीण - सगळेच बाहेर आले होते. जॉनी तर ताजा तवाना होऊन निखीलकडे झेपावला होता. निखिलने त्याला गोंजारले तसं जॉनी आपलं शेपूट हलवून त्याच्या मागे पुढे करू लागला.

"काका सांग ना रे माझ्यासाठी काय खाऊ आणलायस्स ते?" हर्ष निखिलला लाडीगोडी लावू पाहत होता.

निखिलने खिश्यातून दोन डेअरी - मिल्कची चॉक्लेटस काढून हर्षच्या हातावर ठेवली. हर्षरावांची स्वारी पार खुश होवून गेली. ती चॉक्लेटस घेऊन हर्ष निसटणार इतक्यात निखिलने त्याच हात पकडला. हर्ष कावराबावरा होऊन निखिल कडे पाहत राहिला.

"आधी आम्हाला पा नंतर चॉक्लेटस." म्हणत निखिलने आपला गाल पुढे केला.

हर्ष निखिलच्या गालावर हलकेच पापी देऊन चॉक्लेटस घेऊन तिथून पसार झाला.

"निखिल तू, जरा फ्रेश होऊन ये. तो पर्यन्त मी खायला बनवते." गायत्री.
"हो पण आई कुठे आहे?" निखिल.
"बेटा निखिल, तू फ्रेश हो मग आपण बोलू या." बंडोपंत.
"ओके डॅड, आय विल बी बॅक इन जस्ट १५ मिनिट्स"

गायत्री अन जेष्ठा डायनिंग टेबलवर जेवणाची ताटे मांडत होत्या. बाहेर ओसरीत निखिल अन बंडोपंत घडलेल्या गोष्टीवर विचार-विनिमय करत होते. अचानक निखिलला काहीतरी आठवले, तो म्हणाला.

"डॅड ,मगाशी मी जेव्हा वाड्यात शिरत होतो तेव्हा मी एका पोलिस इंस्पेक्टरला वाड्याबाहेर जाताना पहिले. कोण होता तो, अन इथं काय करत होता ?" निखिल.

"अरे तो ना बाजीराव होता, इंस्पेक्टर बाजीराव शिंदे. झालेल्या घटनांची पुरेपूर माहीती घ्यायला तो आला होता. ही केस त्याच्याच अन्डर आहे."

"अच्छा तर ती पेटी, तो नकाशा अन ती चावी सर्व कुठे आहे?" निखिल

"ते सगळे पोलिसांच्या ताब्यात आहेत आणि ते मानवी हाड सुद्धा. कदाचित आपल्या वाड्यावर खून झाला असावा...."बंडोपंत अडखळत बोलत होते.

"माझाही तोच संशय आहे." इंस्पेक्टर बाजीराव शिंदे पुन्हा वाड्यात शिरला होता.  
   
क्रमशः

भाग ३                                                                                                                  भाग ५  

Sunday, July 24, 2011

शोध पानांचा - भाग ३

भाग ३

मुंबई- पुणे एक्सप्रेस हायवेवर काळ्या रंगाची एक महिंद्रा स्कोर्पिओ पुण्याच्या दिशेने धावत होती. नुकताच पावसाळा सुरु झाला असल्याने अधून मधून पावसाच्या सरी कारच्या विंडस्क्रीनला भिजवून जात होत्या. गाडी चालवणारा बराच सुशिक्षित अन मॉडर्न वाटत होता. गडद निळ्या रंगाची ली ची जीन्स, त्यावर एलेन सोलीचे निळ्या -पांढऱ्या स्ट्रिप्स असणारे शर्ट, हातात बुलगरीचे स्पोर्ट घड्याळ, डोळ्यावर तांबूस रंगाचा कोयोटेचा सन-ग्लास असा त्या ड्रायवरचा पेहराव होता.

"एवरीडे आय वांट टु फ्लाय स्टे बाय माय साइड..." गाडीच्या डेस्कबोर्ड मध्ये ठेवलेला मोबाइल फोन वोडाफोनची ट्यून ऐकवू लागला होता. त्या रिंगटोन ने ड्रायवरचे लक्ष्य वेधून घेतले. त्याने आपल्या डाव्या हातानेच डेस्कबोर्ड वरील फोन उचलला अन आपल्या कानाला लावला.

