Monday, May 30, 2011

द एलिअन टेक्नोलॉजी - ch ४. पूर्वभाग - पहिली भेट

ch ४. पूर्वभाग - पहिली भेट

(न्युयॉर्क मध्ये...)
सकाळचे सहा पस्तीस झाले होते. एलेक्स अजूनही बेडवर पालथा झोपला होता. कॉलेजला उन्हाळ्याची सुट्टी (Summer Vacation) लागली असल्याने लवकर उठण्याची चिंता नव्हती. सुट्टीमध्ये (vacation) त्याचे मित्र इतरत्र फिरायला गेले होते, राहिले होते तर फक्त जॉन, बेला, स्टेफनी, स्टीव्ह आणि तो स्वतः. बेला, स्टेफनी व स्टीव्ह यांनी vacation program course साठी प्रवेश घेतल्यामुळे ते कुठेही सुट्टी घालवला गेले नव्हते. जॉन आपला घोड्यांचा तबेला सोडून कुठे जावू शकत नव्हता, त्याचे खरे कारण वेगळेच होते पण इतर मित्रांना त्याने हेच कारण सांगितले होते. खरं तर जॉन - बेलावर खूप प्रेम करी, अन त्याला तिच्याशिवाय एकटे कुठे जाणे जमत नव्हते. बेलाला जॉनविषयी काय वाटत असे याबद्दल तिने कधीच चर्चा केली नाही किंवा तिला तो एक मित्रच म्हणून वाटत असावा.

एलेक्सही आपल्या मित्रांशिवाय कुठेच जावू इच्छित नव्हता त्यामुळेच त्याने पूर्ण सुट्टी घरीच घालवण्याचा निर्णय घेतला होता. तो अन स्टेफनी दोघांची गट्टी कॉलेजच्या पहिल्या वर्षीच जमली होती. कॉलेज सुरु होवून जेमतेम ३ महिने झाले असतील, तोच स्टुडन्टसना सांगण्यात आले कि कॉलेजच्या education program नुसार २ स्टुडन्टसना नवीन प्रवेश देण्यात आला आहे. प्रथमतः एलेक्स व जॉन ला या २ स्टुडन्टसविषयी फार चीड होती, त्यांना वाटे की मोठ्या घरच्या मुलांनाच असे प्रवेश मिळतात. परंतु हि चीड त्यांच्या मनात फार काळ टिकली नाही.
  
पहिले लेक्चर बंक करून एलेक्स आणि ग्रुप - अर्थातच जॉन व बेला सुद्धा या ग्रुपचे सदस्य होते - कॉलेजच्या आवारात टंगळ - मंगळ करीत होते. त्या सर्वांचेच लक्ष्य कॉलेजच्या गेटवर होते, जणू ते कोणाची फार आतुरतेने वाट पाहत होते.

"एलेक्स, मोटूच्या हवाल्याने एक खबर आहे. १० मिनिटातच ती अन तिची कार कॉलेज मध्ये एन्टर करेल." फ्रेडी म्हणाला.
"अस्स आहे तर. तू  जा अन आपली स्पेशल गुलाबांची फुले घेवून ये." एलेक्स.  
"तिचे स्पेशल स्वागत करायचे आहे या कॉलेज मध्ये."
कॉलेजच्या आवारात एक जर्मन मेड रेड ओपेल सुसाट धावत शिरली अन पार्किंग लॉटकडे वळली. पार्किंग लॉटच्या P-२ या जागेत ती कार येवून थांबली. एलेक्सही आतापर्यंत पार्किंग लॉट मध्ये येवून पोहचला होता अन त्या कार कडेच त्याचा मोर्चा वळला होता. कारचा दरवाजा उघडला गेला, त्यातून सुंदर व मोहक असे मुलीचे पाय बाहेर आले, दुसऱ्याच क्षणी दरवाजा लावला गेला अन त्या सुंदर व मोहक पायाच्या मालकिणीचा सुंदर असा मुखडा दिसू लागला. एखाद्या अप्सरेलाही लाजवेल असे तिचे लावण्य होते, जणू एखादी hollywood ची सिलेब्रीटीच होती ती. गाडीला म्याचिंग असा रेड टोप अन ब्लैक स्कर्ट, हातात रेड-सिल्वर चे कॉम्बीनेशन असलेला मोबाईल अन त्यालाच साजेशी हंड्बग. एलेक्स तिचे सौंदर्य पाहून जागच्या जागीच स्तब्ध झाला, बहुतेक तिच्या मोहक रूपाने त्याचावर जादू केली असावी. एलेक्सच्या हातात फ्रेडी कडून मागवलेली गुलाबांची फुले होती.