"हॅलो." 
"निखिल, कावेरी हियर. तू कुठे आहेस? ऑफिसमध्ये फोन केला तर कळाले की तू घाईघाईत बाहेर निघाला आहेस. दोन दिवसांची सुट्टी ही घेतली आहेस. बाय द वे, तू आज मला सीसीडी मध्ये ५:३० ला भेटणार होतास ना?" समोरून मुलीचा आवाज आला. 

"सॉरी यार कावेरी, आय कुड्ण्ट मेक इट. मी घरी चाललोय, डॅड चा फोन आला होता. फारच विचित्र घटना घडली आहे तिथे. इट साऊंडस स्कॅरी." निखिलने कावेरीला सर्व घटना समजावून सांगितली.

"सो व्हेन यु विल बी बॅक इन टाऊन ?" कावेरी

"आय एम नॉट शुअर, बट बाय धिस फ्रायडे, आय विल बी बॅक."

"ओके. सो आय एम गोन्ना मिस यू फॉर कपल ऑफ डेज?" 

"अरे यार, समझा कर. इट इज डिफिकल्ट सिचुएशन फॉर माय डॅड. अन मला तिथे असणं गरजेचं आहे."  निखिल कावेरीला समजावत म्हणाला, "हे बघ मी आता ड्राइव करत आहे आणि बाहेर पाऊस ही जोरात पडत आहे. मी तुला नंतर फोन करतो."

"ओके डियर, घरी पोहचल्यावर मला फोन कर. नक्की करशील ना ?"
"हो नक्की करिन, आता ठेवू फोन?"
"ठीक आहे. काळजी घे.सी या.बाय"  

"बाय" म्हणत निखिलने फोन ठेवून दिला.

निखिल गाडी चालवत विचारचक्रात हरवून गेला. त्याला दुपारचा प्रसंग आठवू लागला. घड्याळाने १ चा टोला वाजवला होता, निखिल व राजश्री क्लाईंट मीटिंग वरुन परत आले होते. निखिल आपल्या केबिन मध्ये शिरला त्याच्या पाठोपाठ राजश्री ही त्याच्याच केबिन मध्ये शिरली. निखिल टेबलपलीकडील खुर्चीवर बसला तर राजश्री त्याच्या समोरील खुर्चीवर बसली. दोघे ही फारच थकले होते. 

"बॉस, त्या शाहने आपले प्रपोसल अॅक्सेप्ट केले तरच आपला हा प्रोजेक्ट सक्सेसफुल होऊ शकतो." राजश्री म्हणाली.
"नाहीतरी तो शाहचा चमचा तोराणी तर ह्या प्रोजेक्ट मध्ये खुसपटच काढत होता. हे नको ते पाहिजे, ते नको हे पाहिजे..."निखिल वैतागून म्हणाला.

इतक्यात गणेश पाण्याचे भरलेले ग्लास घेवून तिथे आला. त्याने टेबलावर दोघांसाठी भरलेले ग्लास काढून ठेवले अन तिथून तो निघून गेला.

"निखिल यार, चल जेवायला समोरच्या हॉटेल मध्ये जाऊ या. तसेही १:३० वाजला आहे." राजश्री म्हणाली.
"गुड आयडिया, त्यामुळे थोडा स्ट्रैस पण कमी होईल. चल निघू या." निखिल उठून उभा राहिला अन दरवाजाकडे चालू लागला.

निखिल केबीनचा दरवाजा उघडायला अन त्याचा फोन वाजायला एकच क्षण. त्याने वैतागून फोनची स्क्रीन  बघितली. त्यावर डॅड असे फ्लॅश होत होते. निखिलने फोन उचलला. 

"हॅलो डॅड." निखिल. 
"निखिल बेटा.."निखीलला पलीकडून बंडोपंताचा कापरा आवाज ऐकू आला.

"काय झाले डॅड, तुम्ही घाबरलेले दिसत आहात." निखिल काळजीच्या सूरात म्हणाला.         

बंडोपंतानी सर्व हकीगत निखिलला सांगितली. ते पुढे म्हणाले.
"बेटा, तुझा दादा राहुलही ह्या क्षणी इथे नाही, तो कलकत्त्याला कामाच्या निमित्ताने गेला आहे. तुझी आई ह्या प्रकाराने भांबवून गेली आहे. फारच घाबरली आहे ती."

"वाहिनी आहेत ना तिथे?"
"हो आहे ती इथे, तीच सरस्वतीची काळजी घेत आहे. पण तू लवकर इथे ये."
"हो मी आता निघतोच." निखिलने फोन ठेवून दिला.