"ओह, गुलाबांची फुले! तीही माझ्यासाठी,सो स्वीट ऑफ यु." ती एलेक्सच्या हातातून फुले घेत म्हणाली.
पुढच्याच क्षणी तिने ती पार्किंग लॉट मध्ये असलेल्या मोठ्याशा डस्ट बिन मध्ये टाकली अन एलेक्स कडे कटाक्ष टाकत म्हणाली.
"डोन्ट यु डेअर टू डू दिस वन्स अगैन, समजले!"
एलेक्स तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहतच राहिला. खरे तर तो तिची रागिंग करण्यासाठी तिथे आला होता. गुलाबांच्या फुलांमध्ये त्याने ब्लैक पेपरची पावडर टाकली होती जेणेकरून ती दिवसभर शिंकत राहावी अन त्रासून परत आपल्या पूर्व ठिकाणी निघून जावी. पण झाले उलटेच, तिने तर गुलाबाची फुले घेतली अन कचऱ्याच्या कुंडीत टाकून दिली. एलेक्स पहिल्यांदा कोणाकडून मात खात होता. ती - एलेक्स अन स्टेफनीची पहिली भेट होती. 

क्रमशः
Previous / Next   

द एलिअन टेक्नोलॉजी - ch ३. शोधाशोध

ch ३. शोधाशोध 

एखादा ज्वालामुखी प्रज्वलित होऊन फुटून पडावा असा आवाज झाला. उल्कापिंड टेकडीच्या पलीकडील बाजूस जाऊन पडला होता. 

एलेक्स त्या आवाजाने खडबडून जागा झाला. रात्री बिअर पिता -पिता तो अंगणातील आराम खुर्चीवर कधी झोपी गेला हे त्याचे त्यालाही कळले नव्हते.तो खुर्चीवरून विजेच्या चपळाईने उठला अन धावत घरात गेला. त्याला एका कोपऱ्यातील सोफ्यावर स्टेफनी झोपलेली दिसली. तिचा उजवा हात जमिनीकडे खाली झुकलेला होता. जवळच बिअरची रिकामी बाटली आडवी पडलेली होती. तिचा डावा पाय सोफ्याच्या Back वर होता. ती अजून झोपेत होती म्हणजे तिची नशा अजून उतरली नव्हती नाही तर तो आवाज ऐकून एखादा बहिरासुद्धा जागा झाला असता. 

तिला बिअर घेण्यासाठी फोर्स करून आपण चुकी केली असे एलेक्सला वाटले.पण तिला सुरक्षित पाहून त्याला हायसे वाटले.त्याच्या चेहऱ्यावर समाधान पसरले होते. एलेक्स पुन्हा वळला अन धावतच बाहेर आला. बाहेर त्याच्याप्रमाणेच भांबावलेले चेहरे घेऊन जॉन आणि बेला इकडे-तिकडे काहीतरी शोधण्याचा प्रयत्न करीत होते.
 
जॉनच्या हातात जंगल कार्बाईन नावाची राइफल होती व ती समोर रोखून धरत इकडे तिकडे शोधत होता, जणू काही तो जंगलात शिकारच करत आहे. जॉनने खुणेने बेलाला तबेल्याकडे जाण्यास सांगितले व तो स्वतः तळ्याच्या दिशेने जाऊ लागला.

एलेक्स आता जॉन अन बेलाची प्रतिकृती करत समोरील मक्याच्या शेतात शिरला. त्याच्या हातात कंदील होता त्याच्या प्रकाशात तो धावत धावत मार्ग काढीत होता. काही अंतरावर त्याला ती पिके एकाबाजूस कोलमडलेली दिसली. तो अजून पुढे जाऊ लागला. अचानक त्याच्या लक्षात आले कि समोरची काही पिके गायब आहेत. तो थेट त्या ठिकाणी जाऊन पोहचला. तिथली पिके काढून कोणीतरी बाजूला व्यवस्थित रचून ठेवली होती. त्याने कंदील जरा खाली नेला. खाली जमिनीवर घोंगडी अंथरलेली होती. जवळच चार पाच बिअरच्या बाटल्या पडलेल्या होत्या. त्याच्या बाजूला ड्यूरेक्सचे फोडलेले पाकीट पडलेले होते. ते फोडताना पाकीट फोडनाऱ्याला बहुदा फारच घाई झाली असावी, असे त्या पाकिटाच्या अवस्थेवरून दिसत होते. जवळच कोण्या एका स्त्रीची आंतरवस्त्रे पडली होती. 

एलेक्स आता गालातल्या गालात हसू लागला होता. त्याला तिथे घडलेला प्रकार लक्षात येत होता. ती अस्थाव्यस्त पडलेली आंतरवस्त्रे दुसऱ्या-तिसऱ्या कोणाची नसून बेलाची होती अन पाकीट फोडणारा जॉन होता.  अचानक त्याला कोणाची तरी किंकाळी ऐकू आली. आवाज घराच्या दिशेने आला होता. एलेक्सच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. तो घराच्या दिशेने धावू लागला.

एलेक्स आता घराच्या आवारात आला, समोर जॉन व बेला स्टेफनीचे सांत्वन करताना दिसत होते.
"म्हणजे ती स्टेफनी होतीतर " एलेक्स स्वतःशीच पुटपुटला.
"हो, ती आत घरात झोपली असताना तिच्या अंगावर काहीतरी जोरात पडले." बेला म्हणाली.
"अन मी उठून बघितले तर भला मोठा लिझार्ड माझ्या पायाशेजारी सोफ्यावर होता." बेलाचे वाक्य पूर्ण करत स्टेफनी म्हणाली."मी फारच घाबरले होते."
"ठीक आहे, ही थोडी बिअर पी म्हणजे तुला बरे वाटेल" जॉन तिला समजावण्याचा आविर्भावात म्हणाला.
"नको काही, तिने रात्री खूपच घेतली होती. तिचे डोके जड झाले असेल." एलेक्स जॉनकडे रागाने बघत म्हणाला. "आधी तिला आत नेऊ या."
"जशी तुझी मर्जी" जॉन खांदे उडवत म्हणाला.
चौघेही आता घराच्या दिशेने फिरले अन जागच्या जागीच थबकले. समोरचे दृश्य पाहून सगळेच चाट पडले होते.