निखिलचे बोलणे ऐकून राजश्रीला आता पर्यन्त कळून चुकले होते की काही तरी घडले होते अन ते निखिल साठी इमर्जन्सी होते.

"निखिल माझ्या मते आता तुला निघायला हवं." निखिल काही बोलायच्या आत तिने त्याचे विचार ओळखले होते.

"थॅंक्स राज." निखिल धावतच दरवाजाबाहेर पडला. 
   
क्रमशः 

Friday, July 22, 2011

शोध पानांचा - भाग २

भाग २ 

जॉनीने खेचून काढलेलं हाड पाहून सगळेच चांगले हबकले होते. सरस्वती देवींना तर दरदरून घाम फुटू लागला होता. त्यांनी हर्षला तिथून नेण्याचा प्रयत्न केला पण हर्ष काही जागचा हलेना, शेवटी त्याही चुपचाप त्याच्या सोबत तेथेच उभ्या राहिल्या.

जॉनी आता त्या हाडाला घेवून दूर गेला होता. बंडोपंत पुढे होवून जॉनीने उकरलेल्या खड्ड्यात पाहू लागले. त्यांना काही तरी जाणवले, त्यांनी रामूला नजरेनेच खुणावले. रामूला इशारा कळला अन तो बागेत काम करताना लागणारी पहार व कुदळ घेऊन आला. त्याने पहार बंडोपंतांच्या हाती दिली व स्वतः कुदळ घेवून त्या जागी खणू लागला. बंडोपंतांनीही पहार घेवून खोदणे चालू केले.

काही वेळातच त्या दोघांनी मिळून बराच मोठा खड्डा तयार केला होता. तरीही त्यांचे खणणे चालू होतेच. बंडोपंतांनी पहार जोरात जमिनीत हाणली तसा टांन असा आवाज झाला. त्या आवाजाने सगळ्यांचे लक्ष्य वेधून घेतले. पंतानी पहार हळूच खेचून काढली. ते पहारीच्या टोकाने माती सरकवू लागले. लोखंडाचा स्पर्श जाणवताच त्यांनी रामूला हाताने खूण केली. रामू कुदळ बाजूला ठेवून हाताने माती काढू लागला. काही क्षणातच त्यांना मातीत दबलेली ती वस्तू स्पष्ट दिसू लागली, ती एक जुनी लोखंडी गंज चढलेली पेटी होती.

रामू अन पंतानी मिळून पेटी जमिनीतून वर काढली. पेटी जरी जुनी असली तरी फार मजबूत होती. धूळ झाडल्यावर त्या पेटीवरील नक्षीकाम उठून दिसत होते, पाहताच क्षणी पेटी पुरातन काळातील असावी असे वाटत होते. तिच्या कडीवर लोखंडी भले मोठे कुलूप लावलेले होते. कुलूप फारच जुने होते अन त्यालाही पेटीप्रमाणेच गंज चढला होता. 

जवळच उभा असलेला हर्ष सर्व काही बारीक नजरेने पाहत होता. पेटी पाहताच त्याला आनंद झाला होता. 

" खजिना सापडला, दादुला खजिना सापडला, दादू आपल्याला खजिना सापडला." हर्ष आनंदात नाचत तोतडे बोल बोलत होता.

"दादासाहेब, पेटीचे कुलूप जुने अन गंजलेले आहे, पहारीच्या एका घावात कुलूप तुटून जाईल. मी घालतो यावर एक घाव. " रामू पंताना म्हणाला. पंतानी ही त्याच्या म्हणण्याला मान हलवून दुजोरा दिला.

रामूने पहारीचा घाव त्या कुळूपावर घातला, पण कुलुपाचे काही वाकडे होऊ शकले नाही. खूप प्रयत्न करूनही कुलूप तुटू शकले नसल्याचे पाहून बंडोपंतानी रामूला पेटीची कडीच तोडायला सांगितले. रामूने पहारीचे एक टोक कडीच्या फटीत घातले अन दुसऱ्या टोकाला जोरात हिसका दिला, तशी कडी निखळून पेटीपासून विलग झाली. 