क्रमशः 
  

Sunday, May 29, 2011

द एलिअन टेक्नोलॉजी - ch २. शूटिंग स्टार

द एलिअन टेक्नोलॉजी - ch २. शूटिंग स्टार

आकाशात अचानक प्रकाश दिसू लागला, काही तरी पृथ्वीच्या दिशेने वेगात येत होत. आता ते वेगात पृथ्वीच्या कक्षेत शिरलं, तसं त्या वस्तूचा पृष्ठ भाग घर्षण बळ व गुरुत्वाकर्षण बळामुळे ज्वाला उत्पन्न करीत वेग धरू लागला. जसं जसं ती वस्तू जमिनीच्या दिशेने अंतर कापीत होती, तितकाच तिचा वेग अजून वाढत होता. 

जर कोणी शास्त्रज्ञ इथं असता तर त्याने ह्या प्रसंगाची तुलना उल्का पाताबारोबरच केली असती. एखादा तरुण प्रियकर त्याला शूटिंग स्टारच म्हणाला असता अन डोळे मिटून त्याने त्या शूटिंग स्टारकडे आपल्या प्रेयसिचीच मागणी केली असती. पण खरोखरीच ती वस्तू म्हणजे एक उल्काच असली तर.

दहा मिनिटापूर्वी पृथ्वीच्या कक्षेत शिरलेल्या त्या वस्तूने बरेचसे अंतर कापले होते. पाच मिनिटानंतर ती पृथ्वीपासून १०००० किलोमीटर अंतरावर होती. दोन मिनिटानंतर ती ६००० किलोमिटरवर होती. अंतर आता अजून कमी होत चाललं होते. 

५०००,३००० .... १००० अन ५००. आता ती वस्तू स्पष्ट दिसू लागली होती. तो आगीचा गोळा होता ह्याचाच अर्थ असा कि तो एक आकाशातून धरतीच्या कक्षेत शिरलेला एक उल्कापिंडच होता. आता तो उल्कापिंड त्या घराच्या वरून वेगात जाऊ लागला होता.

धडाम धुडूम ! एखादा ज्वालामुखी प्रज्वलित होऊन फुटून पडावा असा आवाज झाला. उल्कापिंड टेकडीच्या पलीकडील बाजूस जाऊन पडला होता. जिथे उल्कापिंड पडला तिथे जमिनीवर खोल खड्डा झाला.

क्रमशः 

द एलिअन टेक्नोलॉजी - ch १. क्रोकोडाइल रिवर

द एलिअन टेक्नोलॉजी - ch १. क्रोकोडाइल रिवर

सकाळचे साडे तीन वाजले, बाहेर अजूनही काळोख होता. आकाशात चांदण्या टीम-टीम करत होत्या. काळोखाचे भयाण साम्राज्य सगळीकडे पसरलेले होते. कुठे  रातकिड्यांची किरकिर तर कुठे बेडकांचा डराव-डराव असा आवाज तर मध्येच कोल्हेकुई ऐकू येत होती. वारा जोरात वाहत होता अन त्यामुळे झाडा-झुडुपांची होणारी सळसळ वातावरणाची भयानकता अजूनच वाढवत होती. अशा वातावरणात ते घर शांतचित्ताने टेकडीच्या पायथ्याशी ऐटीत उभे होते.

ते घर नव्हे तर एक फारच सुंदर ओल्ड कॉटेज होते. त्या घराशेजारी एकही घर नव्हते, होती तर बस्स शांतता. बहुदा अशा शांत वातावरणाचा आनंद घेण्यासाठीच ते घर बांधले गेले असावे. घराच्या उजव्या बाजूस घरालगतच एक जुनाट तबेला होता. डाव्या बाजूस २ किलोमीटर अंतरावर एक छोटे तळे होते. पुढील भागात बेबी कॉर्नची पिके दाटीवाटीने उभी होती तर मागील बाजूस ती उंच - उंच टेकडी दिसून येत होती. अश्या त्या छोट्याश्या सुंदर घरास चहू बाजूने हिरवळीने वेधले होते अन त्यामुळे त्या घराची शोभा अजूनच वाढली होती.