पेटीपासून विसखळीत झालेली कडी बाजूला सारून पंतानी पेटीचे झाकण उघडले. आत वाळवी लागलेला एक लाकडी खोका होता. तो खोका म्हणजे एक राजेशाही अलंकार ठेवण्याची पेटी होती. त्या पेटीवर सुंदर अशी अलंकारांचे नक्षीकाम केलेले होते. लाकडी पेटीवरील वाळवी, आपल्या खांद्यावरील फडक्याने पुसत पंतानी ती बाहेर काढली. सरस्वती देवी हे सगळे अचंब्याने बघत होत्या तर हर्ष आनंदाने उड्या मारत होता. सरस्वती देवी प्रश्नार्थक नजरेने कधी पंतांकडे तर कधी त्या पेटी कडे पाहत होत्या.
       
पंतानी ती पेटी अलगद उघडली. आता त्यांना कुलुपाप्रमाणेच गंजलेली जुनी चावी मिळाली. चावीवर काहीतरी लिहिलेले होते, परंतु दिसायला अस्पष्ट होते. चावीही फार गंजलेली होती. पंतानी चावी उचलली.

"दादासाहेब, आवं ह्याच कुलुपाची चावी असंल ती." रामू एखादे रहस्य उलगडावे तसे म्हणाला.
"हम्म ! मलाही तेच वाटतंय रामू." बंडोपंतांनी रामूच्या बोलण्याला दुजोरा दिला खरा पण त्यांना वाटत होते कि जर ही त्या कुलुपाची चावी असेल तर ती आत पेटीत गेली कशी? चावी आत असल्यावर बाहेरून कुलूप लावले कसे?

पंतांना काहीही वाटत असले तरी त्यांनी प्रयत्न म्हणून ती चावी त्या कुलुपात घातली अन कुलूप खोलण्याचा प्रयत्न केला. पण तो फोल ठरला. ती चावी त्या कुलुपाची नव्हतीच मुळी. तिचा कुलूप दुसरीकडेच कुठे तरी होता आणि तो कुठे होता हेच रहस्य होते. ते फक्त उलगडायचे बाकी होते.

लाकडी पेटीत अजून काहीतरी आहे का बघावे म्हणून पंतांनी पुन्हा त्या पेटीत हात घातला व ते चाचपू लागले.
अन अचानक खाड् असा आवाज झाला. अचानक झालेल्या आवाजाने हर्ष नाचायचं थांबला अन डोळे विस्फारून तो कधी आजी सरस्वती देवींकडे तर कधी लाकडी पेटी कडे पाहू लागला. पंतांच्या हातून पेटीचा चोर दरवाजा उघडला गेला होता. आत एक मखमली पांढरा कपडा, रुमालाची हातघडी करून ठेवावा तसा ठेवला होता.

पंतांनी तो कपडा बाहेर काढला आणि त्याची घडी उघडली. कपडा जवळपास दोन मीटर लांबी अन रुंदीला असावा. त्यावर काही तरी आढेवेढे चित्र रेखाटलेले होते. बंडोपंतांनी नीट निरखून पहिले. त्याच्या लक्ष्यात एक गोष्ट आली ती म्हणजे ते चित्र एक नकाशा होता,पण हा त्याच वाड्याचा नकाशा आहे हे त्यांना उमगले नाही.  

क्रमशः

Thursday, July 21, 2011

शोध पानांचा - भाग १

disclaimer - ही कथा व कथेतील सर्व पात्रे, अन वाडा, संपूर्णतः काल्पनिक आहेत. मनोरंजन हा शुद्ध हेतू मनाशी बाळगून मी ही कथा लिहित आहे. कथेतील पात्रांचा जीवित अथवा मृत व्यक्तींशी काहीही सबंध नाही. आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा. कथेत घडणारे प्रसंग माझ्या ऐकण्यात नाहीत किंवा मी त्यांचा पुरस्कारही करीत नाही. ही एक काल्पनिक कथा आहे हे वाचकांनी लक्षात घ्यावे.

भाग १ 

सकाळचे दहा वाजले होते.  बंडोपंत बागेत बागकाम करण्यात दंग झाले होते. शेजारीच त्यांचा सहा वर्षांचा नातू हर्ष त्यांच्या जॉनी या पाळीव कुत्र्यासोबत चेंडू घेऊन खेळत होता. बागेतील मोकळ्या जागेत चार-पाच गार्डन चेअर्स आणि एक टेबल ठेवला होता, त्यातील एका चेअर वर सरस्वती देवी वर्तमान पेपर वाचत बसल्या होत्या. समोरच्या टेबलावर कॉफीचा रिकामा कप ठेवलेला होता. बहुदा त्यांनी आताच कॉफी घेतली असावी.