खरेतर ते घर डॉ. फ्रांक्लीन जोन्स ( Franklin Jones ) यांचे होते. पूर्वायुष्यात जोन्स एक प्रख्यात वैज्ञानिक ( Scientist ) होते. त्याकाळी त्यांचा मानवाच्या जीवनात अमुलाग्र बदल घडवू शकणारा प्रयोग चालू होता. ते ज्या प्रोजेक्टवर काम करत होते तो प्रोजेक्ट वैज्ञानिक दृष्ट्या फारच महत्वाचा होता. प्रोजेक्टसाठी स्पोन्सर अमेरिकेतील विविध मोठमोठाल्या कंपन्या करीत होत्या. दोन वर्षे काम करूनही डॉ जोन्सना हवी अशी सफलता हाती आली नव्हती. हळूहळू कंपन्यानी आपला हात मागे खेचून घेतला. स्पोन्सर्स अभावी प्रोजेक्ट बंद पडला. ह्या प्रोजेक्ट साठी डॉ जोन्संनी आपला अमूल्य वेळ दिला होता. या प्रसंगाने डॉ जोन्स पार खचून गेले, त्यांचा आत्मविश्वास आता कुठेतरी हरवून गेला होता. डॉ जोन्सने आपले सर्वस्व विकून आपला बस्ता न्यू योर्क मधून या इथे, कॅनडातील पूर्व भागातील या घरात हलवला.

घर तसे फारच सुंदर होते, परंतु वस्तीपासून खूप दूर होते, जवळपास  ७ मैल दूर. इथे येताना रस्त्यात लागणारी  क्रोकोडाइल रिवर पार करावी लागे, अर्थातच रिवर पार करण्यासाठी त्यावर एक पूल बांधला होता. तसं इथे चालत पोहचणे शक्यच नव्हते अन गाडीने येणे हि सोपे नव्हते. त्या पुलावरून गाडी चालवताना फार सांभाळून चालवावी लागे. एक तर जुनाट लाकडी पूल, वरून रिवर मध्ये मोठमोठ्या क्रोकोडाइल्सचा सूळसुळाट होता. कदाचित म्हणूनच त्या रिवरला  'क्रोकोडाइल रिवर' असे म्हणत असत.

क्रमशः 


Friday, May 27, 2011

बंधन - Ch 8

दुपारचे दोन वाजले होते. अजित - सुजित दोघंही टीव्हीवर कार्टून बघत बसले होते. कार्टून नेटवर्कवर दुपारचा टोम अंड जेरी चा एक तासाचा शो लागला होता. दोघंही आपली तहान भूक विसरून तो कार्यक्रम अतिउत्साहाने बघत होते, त्याचा हा लाडका कार्यक्रम जो होता. एकच्या सुमारास त्यांची शाळा सुटायची, जवळपास दीड वाजता ती दोघ घरी परतायची. कपडे बदलून ती हातपाय -तोंड धुऊन जेवायला बसायची. जेवण उरकल्या - उरकल्या टीव्ही सुरु व्हायचा तो संध्याकाळी साडे-पाच वाजेपर्यंत चालायचा. त्यांचा हा नित्य कार्यक्रम ठरलेला असे. सहा वाजता मित्रांबरोबर दोघंही खेळायला निघून जात. 

पण आजची गोष्ट वेगळी होती. आज पासून त्यांना सुट्टी लागलेली होती.दोनच आठवड्यांवर वार्षिक परीक्षा येवून ठेपली होती. आणि हि सुट्टी परीक्षेपूर्वी अभ्यासासाठी मिळणारी सुट्टी होती. अजित - सुजित अभ्यास तर सोडाच, पण सकाळ पासूनच मस्ती करत, टीव्ही बघत दिवस घालवत होते. दुपारचे दोन वाजले होते अन CN वर Tom & Jerry चा वन हवर स्पेशल शो लागला होता. दोन्ही मुलं तो कार्यक्रम बघण्यात गुंग होऊन गेली होती.

"अजित - सुजित, जेवायला वाढले आहे, चला जेवून घ्या." मंदाने आतून आवाज दिला.
"हं ! तू वाढ आम्ही येतोच." अजित टीव्ही बघतच म्हणाला.
"कधी पासून वाढून ठेवलाय, आता येता की मी येऊन टीव्ही बंद करू." मंदा बाहेर येत म्हणाली.
"येतो ना आई, जरा हा कार्यक्रम संपू दे ना." सुजित इवलसे तोंड करीत म्हणाला.
"ते काही नाही पहिले जेवण." मंदा टीव्हीचा रिमोट उचलीत म्हणाली.
"आम्ही जेवणार नाही, आम्हाला नाही भूक" अजित - सुजित एका सुरात म्हणाले.
मंदा टीव्ही बंद करणार इतक्यातच टीव्हीवरील चित्र नाहीसे झाले, आता पर्यंत टोम जेरीला पकडण्या करता त्याच्या मागे धावत एका पाण्याच्या जहाजात शिरला होता. टीव्हीवरील चित्राच्या जागी आता काळ्या अन सफेद मुंग्या दिसू लागल्या होत्या. खर्र - खर्र असा आवाजही टीव्हीतून येत होता. 
दोन्ही मुलांचा चेहरा पडलेला दिसत होता, तर मंदाच्या चेहऱ्यावर विजयी हास्य होते. सकाळीच केबलवाला महिन्याचे पैसे मागण्यासाठी आला होता, तेव्हा तिनेच त्याला केबल काढायला सांगितली होती. तिला माहिती होत, की टीव्ही चालू असे पर्यंत अजित-सुजित काही अभ्यास करणार नाहीत.

जेवणानंतर मंदाने दोन्ही मुलांना जबरदस्तीने अभ्यास करायला बसवले. अजित - सुजित दोघंही मन मारून अभ्यासाला बसले. खरं-तर मंदाने ह्यासाठीच कामातून सुट्टी घेतली होती. ती एका अंगणवाडी शाळेची शिक्षिका होती, तिला लहानपणापासूनच लहान मुलांना शिकवण्याची आवड होती व तिने ती आवड सत्कामी लावली होती.
क्रमशः 

शोध पानांचा

वाचक हो, लवकरच आपल्या मनोरंजनासाठी चित्तथरारक कथेसह येत आहे. कथेचे नाव आहे 'शोध पानांचा', कथेचं मुख्य पात्र (lead character) हा एक वाडा आहे. वाडा हा १०० वर्षाहून जुना असून त्याला एक रहस्यमय इतिहास आहे. हे रहस्य बंडोपंत सरदेसाई यांना सुचीनिकेसोबत (clue) उलगडत जाते. बंडोपंतांना ह्या सुचनिका कश्या व केव्हा मिळतात? शेवटी रहस्य उलगडते का? कोणते आहे ते रहस्य? हे सर्व जाणण्यासाठी राहा नियमित वाचक. 

Thursday, May 26, 2011

बंधन - Ch 7


"दादा वहिनी कुठे आहे?"

"अग ती शेजारच्या कुलकर्ण्यांकडे गेली आहे,येईल इतक्यात."
"कोण येणार आहे?" मंदा दारातील चप्पालेच्या मांडणी जवळ जोडे काढत म्हणाली.
"हि बघ आलीच." अविनाश म्हणाला.
"अय्या सविता तू , तू केव्हा आलीस ?" एव्हाना मंदा घरात आली होती. 
"आताच! वहिनी तू कशी आहेस?" म्हणत सविताने सोफ्यावरून उठून मंदाला करकचून मिठी मारली.  
"बरी आहे मी, बर झाले तू आलीस ते खूप दिवस तुला पाहिले नव्हते. ह्यांना कितींदा सांगितले की एक दिवस सविताला भेटून येवू या, पण हे ऐकतील तर शपथ!" मंदा लटक्या रागानेच बोलली.
 "मंदाताई, आमचे चंगू-मंगू कुठे आहेत ?" अरुणने घरातून नजर फिरवत विचारले.
"फुटबाल खेळायला गेली आहेत, येतील थोड्याच वेळात. तोपर्यंत मस्त गरम गरम चहा बनवते."मंदा स्वयंपाक घरात जात म्हणाली. "अहो ऐकले का, जरा इकडे या."
अविनाश उठून आत गेले. मंदाने त्यांना दुध नसल्याचे सांगितले, मघाशी त्यांना कोरा चहाच पियावा लागला होता.
"समोरच्या वाण्याच्या दुकानातून एक दुधाची पिशवी घेवून या लवकर.त्याला सांगा चार तारखेला उधारी चुकती करेन म्हणून".मंदा लगबगीने वळली अन चहासाठी भांड्यात पाणी घेवू लागली.

"अरुण सविता येतो मी पाच मिनिटात खाली जावून, तुम्ही बसा गप्पा मारत. आलोच मी." असे म्हणत अविनाश पायात चपला घालून दुध आणायला निघून गेले.

बंधन - Ch 6


"आई तुला आठवते का, मी एकदा बदक्याला बदडून घरी आलो होतो ते?"
"कोण बद्क्या? तू कधी कोणाला मारले होतेस?"
"अग बदक्या, आपला अरुण ग!" 
"अरुण होय, हो आठवले आता, अन मी तुला खूप मारले होते.आठवलं मला."
"हो, पण तू माझे ऐकूनच घेतलं नाहीस की मी त्याला का मारलं होत. अग आई आम्ही शाळेच्या मैदानात क्रिकेट खेळत होतो, खेळता खेळता अरुण अन नरेश मध्ये बाचाबाची झाली, मी भांडण सोडवायला गेलो तर दोघे माझ्यावरच उलटले,माझ्याशीच भांडू लागले. पण मी शांत होतो. एवढ्यात अरुणने बाबांसाठी अपशब्द काढले. मला ते पटले नाही अन माझा हात त्याच्या डाव्या डोळ्यावर बसला. दुसरा फटका त्याच्या नाकावर मारला तसे बाकी साऱ्यांनी मला पकडले. अरुणच्या नाकातून रक्त वाहत होते. ते पाहून सर्व जन माझ्यावर धावून आले. अन पुढे तुला माहित आहे, काय झाले ते."

"पुढे तुला आईने बेदम मारले होते."सविता उघड्या दारातून आत शिरत म्हणाली.
"अन माझ्या आईने मला." सविताच्या मागोमाग आत शिरत अरुण म्हणाला.