बंडोपंत २ महिन्यापूर्वीच रिटायर झाले होते. ते कोल्हापुरात कलेक्टरच्या हुद्दयावर कार्यरत होते. शाहूपुरीत त्यांचा फार मोठा वाडा आहे. ८ वर्षांपूर्वीच त्यांनी हा वाडा श्री दामोदर पंत देशमुख यांच्याकडून विकत घेतला  होता आणि आता ते याच वाड्यात राहत होते, त्यांच्या पूर्ण कुटुंबासह.

वाडा तसा फार पुरातन काळाचा होता, जवळपास १०० -१५० वर्षांपूर्वीचा, इंग्रजांच्या काळातला. तात्यासाहेब देशमुख यांनी इंग्रजी आर्किटेक्चरवर भाळून बनवून घेतलेला. वाड्यावर इंग्रजी कलेची छटा दिसून येत होती. पण याच वाड्याने मराठी संस्कृतीही जपली होती. असा हा ऐतिहासिक वारसा जपलेला वाडा अजूनही तटस्थ उभा होता अन् यात आता राहत होते ते सरदेसाई कुटुंब. 

बंडोपंत हातात खुरपे घेऊन बागेतील नको असलेलं गवत काढीत होते. जवळच हर्ष आणि जॉनी आपल्याच मस्तीत खेळत होते. हर्ष चेंडू दूर फेकी अन जॉनी तो धावत जाऊन तोंडात पकडी असा त्यांचा खेळ चालू होता. ह्यावेळेस हर्षने हातातील चेंडू जोरात बागेच्या दिशेने भिरकावला. हर्षने फेकलेला चेंडू धरण्यासाठी जॉनी जवळच्या झाडीत शिरला. ५ -६ मिनिटे झाली तरी जॉनी काही परत येई ना म्हणून हर्ष त्या झाडीत शिरला. समोरचे दृश्य पाहून त्याने आजी सरस्वती देवींना हाक मारली. 

सरस्वती देवी धावत त्या झाडीत शिरल्या अन समोरचे दृश्य पाहताच त्या ही जागेवरच थबकल्या. जॉनी जुन्या वडाच्या झाडाखालील माती उकरत होता. त्याने जवळच मातीचा बराचसा ढीग लावला होता. आता जॉनी जोर जोरात भुंकू ही लागला होता. भुंकता भुंकता त्याने खोदणे चालूच ठेवले होते.

जॉनीचे भुंकणे ऐकून जवळच काम करणारा नोकर रामु अन बंडोपंत धावतच तेथे आले. आता पर्यंत जॉनी ने दीड फुट मोठा खड्डा केला होता. आता तो काही तरी वस्तु खेचून काढण्याचा प्रयत्न करत होता अन शेवटी त्याने ते खेचून काढलेच. जॉनीच्या तोंडात एक हाड होते. ते नुसते हाड नव्हे तर तो एक मानवी हाताचा सांगाडाच होता.  

क्रमशः


Tuesday, July 12, 2011

द एलिअन टेक्नोलॉजी - ch १२. ब्लॅकहोलचा प्रवास - काळ

द एलिअन टेक्नोलॉजी  - ch १२. ब्लॅकहोलचा प्रवास काळ


क्षिनाचे स्पेसशटल आता पुर्णपणे ब्लॅकहोलमध्ये शिरले होते. पुढचा प्रवास फारच कठीण होता. त्या ब्लॅकहोलमध्ये पुढे काय अडचणी सामोर्‍या येतील याचा तिला पूर्ण अंदाज नव्हता. तिचा तो पहिलाच ब्लॅकहोलचा प्रवास होता, परंतु तरीही तिने तो प्रवास स्वीकारला होता अन त्याशिवाय तिच्याकडे दूसरा जलद असा मार्गच नव्हता.

क्षिनाचे स्पेसशटल ब्लॅकहोलमध्ये भरकटले जाऊ लागले. त्याच्या रडारवर दिशेसबंधी माहिती दिसणे बंद झाले होते. असे असतानाच स्पेसशटल हेलकावे खाऊ लागले, त्यावर ब्लॅकहोलमध्ये खेचल्या जाणार्‍या इतर वस्तूंचा मारा होऊ लागला होता. स्पेसशटल शून्यात जावे तसे एका पूर्ण काळोख्या गोल आकृतीकडे भरकटत जाऊ लागले.

स्पेसशटलचे हेलकावे थांबले होते, ते पुर्णपणे आता दुसर्‍या डायमेंशन आले होते. रडारवर आता दिशा निर्देश होवू लागला होता. पण समोर जे दृश्य दिसत होते ते पाहून क्षिना आश्चर्यचकित झाली. तिला सर्वत्र फक्त पाणीच पाणी दिसत होते. ते जल डायमेंशन होते. इथं धरतीचा लवलेश नाममात्रही नव्हता, अन् आकाशाचे तर नावच नव्हते, सगळी कडे फक्त पाणीच पाणी.  

स्पेसशटल पाण्यात बुडून चालले होते. क्षिनाने डॅशबोर्डवरील एक लिवर मागच्या बाजूस खेचले तस ते शटल पाण्यात पाणबुडीप्रमाणे तरंगू लागले. क्षिनाने स्पेसशटल उत्तर-पूर्व असे वळवून घेतले अन् आता प्रवास पुन्हा चालू झाला होता. काही अंतर कापल्यावर क्षिनाला काही मोठे काळे गोल पाण्यात इतरत्र तरंगताना दिसले, ते गोल म्हणजे दुसरे तिसरे काही नसून दुसर्‍या डायमेंशनमध्ये जाण्याचे मार्ग होते. तिने त्यातील चवथा गोल निवडला अन ती त्या गोलाकडे जावू लागली. जसजस ते स्पेसशटल त्या गोलाकडे जात होत तसतस पाणी त्या स्पेसशटलला मागे ढकलत होते. काही केल्या स्पेसशटल गोलापर्यंत पोहचतच नव्हते. शेवटी वैतागून क्षिनाने जेलटेक नावाचे इंजिन सुरू केले. इंजिन सुरू करताच स्पेसशटलने वेग धरला तीन सेकंदातच ते शटल त्या डायमेन्शन मधून बाहेर पडले.
स्पेसशटल कोणत्यातरी एका गॅलेक्सीत आले होते. क्षिना स्वतःजवळील इलेक्ट्रो-मॅग्नेटिक इन्टर गॅलेक्टीक स्पेस मॅप वापरू पाहत होती. परंतु मॅप मध्ये काहीच दिसत नव्हते. म्हणजे ती तिच्या डायमेंशन मध्ये परतली नव्हती, कुठल्या तरी दुसर्‍याच डायमेंशन मध्ये आली होती.

अचानक स्पेसशटल समोर एका प्रकाशाचा उगम झाला, थोड्याच वेळात त्या प्रकाशाने पूर्ण गॅलेक्सी व्यापून घेतली. तिने स्पेसशटलच्या कॅमेर्‍याने घेतलेली विडियो फुटेज रिवाइंड केली अन ती रडारच्या बाजूलाच असलेल्या स्क्रीनवर पाहू लागली. दोन मोठे गोल एकमेकांवर आदळले होते. त्यांच्या आदळण्याने झालेल्या स्फोटातून तो प्रकाश निघाला होता. आता कॅमेर्‍यावर रेकॉर्ड झालेली दुसरी फुटेज ती पाहत होती. त्या स्फोटापासून निर्माण झालेले धूलिकण, उल्का, वेगवेगळे वायु अन प्रकाश यांनी गॅलेक्सीत मुक्त संचार सुरू केला होता. काही क्षणातच गॅस अन धूलिकण यांचे मिश्रणापासून एक घन पदार्थ निर्माण होऊ लागला. त्या घनाचा आकार विकार विचित्र होता. पुढच्या काही क्षणातच तो घन स्वतः भेवती फिरू लागला. फिरताफिरता त्याने गोल आकार घेण्यास सुरुवात केली. इतरत्र फेकले गेलेले उल्कापिंड, धूलिकण हे सगळे त्या घनाकडे खेचले जावू लागले . काही अंतरावर जावून ते स्थिर झाले. त्यांनी विशिष्ट अशी स्वतःची रचना केली होती, त्यांनी एका पट्ट्याप्रमाणे त्या गोलाला रिंगण घातले. या सगळया कृतीवरून क्षिनाला कळून चुकले होते की तिच्या समोरच एका ग्रहाने जन्म घेतला होता.

हे सर्व काही वेळातच घडले होते जे केवळ अशक्य होते. दोन ग्रहाची टक्कर होवून त्या पासून पुन्हा सृष्ठी निर्माण व्हायला युगे लागतात, इथे तर ते काही मिनिटातच झाले होते. अर्थातच इथे कालाचे मापदंड काही वेगळेच होते.