"तुम्ही दोघ, अन ह्यावेळी इथे?" अविनाश थोड्याश्या आश्चर्यानेच म्हणाला.अरुण - सविता आईच्या पाया पडत होते.
"आयुष्यमान भाव, सुखी राहा पोरानो." आई थरथरते हात दोघांच्या मस्तकावर ठेवीत म्हणाल्या. 
"का नाही मी माझ्या सासुरवाडीस येवू शकत नाही का? का अजून लहानपणीचा राग गेला नाही वाटत? अरुण आईच्या बाजूस बसत जरा नाटकीपणानेच म्हणाला.
"अरे खरेच तसे काही नाहीतुम्ही गेली चार वर्षे नागपुरात होतात ना म्हणून विचारले" अविनाश स्पष्टीकरण देत म्हणाला. 
"अरे दादा, कालच ह्यांची बदली इथे झाली. सामानाची लावालाव करता करता वेळ नाही मिळाला नाहीतर सकाळीच येणार होतो." सविताने अरुणला बोलू न देता संभाषणावर ताबा मिळवला. 

बंधन - Ch 5


संध्याकाळची आता रात्र होत आली होती. सविता आतल्या खोलीत अभ्यास करत बसली होती. आईने जेवण बनवले होते पण अविनाशने ते खालले नाही. आई ही जेवली नाही. दोघे उपाशीच होते. आईने अंथरून टाकून दिले, अविनाश त्यावर पालथा पडला होता, परंतु त्याला झोपच येत नव्हती. सर्व अंग दुखत होते, कुठे वळ उठले होते तर कुठे खरचटले होते. अचानक त्याला उघड्या पाठीवर कसला तरी  गरम स्पर्श जाणवला, त्याने वळून बघितले. आई गरम गरम आंबी हळद आपल्या थरथरत्या हाताने अविनाशच्या जखमांवर लावत होती. हळद लावता लावता तिचे डोळे अश्रू ढाळत होते. तिचे सुजलेले डोळे बघून अविनाशला गहिवरून आले, तोही रडायला लागला.अविनाशचे रडणे ऐकून सविता धावत बाहेर आली.

"नको रडू बाळा, मी तुला मारले न, माझे हात तुटून का नाही पडले त्यावेळी?" असे म्हणत आई पुन्हा रडू लागली. ते दृश्य पाहून साविताही अश्रू ढाळू लागली. आई पुढे म्हणाली,"अवि बाळा मी तुला मारले, कारण तुझाबद्दल कोणी वाईट बोललेले मी ऐकू शकत नाही."
"आई तु रडू नकोस ना मी पुन्हा असं नाही करणार", अविनाश आईचे डोळे आपल्या नाजूक हाताने पुसू लागला. आई हातातील वाटीतून गरम आंबी हळद पुन्हा अविनाशच्या जखमांवर लावू लागली.

"आई ग!" जखमांची कळ न सोसून अविनाश जोरात ओरडला.

"काय झाले रे बाळा?" सोफ्यावर बसलेल्या निर्मलाबाई अविनाशला म्हणाल्या. आईच्या आवाजाने अविनाश भानावर आले. अविनाशच्या जुन्या आठवणी एवढ्या ताज्या होत्या की जणू ते सर्व काही वर्तमान काळातच घडत होते. अविनाशने ती कळ आतासुद्धा अनुभवली होती अन त्यामुळेच त्यांच्या तोंडातून किंचाळी बाहेर पडली.

"काही नाही आई, पायाला मुंगी चावली वाटते." त्यांनी आईकडे पाहिले. त्यावेळच्या आईत अन आताच्या आईत फारच फरक पडला होता. आईचे केस पिकले होते. डोळ्याला भिंगाचा चष्मा लागला होता. चेहऱ्यावर, हातावर सुरकुत्या दिसून येत होत्या. पूर्ण शरीरावर म्हातारपणाची लक्षणे दिसत होती. आई हातात रुद्राक्षाची माळा घेऊन सोफ्यावर बसली होती. ती नेहमी आता जपतप, देवपूजा इ. मधेच स्वतःला रममाण करत असे.

Wednesday, May 25, 2011

बंधन - Ch 4

साट!! त्या आवाजाने खोलीत क्षणभर शांतता पसरली.निर्मलाबाईनी अविनाशच्या कानशिला खाली एक जोरात लगावून दिली होती. अविनाश त्या फटक्यामुळे बाजूच्या स्टुलावर कोलमडत जाऊन पडला.

"सुलेखाताई, तुम्ही अरुणला घेवून डॉक्टर जोश्यांकडे चला मी ही येतेच तुमच्या सोबत दार लावून."

"त्याची काही गरज नाही मी नेईन अरुणला डॉक्टरांकडे पण तुम्ही जरा अविनाशला काबूत ठेवा. आज माझ्या पोराला मारले आहे उद्या कोणाचा खून करायलाही मागे पुढे पाहणार नाही तुमचा पोरगा." सुलेखाबाई मानेला हिसका देत निघून गेल्या, पण त्यांच्या शब्दांनी निर्मलाबाईचे हृदय वेधून टाकले. त्यांच्या हृदयाला सुलेखाताईचे शब्द्वेधी बाण टोचत होते.
  
निर्मलाबाईनी दार ओढून घेतले अन त्या आतील खोलीत गेल्या. दोनच मिनिटात त्या परत बाहेर आल्या, त्यांच्या हातात चामड्याचा पट्टा होता, सैनिकी पट्टा. अविनाश भीतीने कोपऱ्यात जावून बसला होता.

"माऱ्यामाऱ्या करतोस, गुंड बनायचे आहे तुला?" असे म्हणत आईने पट्टा वर उगारला. दुसऱ्याच क्षणी तो खाली आला अन पहिला फटका अविनाशच्या उजव्या हातावर व मांडीवर पडला. अविनाश जोरात कळवळू लागला. त्याच्या तोंडातून अस्फुटशी किंचाळी बाहेर पडली. "आई ग!"

दुसरा फटका त्याच्या उजव्या पोटरीवर पडला, तसा अविनाश मोठमोठ्याने रडू लागला. रडत रडत तो आईला विनवू लागला. "आई मारू नको ना."

"मारू नको तर काय पूजा करू तुझी? तुझा बाप देशाची सेवा करता करता तो बघ फोटोत जाऊन बसलाय अन तू त्यांच्या नावाला बट्टा लावायला निघालास.", तिसरा फटका अविनाशच्या उजव्या खांद्यावर व मानेवर पडला. अविनाश हुंदके देवून रडत होता. 

चवथा, पाचवा, सहावा .... असे बरोबर सतरा फटके अविनाशला पडले होते, आता त्याचे वळ ही उमटायला लागले होते. अजून अविनाश हुंदके देऊन रडतच होता.

क्रमशः 
आधीचे पान / पुढचे पान


बंधन - Ch 3



कदाचित भूतकाळातील आठवणी ताज्या झाल्या असाव्यात. हो नक्कीच ते भूतकाळात गुरफटून गेले होते, त्यांना आपल्या शालेय जीवन आठवू लागले. अश्याच एका संध्याकाळी छोटा अविनाश क्रिकेट खेळून घरी परतला होता. अंगातील पांढरा शर्ट मातीने मळलेला, ठीक-ठिकाणी फाटलेला होता. हातावर कोणीतरी ओरबाडल्याचे वळ पडले होते. खाकी चड्डीचे बट्टन तुटले होते, कसेबसे कमरेतील कर्गुड्याने तिचे ओझे सहन करीत तिला कमरेतून खाली गळण्यापासून वाचवले होते. अविनाशने चाळीतील बदक्याला बेदम चोपले होते.

"हे घ्या तुमचा इस्पेशल चाय, कोरा चहा! बिन दुधाचा ", मंदाच्या त्या आवाजाने अविनाश भूतकाळातील जगातून वर्तमान काळात आले.
"मी जरा बाजूच्या सुनंदा वहिनींच्या घरी जावून येते. प्रिया घरी आली आहे परत, बिचारी पोर, एक महिना नाही झाला लग्नाला नि हे अस्स घडलंय. तिला पांढऱ्यासाडीत कसे बगवेल मला, मला ती पोरीसारखीच आहे." 
मंदा शेजारच्या कुलकर्ण्यांच्या घरी निघून गेली. जाताना तिने कड्या शब्दात बजावले होते, "मुले घरी आली की त्यांना अभ्यासाला बसवा, मी घरी आले की मला ती अभ्यास करताना दिसली पाहिजेत,जरा लक्ष्य द्या त्यांच्याकडे. " 

अविनाश चहाचा घोट घेत मैदानात खेळणाऱ्या मुलाकडे पाहात होते. त्यांची भावनांची बोट त्यांना पुन्हा भूतकाळाच्या बेटावर सोडून गेली.

अविनाश मळक्या, ठीक - ठिकाणी फाटलेल्या कपड्यांनी घरी आला होता. आईने विचारले, "अवि काय झाले बाळ? हे मळके कपडे?? आणि जागोजागी फाटलेत कसे रे ?"

अविनाश काही सांगणार तोच आवाज आला,"तो काय सांगणार मी सांगते ना!". दारात सुलेखाकाकू अवतरल्या होत्या, त्यांच्या मागे बदक्या भीत-भीत उभा होता. त्याची ही अवस्था अविनाश सारखीच होती.त्याचे नाक फुटले होते, नाकातून रक्त वाहून शर्टावर त्याचे डाग उमटले होते. डावा डोळा सुजलेला होता.

"वहिनी, तुमच्या अविनाशने आमच्या अरुणला खूप मारले आहे, हे पहा त्याचा डोळा कसा सुजलाय, नाकातून भळाभळा रक्त वाहून गेलंय." बदक्याला पुढे करत त्या म्हणाल्या.

बंधन - Ch 2

"अविनाश आलास का रे बाबा?", निर्मलाबाई आतल्या खोलीतून बाहेर येत म्हणाल्या,"माझ्या गोळ्या आणल्यास का रे?"

"हो आईआणल्यात गोळ्या पण एक गोळी राहिली." अविनाश खालच्या सुरात बोलले.

"का रे?" 

"आई Chemist कडे हि गोळी नव्हतीदोन दिवसांनी मिळेल म्हणाला"अविनाश आईच्या प्रश्नाचे उत्तर देत म्हणाले.

 "अरे मग दुसऱ्याकडे जायचे नाहीस का?"