क्षिनाला काही तरी आठवले, तिने आपल्या कवचाचे बटन दाबले तसा कवचाचा एक कप्पा बाहेर आला. त्यातून तिने एक यंत्र बाहेर काढले. यंत्रावर बरीचशी बटने दिली होती तिने त्यातील एक बटन दाबले तसं यंत्राच्या स्क्रीनवर एक लिस्ट दिसू लागली. ती लिस्ट क्षिना वाचु लागली. २४ या आकड्यावर येताच क्षिना थांबली. त्याच्या समोर लिहिले होते – काळ.

ती सूची म्हणजे डायमेन्शनची लिस्ट होती. २४ आकड्यासमोर काळ लिहिले होते. क्षिना काळ नावाच्या डायमेंशनमध्ये शिरली होती.               

क्रमशः 

Previous / Next 

Sunday, July 3, 2011

द एलिअन टेक्नोलॉजी - ch ११. डेस्टिनेशन प्लॅनेट अर्थ

द एलिअन टेक्नोलॉजी - ch ११. डेस्टिनेशन प्लॅनेट अर्थ 

क्षिनाचे स्पेसशटल ब्लॅकहोलकडे खेचले जावू लागले तसं क्षिनाने स्पेसशटलमधील एक ब्लॅक कलरचे बटन दाबले. आता ते स्पेसशटल दुप्पट वेगाने ब्लॅकहोलमध्ये जावू लागले. काही क्षणातच ते स्पेसशटल दिसेनासे झाले. क्षिनाने फार कठीण पण जलद असा मार्ग निवडला होता,तिने ब्लॅकहोलमधून प्रवास करणे स्वीकारले होते. 


एलेक्स आराम खुर्चीवर बसला होता. स्टेफनी अन क्षिना सोफ्यावर बसून होत्या तर जॉन सोफ्यासमोर बेलाच्या मांडीवर डोके ठेवून जमिनीवर पडला होता, त्याने आपले पाय सोफ्याच्या उजव्या बाजूला ठेवले होते. बेला अधून मधून जॉनच्या केसांमधून प्रेमाने हात फिरवीत होती. सगळे लक्ष्य देऊन क्षिनाची गोष्ट ऐकत होते.

क्षिनाने पुढे सांगण्यास सुरुवात केली.

"मी अन डॉक्टर स्पेंस दोघे हि धावत प्रयोग शाळेबाहेर निघालो. समोरून दोन गार्डस आमच्याच दिशेने चालत येत होते. त्यांनी आम्हाला धावताना पाहून, आम्हाला थांबवून धावण्याचे कारण विचारले." क्षिना सांगत होती.


"क्षिना, ते बघ समोर दोन गार्डस आपल्याच दिशेने येत आहेत." डॉ स्पेंस काळजीच्या सुरात म्हणाले.
"घाबरू नका डॉक्टर, मी बघते काय ते." क्षिना.

"डॉक्टर स्पेंस अन त्यांची असिस्टंट दोघ धावत येत आहेत, मला वाटते काही तरी गडबड असावी." पहिला गार्ड दुसऱ्याला म्हणाला.
"हो मलाही तसेच वाटतंय. चल त्यांनाच विचारूया" दुसरा गार्ड म्हणाला.

" डॉक्टर तुम्ही असे पळत का आहात?" पहिला गार्ड.
" अरे त्या..." डॉ स्पेंस अडखळत काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत होते.
"त्या प्रयोगशाळेत आग लागली आहे अन प्रयोगाचे सामान फुटून तेथे विषारी वायू पसरला आहे. आम्ही कसेबसे आपला जीव वाचवत तिथून बाहेर पडलो आहोत, काही क्षण अजून तेथे असतो तर तुम्हाला आमची बॉडी देखील सापडली नसती. ते विषच असे होते कि त्याने तिथले पदार्थ झीजवण्यास सुरुवात केलीय.

"ठीक आहे तुम्ही जा आम्ही बघतो तिकडे." असे म्हणत दुसरा गार्ड पहिल्या गार्ड सोबत प्रयोगशाळेकडे धावू लागला.