आता आईला कसे सांगायचे की ह्या गोळ्या फारच महाग आहेत अन त्या घेण्यासाठी माझ्याकडे आता पैसे उरले नाहीत असे मनातल्या मनात विचार करीत अविनाश म्हणाले,"अग कोणाकडेच हि गोळी नव्हती."
"आता मला चहा मिळणार आहे का पियायला की पाण्यावरच भागवणार?" अविनाशने मंदाकडे तोंड वळवीत प्रश्न केला.

"हो मिळेल कीकाय झाले न मिळायला! पण कोरा मिळेल दुध संपले आहेसुजितला सांगितले होते दुध आणायला पण तो न ऐकताच खेळायला गेला. " एखादी गोष्ट सांगावी तशी सविस्तर माहिती मंदाने अविनाशला दिली.

"चालेल मलापण लवकर आण म्हणजे झालं." अविनाश टेबलावरील वर्तमान पत्रांची चळत हातात घेवून चाळवयाला लागले.

"मंदाआजचा पेपर कुठे आहे?"

"आज पेपरवाल्याने पेपर टाकला नाहीबहुतेक तीन महिन्याची थक-बाकी वसूल केल्याशिवाय तो पेपर टाकणार नाही वाटते."मंदाने स्वयंपाक घरातून उत्तर दिले.

 अविनाश निराशेने पेपर टेबलावर ठेवीत उठले व समोरच्या खिडकी समोर जावून उभे राहिले. खिडकीतून समोरचे मैदान स्पष्ट दिसत होते. काही मुले मैदानात फुटबाल खेळत होती. अविनाश एकटक त्या मुलांकडे पाहत कसला तरी विचार करत होते.

बंधन - Ch 1


disclaimer - ही कथा व कथेतील सर्व पात्रे संपूर्णतः काल्पनिक आहेत. मनोरंजन हा शुद्ध हेतू मनाशी बाळगून मी ही कथा लिहित आहे. कथेतील पात्रांचा जीवित अथवा मृत व्यक्तींशी काहीही सबंध नाही. आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा. कथेत घडणारे काही प्रसंग माझ्या स्वतःच्या जीवनातून घेत आहे अन्यथा ही एक काल्पनिक कथा आहे हे लक्षात घ्यावे.

characters - अविनाश मांजरेकर, मंदा मांजरेकर, निर्मलाबाई - अविनाशची आई, शंकरराव - अविनाशचे वडील (शहीद) सैनिक, अजित व सुजित  - अविनाश व मंदा ची मुलं, अरुण उर्फ बदक्या - अविनाशचा मित्र, सविता - अविनाशची बहिण .   

३०२ ची बेल जोरात कोणीतरी वाजवत होते. दरवाजावरील नेम - प्लेट वर Mr & Mrs Manjrekar असे सुवर्ण अक्षरात लिहिले होते. 

"आले आले, जरा दम धीर आहे की नाही?" आतून आवाज आला.

मंदांनी हळूच दरवाजा उघडला. दारात ३८ -४० वर्षांचे गृहस्थ थकलेल्या अवस्थेत दाराची बेल वाजवत होते. दरवाजा उघडताच ते दाराला बळेच मागे लोटून देत नजीकच्या सोफ्यावर बसले. हातातील कामाची BAG समोरील टेबलावर त्यांनी सरकावून दिली आणि पायातील बूट मोजे काढीत बसले. BAG च्या ओळखपत्रावर ठळक अक्षरात लिहिले होते, "अविनाश मांजरेकर". ती एका बँकेची BAG होती.

"हे घ्या, पाणी!" मंदा पाण्याने भरलेला ग्लास अविनाशच्या समोर धरत म्हणाल्या.

अविनाशांनी मंदाच्या हातातून पाण्याचा ग्लास घेवून गटागटा करीत एका दमात पिऊन संपवला. 
"अहो सावकाश जरा, ठसका लागला असतातर ?" मंदा काळजीच्या स्वरात उतरल्या.

"हं!!" अविनाश मंदाचे बोलणे ऐकून न ऐकल्या सारखे करत रेमोट् ने TV चालू करण्याच्या प्रयत्नात होते.

"काही फायदा नाही, सकाळीच केबलवाल्याला सांगून TV ची केबल काढून टाकली आहे." मंदा म्हणत होत्या, "अजित - सुजित अभ्यासच करत नाहीत, दिवसभर TV लावून काय ते कार्टून channel वर कार्टून बघत असतात. दोन आठवड्यांवर परीक्षा आली आहे, अभ्यास नको का करायला?"
" जीव तोडून सांगितले कि अभ्यास करा - अभ्यास करा, पण कोणी ऐकेल तर शपथ." मंदा जरा श्वास घेत म्हणाल्या," त्यांच्यासाठी मी सुट्टी घेवून घरी बसले आहे, तर हि बघा आता कुठे तरी पार्कमध्ये फुटबाल घेवून खेळायला गेलीत."

"अग्ग जावू दे गं, मुलांनी नाही खेळायचे तर काय आपण म्हाताऱ्यानी खेळायचे का फुटबाल? अन काय गं काय अभ्यास - अभ्यास करतेस, माझी दोन्ही मुलं खूप हुशार आहेत. नेहमीच First क्लासने पास होतात, अजून काय हवंय?"

क्रमशः