"तू अस्स का सांगितलेस? आता त्यांना तिथे आग हि भेटणार नाही अन विषारी वायू हि नाही भेटणार. काही क्षणातच हे सगळे कमांडर ग्रेगरला कळेल, पुढच्याच क्षणाला आपण त्याचे कैदी असू."डॉ स्पेंस नाराजी व्यक्त करीत क्षिनाला म्हणाले.

"डॉ अस्स काही होणार नाही कारण आपण निघताना मी तिथे मॅग्मेर्सिकचे द्रव मिश्रण असलेली काचेची डब्बी फोडून टाकली आहे." क्षिना
"अरे पण आता ते दोन्ही गार्डस जिवंत येणे शक्य नाहीत." डॉ स्पेंस दोन्ही गार्डस विषयी चिंता करीत होते.

"एक मिनिट. हे मॅग्मेर्सिक काय आहे? अन ते दोन्ही गार्डस जिवंत परत का येवू शकणार नाहीत?" जॉनने क्षिनाला मधेच थांबवत आपली उत्सुकता दर्शवली.

"मॅग्मेर्सिक हा पाण्यासारखा दिसणारा पदार्थ आहे. तो आम्ही प्रयोगशाळेत निरनिराळ्या प्रयोगात वापरत असू. दिसायला जरी पाणी असले तरी त्याच्यासारखा जीवघेणा पदार्थ मी आजवर पाहीला नाही. याला आम्ही काचेच्या बंद डब्बीत ठेवत असू. याचा हवेतील ऑक्सिजनशी संबंध येताच त्याचे रुपांतर एखाद्या अ‍ॅसिडप्रमाणे  होते. जिथे या पदार्थाचे थेंब पडतात तो भाग झिजू लागतो अन पुढच्याच क्षणी याचे रुप एका ज्वाला मुखीतून निघालेल्या लाव्याप्रमाणे असते. हा पदार्थ एक विषारी वायू उत्सर्जित करतो, ज्याने श्वसन इंद्रियावर प्रक्रिया  घडून श्वसन क्रिया बंद पडते अन त्याच क्षणी त्या प्राण्याचा मृत्यू होतो." क्षिना सविस्तर सांगत होती.

"जर मॅग्मेर्सिकचा एक थेंब या इथे जमिनीवर पडला तर इथे ६-७ फुट खोल थेंबाच्या आकाराने खड्डा पडेल." क्षिना पुढे सांगू लागली.

"आम्ही स्पेससेंटर नजीकच्या रस्त्यावर आलो होतो. डॉक्टर स्पेंसना मी पुढे जाण्यास सांगितले. स्पेससेंटरच्या ८ नंबरच्या लॉन्चर वर काही स्पेसशटल्स उभी असल्याचेहि त्यांना सांगितले." क्षिना 


"डॉक्टर स्पेंस तुम्ही पुढे निघा, स्पेससेंटरच्या ८ नंबरच्या लॉन्चर वर काही स्पेसशटल्स उभी आहेत. त्यातील अल्फा-११ नावाच्या  स्पेसशटलवर तुम्हाला जायचे आहे. त्या स्पेसशटलने तुम्ही पृथ्वीपर्यंतचा प्रवास नक्कीच करू शकता."  क्षिना
"अन तुझे काय? तू माझ्या सोबत येत नाही आहेस?" डॉक्टर स्पेंस
"नाही सध्या तरी नाही पण नंतर मी जरूर तुम्हाला भेटेन, आता मला माझ्या आई अन भावाला सुरक्षित ठिकाणी पोहचवायचे आहे. तुम्ही निघा आता." 
"ठीक आहे क्षिना, हे घे DOTS (डीएनए ओफेनडर ट्रॅकिन्ग सिस्टम). अन हे आहे माझ्या डीएनएचे सॅम्पल. याने तू मला शोधू शकशील." असे म्हणत डॉ स्पेंस ने क्षिनाला आपल्या कवचाच्या कप्प्यातून  DOTS नावाचे उपकरण अन त्यांचे डीएनएचे सॅम्पल काढून दिले. आता ते वळून स्पेस सेंटर कडे जाऊ लागले. क्षिना अजूनहि त्यांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत उभी होती.

डॉ स्पेंस आता वळणावरून दिसेनासे झाले तशी क्षिना आपल्या घराकडे जायला निघाली. घराच्या दिशेने जात असताना क्षिनाला आकाशात एक स्पेसशटल लॉन्च झालेले दिसले. ते अल्फा -११ होते, डॉ स्पेंस पृथ्वीकडे निघाले होते.


क्रमशः